Skip to main content

अर्धवट राहिलेलं प्रेम

लेखक प्रिया ब यांनी रविवार, 31/07/2011 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या भावना तुझ्या पर्यंत कधी पोचल्याच नाहीत न व्यक्त केलेलं ते प्रेम तुला कधी जाणवलच नाही अस्पष्ट मारलेली तुला हाक कधी ऐकू आलीच नाही मनाने केलेला स्पर्श तुला कधी भासलाच नाही मैत्रीच्या पुढे जावं अशी मनोमन प्रार्थना करत होते पण तुला दुखवायचं नव्हतं म्हणून मागे सरत होते तुला सांगण्याचे अनेक निष्फळ प्रयत्न मी केले मला नीट सांगता आलं नाही आणि तुलाही कधी नाही हे कळले तुझ्या जीवनात येईल कुणीतरी नवी नसेल माझ्या मनात तिच्याबद्दल अढी नाही करणार मी तिचा हेवा पण एक सामान्य मुलगी म्हणून एवढंच म्हणेन "हे सगळं स्वीकार करायची शक्ती दे मला देवा!!!" भवतालचं सगळंच वातावरण उदास वाटत आहे आपले एकत्र असलेले

फकरूद्दीनची व्यथा

लेखक प्यासा यांनी रविवार, 31/07/2011 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्ली पोलिसांनी ऑगस्ट २०१० मध्ये ओखला मार्केट येथे फकरुद्दीन ह्या किशोरवयीन मुलास अटक केली होती.त्याच्यावर एटीएम कार्ड अन २०० रुपये चोरी केल्याचे आरोप फिर्यादीने दाखल केले होते. न्यायदंडाधिकारी महोदयांनी त्याला तिहार जेलमध्ये पाठविले.त्याला जामीन नाकारण्यात आला.९ महिन्यांनी त्याला १० हजार रु.चा जामीन मंजूर झाला.पण तेव्हढे पैसे तो भरू... शकत नसल्याने तो परत तिहारमध्ये रवाना झाला.२०० रु.चोरीची अधिकतम शिक्षा ३ महिने इतकी आहे . मुद्दा हा आहे की.पोलीस अन न्यायाधीशांनी फक्रुद्दीनला १ वर्षे जेलमध्ये का अन कशाच्या आधारे ठेवले?

बावळे बुडाले धामी

लेखक शरदिनी यांनी रविवार, 31/07/2011 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
बावळे बुडाले धामी //एक // धडक उजागर पत्र अर्पणी गर्भवतीचे प्राक्तन चरणी माजघरातील संथ कीर्तनी हंबरले बावळेच सदनी //दोन// सप्त चरदरी भर्जर घाता चंदनरजनी विशिल्पवस्त्रा सर्जनशोधा मोडीत काढा त्रिकोणमुक्रर मृदंगढोला //तीन// भंगअपेक्षा भाळशेंदरी उपेक्षितांची उकल हावरी गोंदणनक्षी पत्तनसाक्षी निर्मितक्रीडा घायलवक्षी कोडीकलेजी प्रयासबोटा फसगत निबिडा हिरवीपर्वा अन्वयव्यर्था कशास शोधा कविताजखमी अलभ्यबाधा //चार// स्वीकृततारण पिंजणपाशी आकंठलसलस निर्मितदेशी अवतरणातून आत्ममैथुनी भोगभोगितो अनुभवकवनी बावळे बुडाल
काव्यरस

रफी ३१-३१

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 31/07/2011 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला गाण्यांतलं शास्त्र वगैरे काही कळत नाही. केवळ आवडतात म्हणून मी गाणी ऐकतो, वेळ मिळेल तेंव्हा, मिळेल त्या ठिकाणी. त्यामुळे प्रसिद्ध गायक-गायिकांची वा संगीतकारांची जन्मतिथी-पुण्यतिथी वगैरे मी शोधत बसत नाही. कधी कधी आंतर्जालावर बातम्या वाचतांना अचानक लक्षात असे दिवस येतात. आर डी च्या बद्दल लिहिलेल्या लेखाच्या बाबतीत असंच झालं होतं. आज ३१ जुलैला रफीच्या ३१व्या पुण्यतिथीची बातमी वाचली.

कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 31/07/2011 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली
अरे कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली निट जपून वाढ माझी फाटकी रे झोळी ||धृ|| सकाळीच उठले मी अजाणतेपणी काय घडेल दिसभर नव्हते ध्यानी पोट नाही भरले जरी न्याहरी केली कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||१|| पंचपक्वांन्न आहे सोबतीला शिरापुरी भरलेलं ताट आले समोर दुपारी किती खावे किती नको झाले त्यावेळी कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||२|| कधीतरी आराम मिळो ह्या पोटाला संध्यासमय जवळ हा आला पाषाणगवळण तुझ्या चरणी लीन झाली कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||३|| - पाषाणभेद (दगडफो
काव्यरस

लोकशाहि

लेखक अजातशत्रु यांनी शनिवार, 30/07/2011 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
!! लोकशाहित या सगळेच भाडखाऊ !! लोकशाहि मुळेच मिळते-लिहिणे,बोलणे,विरोध,मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य, त्याचा मनसोक्त उपभोग घेणारे भाडखाऊ लोकशाहि म्हणजे काय?
काव्यरस

एक चित्रपट आणि एक जाहिरात

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी शनिवार, 30/07/2011 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
गत सप्ताहात उपग्रह वाहिनीवर प्रसारित झालेला राजा आयेगी बारात हा चित्रपट पाहण्यात आला. चित्रपटासोबत अपरिहार्यपणे जाहिरातीही पाहणे क्रमप्राप्त ठरले. त्यातली एक जाहिरात पाहता जाहिरातीमागची कथा आणि चित्रपटाची कथा यात कमालीचे साधर्म्य आढळले. हे साधर्म्य काय आहे हे समजण्याकरिता प्रथम थोडक्यात चित्रपटाचे कथासूत्र इथे मांडतो. चित्रपटातील नायक (ननायक म्हणू शकता), नायिकेसोबत अतिप्रसंग करतो. त्यानंतर नायिका त्याच्याविरुद्ध न्यायालयात दाद मागते. पुढे ह्या अन्यायाची भरपाई म्हणून नायक व नायिका यांचा विवाह संपन्न होतो.

अनिवासी भारतीय (एन. आर. आय.) विवाह : एक दृष्टिक्षेप

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 30/07/2011 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा.... आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते.