Skip to main content

कळी `खुलली' !...

लेखक दिनेश५७
Published on सोमवार, 14/02/2011
सकाळची उन्हं भंवतालच्या हिरवाईवर पसरली, तरी उमलूउमलू म्हणत गुलाबाच्या लालसर फांद्यांच्या टोकांवर झुलत राहिलेल्या कळ्या काल पाकळ्या मुडपून गुपचूप बसूनच होत्या... `फुलण्या'चं सार्थक व्हावं, म्हणून हुरहूरत होत्या... कळीत दडलेली पाकळीपाकळी मोहरली होती, पुरतं उमलून आपल्या देखण्या तारुण्याची भुरळ जगाला घालण्यासाठी उतावळी होती... त्यातच, तो काटेरी गुलाब, कळीआड दडलेल्या प्रत्येक पाकळीला दटावत होता. ... `एक दिवस थांबा... आजचा सूर्य मावळू द्या, उद्याचा सूर्य उगवेल, त्याची किरणं सोनेरी नसतील.. त्या किरणांचा स्पर्श झाला, की तुमची `कळी' आपोआपच खुलेल, पाकळीपाकळी मोहरून उठेल...

Valentine day special - Strawberry Mille-feuille (मिल् फ्युए)

लेखक Mrunalini
Published on सोमवार, 14/02/2011
Valentine day च्या निमित्ताने आज एक फ्रेंच पाकृ लिहित आहे. साहित्यः दुध - १ १/२ कप (दिड कप) पिठीसाखर - ८ मोठे चमचे मैदा - १/४ कप अंडे - २ पिवळे बलक व १ संपुर्ण बटर - २ मोठे चमचे व्हॅनिला इसेन्स - १ चमचा Pastry sheets - ह्या sheets दुकाना मधे frozen section ला मिळतील. स्ट्रॉबेरी - २५० ग्रॅम पिठीसाखर - २ चमचे सजावटी साठी Skewer - १ सजावटी साठी कृती: १. एका बाउल मधे २ अंड्यांचे पिवळे बलक व एक पुर्ण अंडे घ्यावे. त्या मधे ८ चमचे पिठीसाखर टाकुन whisker ने मिक्स करावे. २. दुसर्‍या पातेल्यामधे दुध गरम करायला ठेवावे. दुध गरम झाल्यावर गॅस बंद करावा.

अख्खा मसूर आणि दीड (शहाणे) आम्ही!

Published on सोमवार, 14/02/2011
सातारा रस्त्यावरच्या "अख्खा मसूर'वर बऱ्याच दिवसांपासून डोळा होता. कधीतरी त्याचं नाव कुणाकडून तरी ऐकलं होतं. तिथं जायचं डोक्‍यात होतं, पण योग येत नव्हता. तसा मी फारसा हॉटेलप्रेमी नाही. आहारात चवीपेक्षाही "उदरभरण नोहे' हा मंत्र जपणाऱ्या अंतू बर्व्याचेच आम्ही अनुयायी. त्यामुळं अमक्‍या हॉटेलात तमकी डिश चांगली मिळते वगैरे तपशील माझ्या गावी नसतात. कुणी सांगितलं आणि सहज जमलं, तर मी ठरवून एखाद्या हॉटेलाकडे वाट वाकडी करतो. नाहीतर कुठेही हादडायला आपल्याला चालतं. तर सांगण्याचा मुद्दा काय, की काल त्या "अख्खा मसूर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हॉटेलात गेलो होतो. सिटीप्राईडच्या अगदी समोर असलेलं हे हॉटेल.

"परराष्ट्र" मंत्री श्री. एस एम कृष्णा

लेखक विकास
Published on रवीवार, 13/02/2011
श्री. एस एम कृष्णा यांनी नुकतेच "परराष्ट्र मंत्री" म्हणजे "परराष्ट्राचे" मंत्री पण ठरू शकतो हे अनावधानाने दाखवून दिले. झाले असे, संयुक्तराष्ट्र सुरक्षा समितीच्या सभेपुढे चर्चेदरम्यान बोलताना पोर्तुगालच्या परराष्ट्र मंत्र्याचेच भाषण साधारण तीन मिनीटे वाचले. युनो मधील भारतीय प्रतिनिधी श्री. हरदीप सिंग यांनी नंतर चूक लक्षात आणून दिली. अपेक्षेप्रमाणे माध्यमांना आणि विरोधीपक्षाला खुराक मिळाला. मात्र श्री. कृष्णा म्हणाले, "नॉट अ बिग डील! नथींग राँग".

विहीर - माझ्या मनातील...

लेखक अज्ञात
Published on रवीवार, 13/02/2011
बर्याच दिवसांनी आज गावाला निघालोय... तशी माझी दर महिन्याला चक्कर असायची गावाकडं, पण मागचे ६ ते ७ महिने काही जमलच नाही, मलेरियाने आजारी होतो आणि नंतर बराच वेळ अशक्तपणामुळे किवा कामामुळे जमलच नाही गावी यायला... खूप दिवसांनी आता सवड मिळाली म्हणून म्हंटल गावाला चक्कर मारावी, म्हातारीची ख्याली खुशाली पुसावी म्हणून निघालो. आमच गाव तस खूप प्रसिद्ध अस नाही... कोलवडी त्याचा नाव, तिथे जायच म्हणजे मोठा आणि कंटाळवाणा प्रवास असा करावा लागतो..