किल्ली हरविली
हरवली आहे एक किल्ली
मनाच्या कपाटात बंद केलेली गुपिते
ओरखडे न पाडता बाहेर काढणारी
हरवली आहे एक किल्ली
बंद केलेल्या कानांचे कुलूप उघडून
वादविवादात मूकपणे आक्रोशणारे सत्य ऐकणारी
हरवली आहे एक किल्ली
अपचनानंतर देखील उफ़ाळलेली भूक शमवून
दयेची कोठारे उघडणारी
हरवली आहे एक किल्ली
अन्यायाच्या वणव्यात विझलेली वाणी चेतवून
क्रांतीचा वणवा धडधडा बाहेर पाडणारी
हरवली आहे एक किल्ली
प्रौढत्वाच्या बेडयांमधे जखडलेले
शैशवाचे निरागसपण मुक्त करणारी
मिसळपाव
(वरील दोन समांतर पाठ्ये जमल्यास एकत्र वाचावीत - आधी एक, नंतर दुसरे, असे नको - अशी वाचकांना विनंती आहे. ज्यांना हे जमवायचे नसेल, त्यांनी असे मानून विचार करावा : या दोन पाठ्यांची श्राव्य जुगलबंदी आहे. ती ऐकण्यासाठी 