वरचा "सा"
आज आमच्या लग्नाचा आठवा वाढदिवस .....
आज आमच्या संसाराच्या सुरावटीने वरचा "सा" गाठला ...
पहाटे पहाटे उगाच मला पल्लवी जोशी चा भास झाला ... आणि ती कर्ण कर्कश्श आवाजात ओरडली "एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, वरचा "सा", वाः क्या बात है !". मी आपले सगळे स्पर्धक करतात तसे खोटे खोटे "हि हि हि, धन्यवाद" वगैरे केले ... आणि उठलो. पहिले तर गेल्या आठ वर्षातले सगळे चढ उतार समोर परीक्षक म्हणून उभे होते ... अनेक वेळा डेनजर झोन मधून बायकोच्या साथीने मी शिताफीने बाहेर आलो ... कित्येक वेळा फ़क़्त तिच्याच मतांचा आधार होता. दिवसाची अशी अपेक्षित सुरुवात झाल्यावर कसे अगदी routine मध्ये असल्यासारखे वाटते ...
मिसळपाव