Skip to main content

दोन कविता

लेखक अरूण म्हात्रे यांनी सोमवार, 25/07/2011 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
मज ठाऊक नव्हते दार कोणते तुझ्या घराचे उन्हे वेचण्यासाठी.... मी खूप श्रमाने दिवस फोडूनी असाच येतो लटकत भटकत उन्ह होउनी तुझ्या घराच्या काठी...... ________________________________ तू पहिल्यांदा भेटलीस ते दिवसच पावसाळी की स्वतःबरोबर आकाश रितं करणारा हा पाऊस सोबत घेऊन यायची तुझी जुनी सवय ! काहीच आठवत नाही--- ----इतकंच लख्ख जाणवतं की कुठूनतरी वीज कोसळली नि पागोळ्यांबरोबर खेळण्याचं माझं वय जळून गेलं ...... (या माझ्या दोन कविता आधी इतरत्र प्रसिध्द झाल्या आहेत.

भानोले/भानवले

लेखक जागु यांनी सोमवार, 25/07/2011 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : पाव किलो गव्हाचे पिठ पाव किलो तांदळाचे पिठ गुळ अंदाजे ओल खोबर वेलची पुड जायफळ पुड चिमुटभर मिठ खायचा सोडा किंवा पापड खार अर्धा चमचा (ऑप्शनल) तेल पाककृती: रात्री गव्हाचे पिठ व तांदळाचे पिठ डोश्याच्या पिठाप्रमाणे पातळ भिजवुन ठेवावे. साकाळी त्यामध्ये गुळ (पाव किलोपेक्षा जास्तच लागेल. ढवळताना गुळाचा चांगला वास आला पाहीजे)वेलची पुड, जायफळ पुड व ओल खोबर, चिमुटभर मिठ स्पंजी होण्यासाठी हवा असल्यास खायचा सोडा किंवा पापड खार घालाव.

विश्वासाचं सार्थक

लेखक प्रास यांनी सोमवार, 25/07/2011 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी कोण, काय करतो, माझ्या कामाचं स्वरुप काय, अशा प्रश्नांना खरंच काही अर्थ नसतो. कुणीही, कोणत्याही व्यक्तीची गरजेपेक्षा जास्त खोलात शिरून माहिती जाणून घेऊ इच्छित नाही. कारण प्रत्येकालाच तशी हौस नसते. एरवीही आपलं स्वतःच व्यक्तीगत जीवन घड्याळाच्या काट्यानुसार चालवायची सवय लागलेला माणूस कशाला कुणाच्या फालतू चौकशा करत बसेल? त्याला त्याच्या आयुष्यातल्या चिंता सतावत असताना इतर अनोळखी माणसांच्या दु:खाश्रुंना वाट काढून देण्यासाठी स्वतःचा खांदा देण्याची मनोवृत्ती आजकाल कुणी दाखवत नाही.

कलमाडींना स्मृतीभ्रंश??

लेखक विवेक मोडक यांनी सोमवार, 25/07/2011 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
आपले लाडके नेते मा.श्री. सुरेशभाई कलमाडीजी साहेबांना स्मृतीभ्रंश झाल्याचे तिहारच्या उपमहासंचालकांनी जाहीर केले आहे. Any comments??

'टाईम' ने म्हणे झाशीच्या राणीचा बहुमान केलाय!

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 25/07/2011 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
'टाईम' ने म्हणे झाशीच्या राणीचा बहुमान केलाय! ही लिन्क पाहा http://www.time.com/time/specials/packages/article/0,28804,2084354_20843... 'बॅड-अ‍ॅस' वाईव्ह्स मधे एन्ट्री, रूपर्ट मर्डॉक ची बायको, टायगर वूड्स च्या रागात त्याच्या गाडीची तोडफोड करणारी बायको या लिस्ट मधे झाशीची राणी म्हणजे सन्मान! (पेलिनबाईही आहेत त्यात, पण या लिस्ट मधे त्यांचे असणे चुकीचे नाही.

[ज्योतिष] दिनांक ३१ जुलै २०११ रोजीची शुभ अमावस्या

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 25/07/2011 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ३१ जुलै २०११ रोजी सायन सिंह राशीत ७ अंश १९ मि.वर होणारी अमावस्या गोचर हर्षल बरोबर नवपंचम योग करते. याशिवाय गोचर प्लुटो बरोबर quincunx () नावाचा एकच त्रासदायक योग करते, आदल्या दिवशी दिनांक ३० जुलै २०११ रोजी चंद्र-शुक्र युती होत असून ही युती हर्षल बरोबर नवपंचम योग करत असल्याने, ही अमावस्या बर्‍याच प्रमाणात शुभ ठरण्याची शक्यता आहे.