Skip to main content

गणपा आणि नाटक्या

लेखक नाटक्या यांनी गुरुवार, 07/04/2011 04:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, बरेच दिवसांपासून गणपाच्या हातच्या अफलातून पाककृती खाताना हा विचार करत होतो की याच्या बरोबर कोणते कॉकटेल चांगले लागेल. घरी थोडेफार प्रयोग केल्यानंतर असे वाटू लागले की आपण गणपाशेटलाच विचारावे का अश्या जॉईंट-व्हेंचर बद्दल? आणि गणपाशेठनी झटकन परवानगी दिली. थोडक्यात म्हणजे मी गणपाशेटच्या जोरावर माझी पब्लीसीटी करतो आहे म्हणाना. असो नमनाला घडाभर तेल पुरे. तर एकंदर योजना अशी की गणपा एक पाकृ आणि मी त्या बरोबर जमेल असे एक कॉकटेल असा विकांताचा मेन्यू म्हणन द्यायचा. तर मंडळी जर ही कल्पना आवडली असेल तर प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही.

अशीच भटकंती

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 07/04/2011 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्र १ छायाचित्र २ छायाचित्र ३ छायाचित्र ४ छायाचित्र ५ छायाचित्र ६

मासे २४) पालकं

लेखक जागु यांनी गुरुवार, 07/04/2011 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
पालकांच्या दिसण्यावर जाऊ नका. ही पालकं दिसायला ओबड धोबड असली तरी चविला तर छान असतातच शिवाय कॅल्शियम युक्तही असतात. खुबड्यांप्रमाणे समुद्रात दगडांवर चिकटलेली किंवा वळवळताना सापडतात. ही भरपुर घासुन आणि बर्‍याच पाण्यात धुवुन घ्यावीत म्हणजे ह्यात अडकलेली रेती निघुन जाते. साहित्य : पालकं ५ ते ६ लसुण पाकळ्या ठेचुन १ ते २ कांदे चिरुन हिंग, हळद मसाला १ ते २ चमचे आल, लसुण, मिरची, कोथिंबिर वाटण १ ते २ लहान चमचे सुके खोबरे + कांदा भाजुन केलेले वाटण ४ ते ५ चमचे तेल, मिठ गरम मसाला १ चमचा. ही पालके पालकं साफ करणे हे खुप किचकट काम आहे.

आम्रखंड

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 06/04/2011 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १/२ किलो ताजा गोड चक्का १/२ किलो साखर दीड कप ताजा आंब्याचा रस (तुम्ही कॅन मधे मिळणारा आंब्याचा रस वापरु शकता) चारोळ्या आवडत असल्यास किंचित वेलची-जायफळपूड (ऐच्छिक) पाकृ: चक्क्यात साखर मिसळून २ तास झाकून ठेवावे. त्यात मग आंब्याचा रस , वेलची-जायफळपूड घालून, पुरण यंत्राला बारीक चाळणी लावून त्यातून फिरवून घ्या म्हणजे नीट एकजीव होईल. चारोळ्या घाला, वरून केशरकाड्या घालून सजवा. .

अगोरा

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 06/04/2011 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक 'यशस्वी' चित्रपट पाहिल्यानंतर काय सापडतं? विशेषतः तो चित्रपट ऐतिहासिक काळातल्या घटनांवर बेतलेला असेल तर? आजही फार काही वेगळं दिसत नाही आणि मुळात मानवी स्वभाव बदलत नाही. भाषा, वेशभूषा, तंत्रज्ञान बदलतं पण स्वभावाला औषध नाही. जमावाला तुच्छतावाद शिकवला की सत्ता हस्तगत करता येते, असलेली सत्ता अबाधित राखता येते. दुसर्‍या जमावाला तुच्छ लेखण्यासाठी भाषा, धर्म, जात, प्रांतिक ओळख किंवा इतर काही मानवनिर्मित ओळख असेल किंवा वंश, लिंग अशी निसर्गनिर्मित असेल.

शहरांची तुलना

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 06/04/2011 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या चेन्नई धाग्यावर काही प्रतिसदांमधे प्रवासी भाडे किंवा ईतर खर्च यासंबंधात पुणे व ईतर शहरांची तुलना केली आहे. तो धागा चर्चेसाठी नसून विरंगुळा या सदरात असल्याने तिथे प्रतिसाद न देता हा नविन धागा सुरु करत आहे. गेल्या काही वर्षात बरंच फिराफिर झाली.. मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई. पुणे तर घरच. प्रत्येक ठिकाणी गप्पा मारताना हा विषय निघतोच. तुम्हालाही हा अनुभव आलाच असेल. प्रत्येक जण स्वतःचे शहर किती चांगले आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतो आणि मग शहरांची तुलना सुरु होते.

उपेक्षित इतिहाससंशोधकाची मुलाखत

लेखक ईश आपटे यांनी बुधवार, 06/04/2011 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय इतिहाससंशोधनाची सुरस कथा-२ ह्यापूर्वीचा लेख आपल्याला इथे वाचता येईल http://misalpav.com/node/17423 ......... तर गेल्या वेळी मी आमच्या इतिहास संशोधन पध्दतीचा परिचय करुन दिला होता. अर्थात त्याला वैचारिक दिशाभूल पध्दती म्हणणे योग्य होईल. ह्या वेळी थोडा दुसरा प्रसंग सांगणार आहे. मागच्या वेळी फक्त मनुवाद्यांच्या वाड्यात जावे लागले होते, ह्यावेळी प्रत्यक्ष एका प्रतिगामी इतिहास संशोधकाची भेट घ्यायची होती. खर तर आम्ही ह्याला इतिहास संशोधक अस म्हणत ही नाही, मिथकवादी, पुनरुज्जीवन वादी असे काही बाहि शब्द आम्ही वापरतो.