Skip to main content

फुलेच फुले

लेखक जागु यांनी शुक्रवार, 15/07/2011 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
ही सगळी फुले मी गो-ग्रिन ते माहेर येथुन कॅमेर्‍यात साठवुन घेतली आहेत. अ‍ॅडेनियम गो-ग्रिन नर्सरीतले. १) गुलाबी अ‍ॅडेनियम २) लाल अ‍ॅडेनियम

निरोप नाही, फक्त आभार!

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 15/07/2011 06:14 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच्या बाँबस्फोटासह नुकत्याच घडून गेलेल्या क्लेशदायक घटना ऐकल्या; अगतिक, हताश व्हावं अशा जळजळीत कविता वाचल्या, लेख आणि प्रतिसाद वाचले, आणि परदेशात नेहेमीच वाटणारी असहाय्यता उफाळून आली. पण वाईटातून चांगलंही काही घडतं आहे हे दर्शवणार्‍या काही गोष्टी नजरेला पडल्या. व्यवस्थेतली केवळ छिद्रंच शोधण्यापेक्षा काही आशादायक कणही गोळा करावे, आणि त्या कणांचं जाणीवपूर्वक हव्या त्या ठेव्यात रुपांतर करावं अशी शिकवण देणारे माझे आजोबा आठवले.

दहशतवाद - मी काय करू शकतो?

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 15/07/2011 06:13 या दिवशी प्रकाशित केले.
कोणताही दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संताप दाटून येतो! सरकारच्या नावाने खडे फोडले जातात, मिडियाला शिव्या घातल्या जातात, अमेरिका आणि इस्राएलचा धडा भारताने गिरवावा वगैरे मागण्या होतात, संतापाच्या भरात, 'संपवा यांना' वगैरे सारख्या कडवट प्रतिक्रिया दिल्या जातात. यातले काही घडत नाही किंवा घडू शकत नाही म्हणून मग चरफडत बसणं... पण या पलिकडे जाऊन, मी माझ्या परीने अगदी छोट्या पातळीवर दहशतवादा विरुद्ध लढण्यासाठी काय करू शकतो? याविषयी माहिती देऊ-घेऊ या.
  • तुमचा उपाय कितीही साधा सोपा असला असला तरी येथे नक्की द्या.
  • तुम्ही काय केले हे दिलेत तरी चालेल.

दहशतवाद आणि प्रतिक्रीया

लेखक विकास यांनी शुक्रवार, 15/07/2011 05:06 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दशकापासून भारतास दहशतवादी हल्ल्यांनी ग्रासले आहे. तसे म्हणायचे झाले तर पंजाब प्रश्न जेंव्हा भडकला होता तेंव्हा देखील भारतात अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले होतेच. पण (त्या हल्ल्यांची बाजू न घेता) फरक म्हणाल तर इतकाच होता की त्यांच्यावर (शिखांवर) झालेल्या अथवा त्यांना वाटणार्‍या अन्यायाने आणि त्यासंदर्भात स्वतःची पोळी टिकवण्यासाठी त्यांना खेळवाणार्‍या तत्कालीन राज्यकर्त्यांमुळे उठलेला पण मर्यादीत भूभाग आणि राजकीय कारणांवरून उडालेला तो भडका होता. त्यामुळे त्यावर शस्त्र आणि समझौता या तोडग्यांनी पायबंद घालता आला. कारण एकूण शिख समाजाच्या भारताविषयीच्या आस्थेबद्दल कोणी शंका घेऊ शकत नाही.

१३ जुलै २०११ आणि नंतर...

लेखक सुशान्त यांनी गुरुवार, 14/07/2011 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
धडाड धुरळा उडतो गगनी पुन्हा भय जनी दाटते गा एकमेकां सारे सावरू धावती निस्तरू पाहती पुन्हा तेच सुटकेचा कोणी टाकती निःश्वास कुणाचा प्रवास संपलेला विव्हळत जागे कोणी वेदनांत कुठे डोळियांत पाणी साचे चित्रवाणीवर वृत्त साकळते जगाला कळते घडले ते परिस्थिती कोणी सांगे विवरून काय हो कारण घडे त्याचे निषेधाचे कुणी पेटवी पलिते शांत राखा माथे म्हणे कोणी कुणी म्हणे धन्य धन्य नागरिक शूर नि सोशिक धैर्यवंत उलटते रात येता येता नीज पुन्हा नवा आज उजाडतो भयशंका मनी दाटल्या घेऊन चालती गा जन तीच वाट कुजबुज कुठे संताप थोडासा अगतिकचासा एक एक पोट शिकविते धैर्य ते अटळ अन्य काही बळ नाही तेथे

स्वतःचे मत मांडा

लेखक शुचि यांनी गुरुवार, 14/07/2011 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
परवा मी एक खूप छान लेख वाचला. "व्यवस्थापन/नेतृत्व/ऑर्गनायझेशन कल्चर" आदि विषयांतर्गत येणारा असा हा लेख होता. त्याचा थोडक्यात गोषवारा पुढीलप्रमाणे - प्रत्येकाकडे बोलण्यासारख्या काही गोष्टी असतात, प्रत्येकालाच मते असतात. ऑफीसमध्ये देखील "वर्क कल्चर" अगदी संपूर्ण आदर्श कोणालाच वाटत नसते. काही बदल सुचवावेसे वाटत असतातच. पण बहुसंख्य लोक हे आपले मत गुलदस्त्यात ठेवतात, बोलून दाखवत नाहीत. भीती, संकोच, भीड अनेक कारणे त्यापाठी असतात त्याचबरोबर "सवय" हेदेखील कारण असते.

झटपट काजु-खोबर्‍याचे लाडू

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 14/07/2011 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः अडीच वाट्या डेसीकेटेड कोकोनट (सुक्या खोबर्‍याचा कीस) पाऊण वाटी कडेंन्सड मिल्क एक वाटी काजुपूड दीड चमचा साजुक तुप ३-४ चमचे पिठीसाखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त, कडेंन्सड मिल्क असुनही थोडी पिठीसाखर घालावी लागते कारण सुक्या खोबर्‍यामुळे गोडवा कमी होतो). १ छोटा चमचा वेलचीपुड - पाकृ: तुपात डेसीकेटेड कोकोनट खमंग, चांगला परतून घेणे.

उपचार

लेखक जयनीत यांनी गुरुवार, 14/07/2011 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
काय अर्थ आहे हया उपचाराचा? गोळया, औषधं ह्यानी ह्यांचीच चव रेंगाळते नुसती तोंडात! वरुन इंजेक्शन चा त्रास, पथ्य पथ्य म्हणून कही मनासारखं खायलाही बन्दी. कुठे बाहेर येणं जाणं ही बंद. मग हे सगळं कशासाठी? जगण्यासाठी? ह्याला काय जगणं म्हणायचं? बायको भाग्यवानच म्हणायची लवकरच सुटली ह्या सगळ्या जाचातून. त्यांना आज खुप जुने जुने मित्र आठवत होते अगदी लहान पणीचे शाळा कॉलेज मधले.

दहशतवादावर प्रॅक्टिकल उपाय भारताकडे आहे का?

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 14/07/2011 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
काल मुंबईवर आतांकवादी हल्ला झाला...नेहमीप्रमाणेच.. खरंतर हे दुर्दैव की 'नेहमीप्रमाणे' हा शब्द वापरावा लागावा! :( आधी बसलेला धक्का, मग दु:ख, मग उद्वेग आणि शेवटी चीड या क्रमाने माझ्या भावना बदलल्या. मग सुरू झाले ते प्रतिक्रीयांचे पूर. "नालायक सरकार" पासून ते "कसाब" आणि "षंढ समाजा"पासून ते "परकीय शत्रु" पर्यंत मी अनेकांना दुषणे दिली. आणि तुमच्या-माझ्यासारख्यांच्या या कोलाहलाचे रुपांतर "सरकार" या आपल्यातील एका संस्थेला टारगेट करण्यात झाले.