Skip to main content

सत्य साईबाबांचे नावच गूढ

लेखक माझीही शॅम्पेन यांनी सोमवार, 25/04/2011 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच सत्य साईबाबांचे निधन झाले ८६ वर्षाच्या महापुरुषचा चमत्कारी बाबचा अंत झाला १९४० साली त्यानी स्वता:ला आपण साईबाबांचे अवतार आहोत अस जाहीर केल. १९५४ साली पुत्तपर्थि येथे त्यानी पाहिल हॉस्पिटल काढल , पुढे अनेक ठिकाणी त्यानी कॉलेज , हॉस्पिटलस आणि यूनिवर्सिटी काढल्या.

हत्ती, घोडे, उंट!

लेखक रेवती यांनी सोमवार, 25/04/2011 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
दोन महिन्यापूर्वी चिरंजिवांचा शाळेतला चेसक्लब बंद झाला आणि टाऊनच्या लायब्ररीत दर दोन अठवड्यांनी होणार्‍या बुद्धीबळ स्पर्धेला जायला सुरुवात झाली. अर्थातच बाबा त्याला घेऊन जात असतात. गेल्या दोन अठवड्यांपासून मात्र मलाही तयारीत ओढण्यात आले......... म्हणजे त्यांच्या गटातून बाहेर काढले गेले. डाव चालू असताना मध्येच येऊन जेवणासारख्या कमी महत्वाच्या गोष्टींसाठी न बोलावणे, दिनक्रमाची सक्ती न करणे, हत्ती, घोड्यांच्या भाषेत बोलल्यासच म्हणणे ऐकणे, असे प्रकार सुरु झाले. भारतीय क्लबतर्फे दरवर्षी होणारी बुद्धीबळ स्पर्धा जवळ आल्याची सगळी लक्षणे होती.

राडा...? छे छे! संशयकल्लोळ!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 24/04/2011 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या काही कलाकारांना पुण्यात धुंद अवस्थेत "मोकळ्या' वातावरणात फिरताना पोलिसांनी पकडलं. त्यांच्याबद्दल पेपरात भरपूर बदनामीकारक बातम्या छापून आल्या. खरंतर चांगल्या घरातल्या, सालस, सज्जन अशा या कलाकारांनी काहीच केलं नव्हतं. त्यांच्या जराशा मोकळेपणाच्या वागण्यानं त्यांच्यावर निष्कारण बालंट आलं होतं, हे त्यांनी स्वतः आणि त्यांच्या पालकांनीही केलेल्या खुलाशांवरून स्पष्ट झालं.

रिक्रिएशन

लेखक सूर्य यांनी रविवार, 24/04/2011 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
चित्र बर्‍याच महिन्यांपुर्वीचे आहे परंतु कुठेही शेअर केलेले नाही. प्रथम इथेच डकवतोय. थोडे वेगळ्या प्रकारामधले छायाचित्र टाकण्याचा प्रयत्न केला असल्याने कसे आले आहे ते मिपाकरांनी जरुर सांगावे. Recreation - सूर्य.

"भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-८ "सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 24/04/2011 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
"भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-८ "सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय" मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे © सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने) या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत

मेक्सिकन चिकन बरीतो विथ स्मोक्ड टोमॅटो -गार्लिक सॉस

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 24/04/2011 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
चिकन साहित्यः ५०० ग्रा साफ करून , तुकडे केलेले चिकन १/२ वाटी प्रत्येकी लाल, पिवळी व हिरवी भोपळी /ढब्बु मिर्ची १ बारीक चिरलेला कांदा २-३ लसुण पाकळ्या बारीक चिरून १/२ कप टोमॅटो सॉस १/२ कप पेरी-पेरी सॉस (हा जर नाही मिळाला तर तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिर्ची किंवा हॅलेपिनो मिरची वापरू शकता, हा सॉस ऑपशन्ल आहे ) मीठ चवीनुसार १/२ टीस्पून काळीमिरीपूड १ वाटी पाणी २ टेस्पून ऑलिव ऑइल तयार टॉरटीला .

प्रिय सच्यास

लेखक चतुरंग यांनी रविवार, 24/04/2011 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
२४ एप्रिल हा सण कधीचाच जगभर साजरा होतोय. भारतात तर शेकडो, हजारो लोक केक कापून त्यांचा स्वतःचा वाढदिवस असल्याच्या थाटात तो साजरा करतात. आम्ही तुझ्यापर्यंत पोचू शकत नाही...तेही खरं नाही म्हणा तूच आमच्यात आहेस त्यामुळे आम्ही कुठे पोचायचं हा प्रश्नच आहे! तुझं अभिनंदन. लोक तुला क्रिकेटमधला देव मानतात पण खरं सांगू तू देव नाहीस, निदान मी तरी मानत नाही. देव बनणं तसं फार सोपं असतं, दगडालाही शेंदूर फासला की देवपण येतं.

क्षण

लेखक निनाव यांनी रविवार, 24/04/2011 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण वाहणारे हातातून निसटणारे येतील का पुन्हा जुळून विसरता न येणारे क्षण भरणारे आठवणींतून झरणारे येतील का पुन्हा दाटून बु़जवता न येणारे क्षण चमकणारे निराशेस विझवणारे येतील का पुन्हा उजळून लपवता न येणारे कुणास ठाऊक ते येतील कधी धरतील हातात हात मैत्रीचे कधी मिठीस घेऊन एक्-मेकांस विसरणे चुकांस शक्य होईल का पुन्हा क्षण लांबणारे हवे हवेसे ते वाटणारे येतील का उतरून पुन्हा आयुष्यास ते हसवणारे - निनाव २४ अप्रिल २०११

सावरकर आणि समाजकारण - पु.ल. देशपांडे

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 24/04/2011 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
--------------------------------------------------------------------- 'सावरकरांच्या जिवनातली प्रत्येक घडी ही आत्मार्पणाचीच होती' --------------------------------------------------------------------- नुकताच किसन शिंदे यांनी पु.ल.देशपांडे यांच्या एका भाषणाचा संदर्भ दिला होता. ते भाषण वाचताना आणि त्यातील स्वा.सावरकरांच्या उल्लेखाने त्यांच्याच अजून एका सुंदर भाषणाची आठवण जागी झाले. स्वा. सावरकरांच्या पुण्यतिथीला, २६ फेब्रुवारी १९८३ ह्या दिवशी, अंदमानच्या सेक्युलर तुरूंगातील मैदानात पु.ल.देशपांडे यांनी भाषण केले होते.