साहित्यः
अडीच वाट्या डेसीकेटेड कोकोनट (सुक्या खोबर्याचा कीस)
पाऊण वाटी कडेंन्सड मिल्क
एक वाटी काजुपूड
दीड चमचा साजुक तुप
३-४ चमचे पिठीसाखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त, कडेंन्सड मिल्क असुनही थोडी पिठीसाखर घालावी लागते कारण सुक्या खोबर्यामुळे गोडवा कमी होतो).
१ छोटा चमचा वेलचीपुड
पाकृ:
तुपात डेसीकेटेड कोकोनट खमंग, चांगला परतून घेणे.
दुसर्या बाऊलमधे कडेंन्सड मिल्क, काजुपुड, पिठीसाखर व वेलचीपुड घालून, मिक्स करणे. (गुठळ्या होऊ न देणे)
आता त्यात जितके मावेल तितके परतलेले डेसीकेटेड कोकोनट घालणे.
तयार मिश्रणाचे लाडू वळ्वणे व थोड्या डेसीकेटेड कोकोनटमध्ये घोळवणे.
लाडू खाण्यास तयार आहे.
वाचने
10310
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त आहे गं.... चव एकदम मस्त
मेलो, खपलो, तुमचं करणं आणि
धन्यु
In reply to मेलो, खपलो, तुमचं करणं आणि by ५० फक्त
अतिशय सुंदर दिसताहेत....नक्की
यम्मी!!!!!!!!!!
छानच गं! फोटू आवडले.
मार डाला!
यम्मी ....
लाडू आणि तेही "काजु" युक्त
मस्त
सगळ्यांना धन्यवाद
छान !
वर आणतेय हि रेसिपी.दिवाळीला