Skip to main content

बालगंधर्व...

लेखक नानबा यांनी मंगळवार, 10/05/2011 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी चित्रपटांना सध्या सुगीचे दिवस आलेत असं म्हणतात.. त्याचीच पुन:प्रचिती देणारा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे नितीन देसाई निर्मित आणि रविंद्र जाधव दिग्दर्शित बहुचर्चित "बालगंधर्व". मुळात बालगंधर्व या विषयाला हात घालण्याचं साहस करणं म्हणजे तसं कठिण. त्यात इतक्या वर्षांनंतर बालगंधर्वांना नव्या पिढीसमोर सादर करणं त्याहून कर्मकठिण. हे धनुष्य पेलायला एखाद्या ताकदवान निर्मात्याची गरज होती. आणि मराठीत सध्या नितीन देसाईंशिवाय दुसरा कोणी हे करायला धजावला देखील नसता.

घोटाळ्यातच करिअर....

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 10/05/2011 05:23 या दिवशी प्रकाशित केले.
आता आम्ही दररोज पेपर वाचतो आणि चाट पडतो. कारण फ्रँटपेजवरच्या बातम्याच तशा अचाट असतात, कोट्यावधींच्या हिशोब मांडणाऱ्‍या अन् मागणाऱ्‍याही. आम्ही चक्रावून जातो जेव्हा आमचंही नाव 'माथा बडवत्या पोज'मधील फोटोसहीत छापून येतं. आमच्या अचाट कर्तृत्वाची अनेक पाने साक्षीदार असली तर त्यातील महत्वाची पाने गायब करण्याचं कसब आमच्या अंगी बाणवल्यामुळे आमच्या कारभाराची 'गैर' गणती होऊच शकणार नाही हे आम्ही छातीठोकपणे (जाहीर सभेतही) सांगू शकतो. तसे म्हणाल तर आम्ही मँट्रीक फेल नामक डिग्रीचे.

ट्युलिपोत्सव

लेखक मराठे यांनी मंगळवार, 10/05/2011 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल संपून मे महिना उजाडला तरी खर्‍या अर्थाने वसंत ऋतूचं दर्शन काही आम्हा अभाग्यांना झालेलं नव्हतं. नाही म्हणायला उगाच कुठेतरी एखादं झाड पालवलं होतं पण बरेचशी झाडं अजून निष्पर्णच होती. हवा सुधारेल सुधारेल म्हणता म्हणता ऋतू अर्धा संपत आला. मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात (मे ८ ते मे १४) मिशिगन मधल्या हॉलंड या गावी ‘ट्युलिप उत्सव’ असतो. ह्यावर्षी तिथे जायचं असं आम्ही काही महिन्यांपूर्वीच ठरवलं होतं. पण एकंदर हवामान पाहता तिथे जाऊन निराशा तर होणार नाही ना अशीच धाकधूक वाटत होती. पण देवाला आमची दया आली असावी आणि चक्क शनिवारी पाऊस होणार नाही असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.

पाककृती : आमरस

लेखक शाहरुख यांनी सोमवार, 09/05/2011 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : पिकलेले आंबे, पातेलं, कणभर मीठ १. हात स्वच्छ धुवा. २. बनियन काढा..वातानुकुलित घरात रहात नसाल तर कृती करायच्या मोसमात शर्ट घातला नसेलच..शर्ट असेलच घातलेला तर शर्ट काढून मग बनियन काढा..स्त्री वर्गाने एखादा जुना अ‍ॅप्रन चढवावा. ३. प्रत्येक आंबा जरासा पिळून देठाजवळील चिक काढून टाका..आणि मग पिळून रस पातेल्यात जमा करा. ४. काही मंडळी रस मिक्सरमधून काढतात..शप्पथ आहे तुम्हाला असे कराल तर..हातानेच रस एकजीव करा. ५. कणभर मीठ घाला..आंबे निवडताना फसले गेला नसाल तर साखर घालायची गरज नाही..जरा ढवळून घ्या. ६.

पु.ल. आणि अत्रे-एक दर्पण

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 09/05/2011 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या कवितेच वर्गिकरण मि हास्य रसात केलय,पण मुलत: तो असला नसला तरि फारसा फरक पडणार नाहि.कारण हास्यरस हा या दोन माणसान्च्या व्यकक्तित्वाचा अविभाज्य घटक होता.दर्पण हे या कवितेच न्निवळ नाव नसुन तो खरच या कवितेचाहि स्वभावधर्म आहे...हास्यवेदाचार्य-आचार्य अत्रे आणि हास्ययज्ञनारायण-पु.ल.देशपान्डे...यान्ना अर्पण... १)कधि कधि मि पु. ल.न्चा,कधि कधि मि अत्र्यान्चा.प्रश्न उरतो मधे फक्त वेलान्ट्या आणि मात्रान्चा२)पु.ल.म्हणत भगवन्त ना,तो तुमच्या साथ आहे.अत्रे म्हणत भगवन्त ना,तो तुमच्या 'आत' आहे.३) म्हणजे पु.ल न्च खद्य हे,दहि आणि भात होते.
काव्यरस

प्रेम आणि मरण

लेखक ajay wankhede यांनी सोमवार, 09/05/2011 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
निघालो क्षितिजा स गवसणी घालायला अश्वमेघ सोडला दिग्विजयी व्हायला सळसळते रक्त, धगधगते मन, चौफेर उधळले वारू मनाचे सर केले अवघड मनोरे स्वन्प्नांचे रणधुमाळीत या सार्‍या विसरलो सखे “प्रेम” काय चीज असते ते इतका बे दर्दी कसा झालो कळलेच नाही कळलेच नाही तुझ्या डोळ्यातील भाव नकळतच झेलत राहिलो प्राक्तनाचे घाव जगण्याचे संदर्भ हि विसरलो मरणा च्या वाटेवर नि आज ...जीवनाच्या वळणावर एकटाच अजेय परतीचा प्रवासी दमलेले थकलेले प्रारब्ध.. जीवन कुठेच थांबत नाही हे हि खरेच थांबलास तर संपलास हे हि खरेच पण चुकणार नाही आता जीवंतपणीच घेणार अनुभव मरणाचा करणार “प्रेम” तुटून आता परतीच्या वाटेवरील लेऊन घेण

दोन लार्ज -एक सिमॉल ..

लेखक रामदास यांनी सोमवार, 09/05/2011 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी ज्या बारचा आश्रयदाता आहे त्या बारला फिफ्टी प्लस बार म्हणायला हरकत नाही. इथे फारशी गर्दी नसते.माझ्या वयाची माणसं फक्त दारु पिण्यासाठीच येतात. गप्पा नाहीत- बिझीनेस डील्स नाहीत.दारु पिणे आणि रिघणे. वेटर दोन पेगचा कोटा एकदाच काय तो टेबलवर आणून ठेवतो आणि टिव्ही बघत बसतो. संभाषणही फारसं काही नसतं .आठवड्यातून एकदाच एक प्रश्न विचारतो. उत्तर मिळालं की दुसर्‍या दिवशी शंका विचारतो. पावणेअकराला चखण्याची डिश न विचारता उचलून ठेवतो. अकराला दहा मिनीटे असताना बिल गोळा करतो . अकरा वाजता रीक्षा बोलावतो.