Skip to main content

वरचा "सा"

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 20/07/2011 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज आमच्या लग्नाचा आठवा वाढदिवस ..... आज आमच्या संसाराच्या सुरावटीने वरचा "सा" गाठला ... पहाटे पहाटे उगाच मला पल्लवी जोशी चा भास झाला ... आणि ती कर्ण कर्कश्श आवाजात ओरडली "एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, वरचा "सा", वाः क्या बात है !". मी आपले सगळे स्पर्धक करतात तसे खोटे खोटे "हि हि हि, धन्यवाद" वगैरे केले ... आणि उठलो. पहिले तर गेल्या आठ वर्षातले सगळे चढ उतार समोर परीक्षक म्हणून उभे होते ... अनेक वेळा डेनजर झोन मधून बायकोच्या साथीने मी शिताफीने बाहेर आलो ... कित्येक वेळा फ़क़्त तिच्याच मतांचा आधार होता. दिवसाची अशी अपेक्षित सुरुवात झाल्यावर कसे अगदी routine मध्ये असल्यासारखे वाटते ...

मरणाची अवस्था

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 20/07/2011 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
विषय तसा बोजड, सर्वसामान्यांना न आवडणारा आहे. या पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक सजीव कधीना कधी मरतोच. त्याच्या मरण्याच्या तर्‍हा, कारणे वेगवेगळी असू शकतात. पण होणारा मृत्यू एक शाश्वत घटना असते. एकांतात मनात मृत्यूविषयी विचार कधीकधी येतात. रातीच्या वेळी अर्धवट झोपेत कधीकधी मरतांनाची स्थितीची कल्पना येवू शकते. माझा झोपेत श्वास अडकतो. झोपेत चुकून छातीवर झोपल्या गेले तर हमखास असे होते. मोठ्याने ओरडून जागे व्हावे लागते. नेटवर पाहिले असता जीभ मागे जावून श्वासमार्गात अडथळा आणते असे काहीतरी आजाराचे स्वरूप आहे.

गुगल वर मराठी यावी म्हणून मागणी

लेखक निनाद यांनी बुधवार, 20/07/2011 05:48 या दिवशी प्रकाशित केले.
गुगलने गुजराती पासून कन्नड पर्यंत भाषांच्या भाषांतराची सोय केली आहे पण त्यातून मराठीला वगळण्यात आले आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी भरत गोठोसकर यांनी एक ऑनलाईन मागणी बनवली आहे. याद्वारे किमान काही आवाज तरी निर्माण होईल अशी आशा आहे. आपल्या लेखात भरत म्हणतात, 'भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे.

मेदुवडा

लेखक गणपा यांनी बुधवार, 20/07/2011 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली किचन मध्ये जाउन काही खास बनवण्याचा उत्साह नसतो. पण दुपारी एका मित्राने फोन केला. फोनवर माझ्या ब्लॉगच बरच कौतुक केल. (आमच विमान लगेच हवेत.) मग त्याने हळुच पिल्लु सोडलं की तो संध्याकाळी घरी येतोय. (हवेतल्या विमानाच क्रॅश लँडिंग.) आता आयत्या वेळी काय करावं बरं? थोडा वेळ डोक खाजवल्यावर संध्याकाळच्या खादाडीसाठी मेदुवडे करायच ठरवलं. लंच टाईम मध्ये घरी जाउन डाळ भिजत घातली.

पंढरीची वारी: मूल्य शिक्षण व व्यवस्थापन अभ्यासाचे अद्वितीय माध्यम.डा. संजय होनकळसे

लेखक dr sanjay honkalse यांनी मंगळवार, 19/07/2011 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
पंढरीची वारी: मूल्य शिक्षण व व्यवस्थापन अभ्यासाचे अद्वितीय माध्यम.डा. संजय होनकळसे :M.A.,M.Phil.,M.D.,M.Com.,LL.B. भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे .भारतात संस्कृतीची गुंफण समाज व धर्म यांच्याशी सांगड घालून शास्त्रोक्त पद्धतीने सण, उत्सव, व्रत वैकल्ये, तीर्थाटन साजरी होतात व याला पारंपारिकता आहे. एवढी विविधता व परंपरा इतर कुठल्याही देशात व धर्मात आणि ती ही शास्त्रोक्त बैठकीवर आधारलेली आढळत नाही. तीर्थाटन, शिक्षण व निरीक्षण हे भारतात परंपरेने तीन महागुरू म्हणून संबोधले जातात. तीर्थे ही ऊर्जास्त्रोत मानली जातात. भारतातीय इतिहास व संतही याचे समर्थनच करतात.

ब्राऊ-२

लेखक गवि यांनी मंगळवार, 19/07/2011 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
3

माझी नवीन चित्रे

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 19/07/2011 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
माझी काही नवीन चित्रे: ही चित्रे माझ्या अनेक वर्षांच्या चित्रकलेतील खटाटोपींतून हळूहळू विकसित होत गेलेल्या स्वतःच्या शैलीतील आहेत. चित्र सुरु करताना ते कसे होणार आहे, म्हणजे बरे वाईट असे नव्हे, तर या चित्रात मी काय काय आणि कसे चित्रित करणार आहे, याची काहीही पूर्व कल्पना मला नसते. एक एक चित्र अनेक दिवस चालत रहाते... सुरुवतीला काही अनिश्चित असे रंग-आकार कॅनव्हास वर पसरवून ठेवतो, त्यातूनच कल्पनेला चालना मिळत जाऊन चित्र आकार घेत जाते. असे असले, तरी माझ्या अनेक चित्रात प्राचीन जागा, मंदिरे, राजवाडे, वडाच्या पारंब्या, मातीची घरे, ढग वगैरे असते...

यंदा कर्तव्य आहे??

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 19/07/2011 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
आजच मटामध्ये ही मजेशीर बातमी वाचली आणि मटाची पातळी कुठवर उतरलीय याचे परत एकदा प्रत्यंतर आले. या निमित्ताने काही प्रश्न मनात उभे राहीले. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9282021.cms १) लग्न झाल्यावर कुत्री व मांजरी दिल्या घरीच राहायला जाणार का? २)सासरी गेल्यात तर त्यांच्या पालनपोषणाचा खर्च कोण उचलणार? ३) काही कुत्रे व बोके घरजावई होउन राहणे तयार असल्यास दोघांचेही मालक त्यास तयार होतील काय? ४)लग्न न होणारी कुत्री फिट नसतात काय? ५)आपले लग्नमुहूर्त प्राण्यांसाठी पण लागू असतात काय? ६)कुत्र्या, मांजरांच