Skip to main content

पाखंडी लोकांच्या प्रश्नांचे उत्तरे

गुरुवार, 24/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, आज अनेक दिवसांनी मिपावर चक्कर टाकता पुर्वीचे लेखन वाचले. हैयोंहैयैयोनी प्रकाशकाका घाटपांड्यांना उद्देशून केलेले खालील आवाहन पुन्हा जागृत करून त्यावर त्यांची सकारात्मक प्रतिक्रिया अपेक्षित आहे. या धाग्याला उपसून काढायला कूटन लिपीच्या बेसनलाडूंचा धागा हे कारण. आणखी एक कारण असे की उपक्रमवर दिवाळी२०१० अंकात नाडीग्रंथ अभ्यासकार्यावर जन्मदिनांक व नवग्रहांची नाडीताडपट्यातील मांडणीवरील हैयोंचा प्रकाशित लेख.

खारूताई, खारूताई !

लेखक विदेश
गुरुवार, 24/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
खारूताई, खारूताई! पळापळीची कित्ती घाई ! झुपकेदार शेपटीची- ऐट भारी हो तुमची ! बघुन टकमक इकडेतिकडे तुरु तुरु पळता कुणीकडे ? आज्जीची गोष्ट ऐकली आम्ही- रामाला मदत केली तुम्ही ! इवलीशी ताई, काम खूप मोठ्ठे- पाठीवर पाहू द्या ना रामाची बोटे !!

रेशमाच्या गाठी

लेखक पूनम १
गुरुवार, 24/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नजर वळे पुन्हा-पुन्हा, यमुनेच्या काठी कशा तोडू सांग कान्हा, रेशमाच्या गाठी साद दिली वेणूने, धावत मी आले तोडून पाश सारे, तुझीच मी झाले थरारली काया सारी, घालता तू मिठी!! निळावल्या सांजेला, करून सोळा साज उंबर्‍याशी सोडून आले, मी सारी लाज प्रीत अबोली आहे, राधेच्या ओठी!! द्वारकेला गेला राणा, राहिली विराणी संपला रास आता, संपली कहाणी राधेची प्रीत आज, ठरली रे खोटी!!

पूर्वग्रहासंबंधीत विस्कळीत विचार

लेखक शुचि
गुरुवार, 24/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
(१) क्वचित एखाद्या व्यक्तीबद्दल आपला एखादा ग्रह होऊन बसतो (२) आणि आपण त्या पूर्वग्रहदूषित दृष्टीनेच त्या व्यक्तीकडे पहातो. (३) खूपदा असे होते हेदेखील कळत नाही पण कधीकधी कळते की अरे आपला "विनाकारण(?)" असा ग्रह बनतो आहे. (४) जेव्हा त्रयस्थ दृष्टीने आपण आपल्याकडे असे पाहू शकतो, तेव्हा दोन मार्ग खुले असतात - (अ) आपण आपल्या पूर्वग्रहाशी = सहजप्रवृत्तीशी ठाम रहाणे किंवा (ब) दुसरा मार्ग हा की आपण आपल्या सहज प्रवृत्तीला = पूर्वग्रहाला विपरीत असे वर्तन करणे. (५) पण मग असा विचार येतो का आपला पूर्वग्रह खोडून काढायचा? का म्हणून आपल्या सहजप्रवृत्तीशी प्रतारणा करायची?

रेल्वे बजेट - अपेक्षा

गुरुवार, 24/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा हा बजेटचा आठवडा. त्यातही रेल्वे बजेट आधी सादर केले जाते ( जे उद्या सादर होणार आहे) सामान्य मुंबईकर याची अगदी आतुरतेने वाट पहात असतो. आजपर्यंतच्या अनुभवानुसार बिहारी / बंगाली रेल्वे मंत्र्यांनी नेहमीच महारष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आपापल्या राज्यातील जनतेची सोय व्हावी म्हणून मुंबईला जाणार्‍या गाड्यांची संख्या वाढवण्यात धन्यना मानली आहे. बाकी फारसा फायदा मुंबई आणि महाराष्ट्राला मिळत नाही. आपले खासदार ही याबाबत निष्क्रीय ( अपवादः आनंद परांजपे) आहेत.

मातेचे स्वप्न

लेखक शुचि
गुरुवार, 24/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
जालावर फिरता फिरता अ मदर्स ड्रीम नावाची कविता वाचनात आली. त्या कवितेवर आधारीत खालील कथा आहे. या कथेचा मुख्य मतीतार्थ हा आहे की भौतिक जगात जरी आपल्या प्रियतम व्यक्तीपासून ताटातूट झाली तरी शोक टाळावा. आपल्याकरता किंवा पुढे गेलेल्या व्यक्तीकरता, कोणाकरताही, शोक हा वाईटच. ___________________________________________________ उदासवाण्या रात्रीच्या अशाच एका प्रहरी, अर्धवट नीद्रीस्त-अर्धवट जागृत अशा अवस्थेत पडलेल्या एका दु:स्वप्नाने मी अस्वस्थ होऊन, घामाघूम होऊन गेले. काय होते बरे ते स्वप्न?

त्याच्या पासपोर्ट साईझ फोटोचा नकाशा ..!!

गुरुवार, 24/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
त्याने फेस बुकावर त्याचे नाव दाखल केले आहे पण फोटो नाही टाकला पासपोर्ट साईझ ..!! एकतर त्याच्याकडे फोटोच नाही असला तरी तो खूप जून वाटतोय खराब चेहरा थोडासा चकणा डोळा डोक्यावरचे उडालेले केस मस्त टक्कल पण तरीही नेटवर एक आकृती छापलीय गेलीय एक नकाशा उमटलाय शरीर अववयाचां ...!! बिन चेहर्याचा तो खूष आहे त्या फोटोवर बिन चेहर्याचा फोटो त्याला खरेच मस्त वाटतोय त्याचे सुख त्याचे दुख तो शब्दातून मांडू लागलाय एक निरागस कोवळेपण आभाळातील उधळलेल्या मुठभर चांदण्या नि चंद्राचा पिवळा प्रकाश मनात काहूर माजवतात तुमचे नाव पण नाही, नि फोटोचां नकाशा ..? नकाशाचा फोटो बघायला बरे वाटते बघा
काव्यरस

नर्मदा बचाव आंदोलन: एक संवाद.

गुरुवार, 24/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
१६ फेब्रुवारीला IISER (Indian Institute for Science Education and Research) पुणे इथे श्रीपाद धर्माधिकारी यांचं On Narmada Struggle and Beyond या विषयावर व्याख्यान होतं. श्रावण आणि मी तिथे गेलो होतो. 'नर्मदा बचाव आंदोलना'ची त्यांनी ओळख करून दिली. फक्त पाण्याच्या फुगवट्यामुळेच लोकं विस्थापित झालेले असं नाहीत तर १९६२ साली नेहेरूंचं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी ज्या शेतकर्‍याची जागा 'तात्पुरती' घेतली ते कुटुंबही आज अनअफिशियली विस्थापितच आहे. (अशा छोट्या छोट्या गोष्टी मला माहित नव्हत्या.) ती जमिन परत मिळेल असं सांगून घेतली, पण ती तर जमीन गेलीच शिवाय कॉलनी उभी करण्यासाठी इतर सहा गावं विस्थापित झाली.