Skip to main content

अगम्य

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 09/04/2011 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
काल बर्‍याच वर्षांनंतर ठाण्याला जायचा योग आला. मीटिंग होती ती टाळण्याकडेच माझा कौल होता. २ तासांची मीटिंग आणि ६ तासाचा प्रवास हे काही मला न झेपणारे समीकरण आहे. पण फक्त ठाण्याला मीटिंग आहे म्हणुन शोध घेतला तेव्हा कळाले की मीटिंग थेट शाळेच्या शेजारच्या इमारतीत आहे. मीटिंगबद्दल अनुत्साही असलेला मी त्यामुळे एकाएकी उत्साहाने कामाला लागलो. बरोबर २-३ सहकारी होते. सगळ्यांना फोनाफोनी करुन मीटिंगला उशीर होउ नये यासाठी लवकर निघाले पाहिजे असे ढोल बडवले. त्यामुळे ११ च्या मीटिंगसाठी ७ वाजताच निघालो. त्यामुळे अर्थातच लवकर पोचलो. ठाण्यात शिरताना जुन्या खुणा शोधत होतो.

निमंत्रण

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 09/04/2011 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर लोकांना वादविवाद घालायला अथवा काथ्याकूट करायला फार आवडते. अशांसाठी आज एक कार्यक्रम आहे आज दि. ९ एप्रिल २०११ रोजी राजीव साने यांची पहिली मांडणी खालील विषयावर असेल. “युक्तिवाद म्हणजे क्लुप्तिचातुर्य नव्हे!” (वादविवादातील हमखास भरकटवणारे प्रकार, फॅलसीज) वेळ: संध्याकाळी ६.०० वाजता मांडणीला सुरुवात होईल. त्यापूर्वी पोचावे ही विनंती. स्थळ: मनीषा सोसायटीचे सभागृह, नवसह्याद्री जवळील अलंकार पोलीस चौकीकडून प्रतिज्ञा मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर `देवेश, (चितळे बंधू अधिकृत विक्रेते)” या दुकानाच्या रस्त्याला वळावे.

हे पुस्तक कुणाच्या पहाण्यात आहे काय ???

लेखक ईश आपटे यांनी शनिवार, 09/04/2011 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
नाव-स्वर्गरहस्य लेखक- खरे किंवा दुसर काही नाव ही असेल प्रकाशक- व्हीनस प्रकाशन , पुणे मी प्रकाशकांकडे चौकशी केली , पण त्यांनी ते आउट ओफ प्रींट असल्याचे सांगितले... माझ्या नेहमीच्या ग्रंथालयातुन जे १०० वर्षे जुने आहे..., ते पुस्तक कोणी नतद्र्ष्टाने पळवळले आहे... कृपया कुणाला ह्या पुस्तकाबद्दल माहिती असल्यास कळवावी..........

ठकू आणि लच्छी!

लेखक नीधप यांनी शनिवार, 09/04/2011 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
माझाच एक जुना लेख टाकतेय इथे. ------------------------------------------------ एकदाची ठकू लिहायला बसली तिनं ठरवलं आपल्या सगळ्यात आवडत्या मैत्रिणीवर, नाचर्‍या लच्छीवर लिहायचं. ठकू लिहायला बसली आणि लच्छी काही नाचून दाखवायला तयार नाही. कंटाळून ठकी तिथून उठायला लागली आणि लच्छी समोर येऊन बसली. "अशी कशी गं तू? लच्छी सापडायची तर लच्छी बनायला नको? ये चल टाक पावलं माझ्याबरोबर.." ठकूचा हात धरून लच्छी घेऊन गेली. ही लच्छी आहे पु. शि. रेग्यांच्या 'सावित्री' मधे, त्यातल्या एका गोष्टीत. लच्छी आणि मोराच्या गोष्टीत.

मेथांबा

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 08/04/2011 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः २ कप कैरीची सालं काढून केलेले तुकडे १ कप चिरलेला गूळ १ टीस्पून मोहरी १ टीस्पून मेथीदाणे १ टीस्पून लाल तिखट (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे) चिमूटभर हिंग (फोटोत साहित्यासाठी चमच्यात हिंग दाखविले आहे) :) मीठ चवीप्रमाणे तेल . पा़कृ: जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी व मेथीदाणे टाकावे.

तुझ्या सावलीस लपता लपता

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 08/04/2011 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा देत आहे ही रचना.. ------------------ तुझ्या सावलीस लपता लपता जात होतो गल्लीत अंधार जसा कुठे होते ठाऊक तरी मला भेटशील तिथं ही तु अशी वेड्यावानी माझी वाट बघता विखुरले काच असे आज खाली असंख्य तुकड्यांमधे तारेच ओठी लागायचे माझ्या कधी नजर काढून माझी झाले रक्तरंजित विघ्न जणु माझे हरता शोधत राहिले ते सारे त्याला त्या घरातच हसु न आवरले मज पाहाता पाहाता गुंतले होते मन कुणाचे किती बघत जड होता तो कोपर्‍यात उभा दाटुन होते मन त्याचे जाता जाता राहिले रिकामेच ते घर त्याच्या गेल्यानं न आलेच मृत्युही तिथे राहावयास कधी एकटेपण आले मग असे काही शेजार कुणी नसलेले जगले काही काळ निनाव राहता

ठाणे कट्ट्यावर उतारा....

लेखक कुंदन यांनी शुक्रवार, 08/04/2011 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
एका स्पाम मेल मध्ये ठाणे कट्ट्याचा मेनु पाहिल्यापासुन अंमळ त्रास होत होता. विकांताचा सदुपयोग करावा म्हणुन मग शेव भाजी न चपाती चा एक प्रयत्न करुन पाहिला. भाजी साठी साहित्यः १ वाटी सुके खोबरे. १ मोठा कांदा. २ मिरच्या २ लसुण पाकळ्या ( सोलुन) छोटा आल्याचा तुकडा १/२ टि स्पुन लाल तिखट १ टि स्पुन मसाला. १ वाटी लाल शेव सुके खोबरे लालसर भाजुन घेणे. कांदा साफ करुन तो देखील मिरच्यांबरोबर भाजुन घेणे. भाजलेले वरील जिन्नस , तिखट , मसाला , हळद ई. मिक्सर मधुन फिरबुन घेणे. एका कढईमध्ये तेल तापवत ठेवणे.