Skip to main content

गड्या गाव बरा

लेखक मॅक यांनी गुरुवार, 17/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी मी गावी गेलो होतो.......(नोव्हेंबर मध्ये ) त्यावेळी गावी भरपूर शेते,फळझाडे ,फुलझाडे बहरलेली होती.... त्याचे मी माझ्या नजरेतून काढलेले हे काही फोटो ......... बघा आवडले तर......... १) पेरू २) भुईमुग शेंग

मारुती ची नावे

लेखक जय - गणेश यांनी गुरुवार, 17/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
समर्थ रामदास स्वामी नी गावो गावी मारुती ची स्थापना केलेली आहे. आज जवळ जवळ सगल्या गावा मधे मारुती मंदीर आहे. आणी प्रत्येक गावातल्या मारुती चे नाव पण वेगळेच आहे. आपण पाहिलेल्या, दर्शन घेतलेल्या, वाचलेल्या मारुती ची नावे सांगावीत. ...जय - हनुमान.

प्रलय

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 17/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
प्रलय निनादतो शंख कुणाचा डमडमतो डमरू संगे महारुद्राने का उघडला तिसरा नेत्र नि:संगे विखार तो डंख शेषाचा कडकडतो दामिनी संगे सागराने का बुडवला भयभीत मित्र अंतरंगे पसरतो पंख तमाचा घणघणतो मृदुंग संगे कालाग्नी का चेतवला भाजूनी आकाशछत्र दुभंगे ढळतो पंथ पृथ्वीचा धडधडतो उल्काप्रपात संगे हलाहल तो पचवलेला कंठही लालीत आज रंगे |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१७/०३/२०११)
काव्यरस

स्वप्नसखी

लेखक अनंत भावे यांनी गुरुवार, 17/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मी कविता लिहू लागलो,तुला मनात ठेउन भारावून गेलो मी,प्रिये,तुला प्रत्यक्ष पाहुन ते रुप,ते लावण्य कसे मनात साठवावे तुझ्या नशिल्या डोळ्यातून किती मद्य प्यावे तुझ्या मोहक चेहरयात गेलो मी न्हाउन भारावून गेलो मी,प्रिये.......................!!१!! तुझी चाल,तुझ्या बोलण्याला तोड नाही गर्व,स्वार्थीपणा याची जरासुध्दा जोड नाही कसा जगू आता मी क्षणभर जरी विसरुन भारावून गेलो मी,प्रिये.......................!!२!! माझ्या जीवनातील आता तूच प्रकाश आहे केवळ तुझ्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आहे तुझ्या प्रकाशाने गेले माझे जीवन उजळून भारावून गेलो मी,प्रिये.......................!!३!!

थ्री-डि

लेखक निनाव यांनी गुरुवार, 17/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
लांबचे येते दिसून जवळ अधिक आहोत त्यात जणु आपण कधी थ्री डि ची आहे जादु कसली दुरुनच साधता येते जवळीक पहावे उतरुन तिच्यात कधी जाणावे तिचे मन माझ्यासाठी करावे हे रोमांच कधी तरी वापरून चश्मा हा अतरंगी डोळेच का नाही दिले बप्पानं थ्री डी असे वाटते कधी कधी अन कधी वाटते कि बरेच झाले आपले तर आपलेच दुक्ख इतरांचे झाले असते किती थ्री डि असावे फक्त एक चयन विरंगुळा म्हणून कधी तरी कळावे मन इतरांचे मला खरे अन माझे त्यांना कधी तरी थ्री डि असावी एक मानसिकता ज्यात आपण व्हावे कुणाचे कधी कदाचित सापडेल औषध रागाचे राग येताच कुणावर क्षणिक.. तु देखिल घाल बप्पा हा चश्मा कधी तुला देखिल ठाउक नसतील तुच बनविल्या ह्य

सांदण दरी - एक प्रवास वेगळाच.

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 17/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
भुमाता अजुन वाट पाहते आहे आपल्या लेकीची, तिच्यावर झालेला अक्षम्य अन्याय पाहिलाय तिनं, त्या कष्टांना दुर करुन त्या लाडाच्या लेकीला पुन्हा एकदा काळजाशी लावुन घेउन झोपवायचं आहे तिला. त्या पराक्रमी राजाच्या वंशाच्या दिव्यांना जोजवुन निजवताना तो प्रचंड पाळणा हलवुन हलवुन थकलेले हात आपल्या हातात घेउन काळजातुन वाहणा-या गार पाण्यात त्या हातांच्या जखमा थोड्या शांत करायच्या आहेत. या साठी त्या आईनं आपल्या काळजाची वाट उघडुन ठेवली आहे, आता फक्त वाट आहे ती लाडकी लेक येण्याची.

माझा महाराष्ट्र

लेखक श्री गावसेना प्रमुख यांनी बुधवार, 16/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
aapla maharashtra १)आता कोठे राहीली सच्चाइ अन ईमानदारी नोकरी साठी हिडंतोय मी दारोदारी, डोके घालायला घर अन दोन वेळेची भाकरी, झेरॉक्स च्या दुकानात उधारी अन फॉर्म विक्रेत्या पुढे लाचारी, याच्याच साठी करावी लागते का ही नोकरी? २)म्यानेतुन तलवार काढल्यावर तीला चटक लागते रक्ताची, नेत्यांनाही निवडनुकीनंतर भुक लागते सत्तेची, रक्ताचाच अभिषेक द्यावा लागतो तलवारीच्या पातीला, अन मग विकतात हेच नेते महाराष्ट्राच्या मातीला.

निसर्गवेड्यांसाठी नवी भेट - पुण्याचे पक्षीवैभव

लेखक प्रसन्न केसकर यांनी बुधवार, 16/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
एनआरसीओतर्फे `पुण्याचे पक्षीवैभव’ फील्ड गाईडचे प्रकाशन २० मार्च रोजी नॅचरल रिसोर्सेस कॉन्झर्वेटर्स ऑर्गनायझेशन (एनआरसीओ) या पुण्यातील संस्थेच्या वतीने जागतिक वनदिनाचे औचित्य साधून दिनांक २० मार्च रोजी वनाधिकारी व वन्यजीव तज्ञ श्री. प्रभाकर कुकडोलकर यांनी लिहिलेल्या `पुण्याचे पक्षीवैभव’ या पक्षीनिरीक्षकांसाठीच्या फील्ड गाईडचे प्रकाशन करण्यात येणार आहे.