Skip to main content

बहकलेले दिवस

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 08/04/2011 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
कसे ते बहकलेले दिवस अन् कश्या त्या मंतरलेल्या रात्री मोहर तुझ्या अवघ्या देहास अन् सुगंधी दरवळ माझ्या गात्री एवढे एवढे होत उरले होते जग फक्त आपल्या दोघांचे क्षणाक्षणांवर उमटले होते सुंदर ठसे आपल्या मिलनाचे सहवासी सुखाचा सोहळा निळ्या नभीचा निळा चांदवा अद्भुत अनुभव आगळा तुझ्या मिठीचा नवा गोडवा कंपित ओठांची धुंद सय थरथरते स्पर्श मोरपिशी गंधित श्वासांची संथ लय झरझरते हर्ष हृदयाशी झुगारून दे काळाची बंधने फिरून जागवं ते क्षणन् क्षण उभारून दे स्मरणांची स्पंदने भारुनी अस्वस्थतेचे कणन् कण |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०८/०४/२०११)
काव्यरस

अति जेवल्या वर काय कराल?

लेखक खादाड अमिता यांनी शुक्रवार, 08/04/2011 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
खादाडी कट्टा हा विषय चाललाच आहे तेव्हा.... 'गरम गरम पुरणपोळी, त्यावर साजूक तूप- मग काय विचारताय? चांगल्या ३-४ हाणल्या. एवढ्या प्रेमानं केल्या होत्या मग त्याला दाद द्यायला नको?' असे संवाद तुमच्या कानावर पडले असतीलच. नाही? बरं मग - 'अरे काल आम्ही सगळे मित्र मंडळी जमलो होतो. काय धम्माल आली माहितीये, तंदुरी चिकन, पनीर मक्खन्वाला, गरमागरम बटर रोटी! डाएट वगेरे पार विसरलो रे!' 'अगं काल मी घरी एकटीच होते, मग टी. व्ही. बघता बघता एक डबाभर आईस्क्रीम फस्त केलं. कळलंच नाही कधी एवढं खाल्लं गेलं ते!' ह्या पैकी एक तरी उदाहरण तुम्ही ऐकलं किंवा बघितलं असणार.

सुटलेली सुटकेस

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 08/04/2011 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
खूप वर्षांपुर्वी घडलेली एक सत्यघटना- चित्राच्या लहान बहिणीचे लग्न ठरल्याचे कळले, आणि आमची नागपूरला जाण्याची जोरदार तयारी सुरू झाली. मुले त्या वेळी साधारणत: सोळा आणि बारा वर्षे वयाची होती. त्यामुळे त्यांचे आपापले लग्नात धमाल दंगामस्ती करण्याचे प्लान्स होते. हा सगळा उत्साह पाहून मी लगेच चांगली दोन आठवड्यांची सुट्टी घ्यावी लागणार असे सुतोवाच ऑफ़ीसमधे करून ठेवले. बॉसने आंबट चेहऱ्याने, तोंडातल्या तोंडात पुटपुटत संमति दाखवल्यासारखे केले होते. तीच पडत्या फ़ळाची आज्ञा मानून मी लगेच मुंबईची चार तिकिटे बुक करून टाकली. ताबडतोब त्याला तसे सांगून देखील टाकले.

लाच का देऊ नये?

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 08/04/2011 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणापासून आपल्याला 'लाच घेण्याप्रमाणे लाच देणे' हा गुन्हा आहे हे ठसवले जाते. आणि त्याच प्रमेयाला पुढे खेचून "तुम्ही लाच देता म्हणून घेणारे घेतात आनि त्यामुळेच भ्रष्टाचार वाढला आहे" असे नेहमी म्हटले जाते. थोडा विचार केला तर लाच खाण्यास सोकावलेल्या ह्या व्यवस्थेला प्रत्येकाला उपल्ब्ध असलेल्या वेळेत / एका निश्चित वेळेत जराही लाच /अमिश न देता कोणतेही काम करणे शक्य आहे का? यामुळे होते कसे की एखादा जेव्हा लाच देतो तेव्हा जर त्याला हे रोखायचे असेल तर लाच देण्याआधी अ‍ॅन्टी करप्शनमधे तक्रार नोंदवावी लागते, मग ते सापळा रचणार आणि त्या लाच घेणार्‍याला पकडणार (अशी ढोबळ पद्धत ऐकून आहे).

आसमंतात तारे सर्व निळेच , नाहि का?

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 08/04/2011 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
आसमंतात तारे सर्व निळेच , नाहि का? नजरेत भरतील मात्र सर्वेच, तसे नाही. पानं झाडांवर किती तरी हिरवे, बघ जरा पण सुखावतील नजरांना सर्वे, तसे नाही. मग प्रेम तरी का व्यक्त व्हावे माझे मग का मी वेड्या सारखे वागावे माझे वेडेपण आवडेलही कुणाला पण तुलाच आवडेल, तसे नाही. प्रेमाच्या परिभाषेत बसणारे शब्द सारे बसतील तुझ्या-माझ्या भाषेत, तसे नाही. हातात धरून हात कदाचित धरु ती वाट अन मन माझे शोधेल एक घर पाखरांचे फुलतीलही स्वप्न कदाचित त्या बागेत पण येईल वास त्या फुलांस, तसे नाही. आसमंतात तारे सर्व निळेच , आज ही. चमकतील मात्र सर्वेच रात्री, तसे नाही.

पिंक जिव्हारी गर्दुल्ल्याचे नकादु चेण्यापका सके

लेखक शरदिनी यांनी शुक्रवार, 08/04/2011 02:16 या दिवशी प्रकाशित केले.
नावाड्याचे वल्हे नशीले, गुलाबातुनी उरात घुसले मस्त धुराडे शीतल हाले,लोचट गहिरे क्षण गर्दुल्ले वृंदगान : वल्ला वल्ला वल्ला वल्ला आर्त मदारी लक्षण ढोले, कहासुनीचे तुमन्त छोले तन डोले अन मन भी डोले, नाक्यावरचा शेट्टी बोले ss वृंदगान : :इडलीडू sss इडलीडू sss नटवे फ़ुटवे थंडी बिस्तर, कोलमाईनी सलज्ज प्रस्तर शाहीरबाबा थाप डफ़ावर, हिप्परग्याचा थ्रोट शिरावर वृंदगान : हावडू यू sssहावडू यूsss चंद्रचांदणे अतीव सुट्टी, उठता लत्ता बसता पल्टी रेडिओभट्टी कडबाकुट्टि, गदामा ओबिया अट्टीबट्टी वृंदगान : प्प्पंजाबी प्प्प्प्प्पंजाबी श्वेतलाजरी पणती नाचे , धडुतेवाली हिप्पा शेके काफ़ी कॉफ़ी ब्राउन ग
काव्यरस

जपान मध्ये पुन्हा भुकंप

लेखक विनायक बेलापुरे यांनी गुरुवार, 07/04/2011 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
जपान मध्ये नुकताच पुन्हा एकदा भुकंप झाला आहे. हा भुकंप ७.१ रिश्टर चा असून ११ मार्च च्या भुकंपाहऊन त्याचा केंद्र बिंदू जपानच्या अधिक जवळ आहे. सुनामीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.