Skip to main content

लै समस्या

Published on सोमवार, 14/02/2011
शेतीची मशागत करतांना, ती फुलवताना फळवतांना अनेक समस्या उद्भवू शकतात. जसे की वाफ्याचा बांध फुटणे. ही एक नेहमी आढळणारी कॉमन समस्या आहे. जमिनीच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेवर ते अवलंबून असलं तरी योग्य प्रयत्नांनी आपल्याला आपले अवखळ पाणी थोपवून ठेवणे जमू शकते. बांध फुटणे ही एक नैसर्गिक प्रक्रियाच. पाण्याचा लोड वाढला, पाटातून पाणी बेफाम वाहू लागले किंवा वाफाच जर कमी उंचीचा असेल तर बांध हा फुटणारच. कमालीचा उमाळा येऊन किंवा भुसभुशीत मातीचा संग लाभल्यामुळे पाणी थोपवून धरणे जिकीरीचे बनते. अशा उस्फुर्त प्रसंगी बांध फटाफट फुटणे अपरिहार्य ठरते.

भीतीचं इंजेक्शन..!

लेखक गवि
Published on सोमवार, 14/02/2011
माझ्या "स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा" या पुस्तकातून ..पण सुधारित आणि पुनर्लिखित.. .................... मी रात्री दोन वाजता भकास डोळ्यानी जागत बसलेला असतो.. छोटा बाळ बाजूला झोपलेला..बायको ही बिचारी शांतपणे डोळे मिटून पडलेली.. सुखात आहेत दोघं.. त्यांना काहीच कल्पना नाही.. हे मल्टिपल स्क्लेरॉसिसचं आत्ताच कळलंय...

एक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा!

Published on सोमवार, 14/02/2011
जून च्या शेवटच्या शनिवारच्या संध्याकाळी त्सेंटा आजीने ग्रीलचा बेत केला होता (होहो, म्हणजेच ते तुमचं बार्बेक्यू..) पण ती जरा सचिंत दिसत होती. कारण विचारले तर म्हणाली मागच्या आठवड्यात हॉल बुक केला पण हान्सीयुर्गान आता ट्रीपला जाणार आहे तो ३ आठवड्यांनी येणार, त्याच्यापुढे आमंत्रणपत्रं तयार करायची तर वेळ नाही.. म्हणून आम्ही ह्योक्स्ट मधल्या प्रिंटरांकडे जायचं म्हटलं तर ३०-३५ पत्रिका छापून द्यायला कोण तयार होणार?

मराठि पाऊल पडते पुढे

लेखक महेश-मया
Published on सोमवार, 14/02/2011
मराठि पाऊल पडते पुढे हा पोग्राम आठवडयाच्या सोमवार आणि मंगळवार या दिवशी रात्रो ९.३० ला मी पाह्तो, काय भन्नाट आहे हा प्रोग्राम, अप्रतीम, महाराष्टाच्या काना कोपर्यात येवडी कला आहे कि विचारु नका, काय एकेकाचे ते कोशल्यं मन भरुन आले, खरच नितिन देसाईंना सलाम करावासा वाटतो, आणि जितु (जितेंद्र जोशी) भारी अँकरिंग करतो. खरच मराठि पाऊल पडते पुढे. जाणकारांचे मत जाण्यास ऊस्तुक

विहीर - माझ्या मनातील... (भाग दोन - शेवट्चा)

लेखक अज्ञात
Published on सोमवार, 14/02/2011
----क्रमश.... मी हळूच पारावरून उठलो आणि खोल विहिरीत पाहू लागलो. त्यात असंख्य पिंपळाची पाण, घाण होती, कुठे हळूच काहीतरी हलत होत, आणि बारीकश्या लाटा उसळत होत्या, बऱ्याच पाननिवल्या इकडून तिकड भटकत होत्या, कोळ्यांची खूप जाळी, सगळीकडे पसरली होती, हे सगळ पाहत असताना, एक विचित्र भावना माझा थरकाप उडून गेली, कोणास ठाऊक का पण मला वाटत होत की त्या काळ्या पाण्यातून दोन डोळे माझ्याकडे रोखुण पाहतायत, ----क्रमश.... झटशीर मी मागे हटलो, अंगावर शहारा आला, डोक्याला मुंग्या आल्या, तसाच मागे सरून पुन्हा पारावर येऊन बसलो, थोडा शांत झालो.

सोशल नेटवर्किंगची कमाल!

लेखक दिनेश५७
Published on सोमवार, 14/02/2011
जानेवारी २००६ ते जून २००९ या जवळपास साडेतीन वर्षांच्या कालावद्यीत ट्युनिशियामधील अमेरिकेच्या दूतावासाने वॉशिंग्टनला काही गुप्त संदेश पुरवले. असंख्य गुपिते फोडून जगभरातील सत्ताद्यीशांना घाम फोडणा-या आणि अनेक मुखवट्यांआडचे खरे चेहरे जगासमोर आणणार्‍या विकीलिक्सच्या हाती या संदेशांच्या दहा फाईल्स सापडल्या, आणि गेल्या नोव्हेंबरच्या आसपास ट्यूनिशियातील अराजकाच्या परिस्थितीची भयानक जाणीव तेथील जनतेला झाली.

मी माझ्यात बंद ....!!

Published on सोमवार, 14/02/2011
[सर्दीने अचानक बेजार झालो होतो. खूप दिवसांनी अशी जीवघेणी सर्दी. डोके सुन्न .कान बधीर मन कासावीस . आणि अचानक जाणवले की हे सुन्नपण मस्त वाटतेय. ऐकू येत नाही .छान वाटतेय. हा कोलाहल हा गोंधळ दुरून बघतोय. मी माझे तात्पुरते सुन्नपण एन्जोय करीत होतो.तेच शब्दात मांडण्याचा प्रयत्न ] डोके सुन्न ....! बधीर ….!! सर्दीने हैरान ....!!! काहीच ऐकू येत नाही झाडाची पाने हलत असतात कावळे कावकाव करीत झाडावर बसलेली मला त्यांच्यां चोची फाकलेल्या दिसतात पण आवाज येत नाही ऐकायला मी सुन्न बधीर...!
काव्यरस