Skip to main content

शिशिर

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 01/04/2022 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
थंडीने पूर्ण शहर धुक्यात विसावलेलं असत.तेव्हा बालभारतीची बा.सी.मर्ढेकरांची “पितात सारे गोड हिवाळा “ ही कविता मला आठवते.अशा धुक्यात हरवलेली रम्य पहाट आनंद देते. पितात सारे गोड हिवाळा न्हालेल्या जणू गर्भ

फर्मी साहेबाची ऐसी तैसी

लेखक भागो यांनी शुक्रवार, 01/04/2022 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कधी रात्री आकाशाकडे बघितले आहे काय? अर्थात पुणे मुंबई सारख्या शहरांतून अशी अवस्था आहे की फक्त ठळक ठळक तेजस्वी दहा पंधरा तारे आणि चंद्र उगवला असेल तर तो, एवढेच आपण बघू शकता. जरा शहराच्या बाहेर दूर जाऊन आकाश पहा. आकाशगंगा अगदी स्वच्छ दिसेल.हे आकाश पाहून तुमच्या मनात काय विचार येत असतील. ते तुमच्या मूडवर अवलंबून आहे. मी जेव्हा अश्या आकाशाकडे बघतो तेव्हा मला माझ्या क्षुद्रपणाची प्रकर्षाने जाणीव होते.

||राधायन.. एक सांगीतिक कथादर्शन|| (निमंत्रण)

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 01/04/2022 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स या गुढीपाडव्याला, 2एप्रिल, रात्री 8.30 वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात " राधायन .. एक सांगीतिक कथादर्शन" हा कार्यक्रम घेऊन येतोय. त्याचं हे आग्रहाचं आमंत्रण. नवीन कथा, गीते, संगीत व नृत्ये, आणि या सा-यांच्या जोडीला चित्र साकारण्याचे प्रात्यक्षिक, असा अनोखा मेळ साधणारा कार्यक्रम, "राधायन- एक सांगीतिक कथादर्शन, गुढीपाडव्याच्या शुभदिनी, 'राधा-कृष्ण' हा म्हटलं तर परिचित विषय; पण कल्पनेला, प्रतिभेला सतत आवाहन करणारा! राधेच्या वृंदावनातील वास्तव्याच्या आणि कृष्णसहवासाच्या अनेक आख्यायिका आहेत. परंतु कृष्ण वृंदावनातून बाहेर पडल्यानंतरच्या राधेबद्दल आपणास फार माहीत नाही.

काशिद किनारा व कोर्लई किल्ला -२०२२

लेखक गोरगावलेकर यांनी शुक्रवार, 01/04/2022 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या शुक्रवारी रात्री जावई आणि मुलीचा फोन आला. आम्हाला शनिवार-रविवार सुट्टी आहे, काशिदला जायचा विचार आहे तर येणार का? छोटीलाही सुटी होती, यांनाही निघण्यास काही अडचण नव्हती आणि मला तर भटकंतीसाठी निमित्तच हवे होते. लगेच होकार दिला. जावई-मुलगी सकाळी साडे-नऊला ठाण्याहून निघाले. आम्हा तिघांना नवी मुंबईतून घेऊन अलिबागकडे निघालो. भूक लागली होती. आधी जेवून नंतर मुक्कामासाठी जागा शोधू म्हणत एक-दीडच्या दरम्यान काशीद बीचच्या आधी साधारण आठ किमीवर जेवणासाठी थांबलो. गेल्याच महिन्यात येथील हॉटेल समर्थकृपात जेवलो होतो . जेवण आवडले होते.

दंतकथा

लेखक kool.amol यांनी गुरुवार, 31/03/2022 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
कुठलाही प्रवास मला आवडतो. अगदी कमी अंतरावरचा रिक्षातला सुद्धा. काय एक एक नमुने दिसत असतात. पण फक्त नमुनेच पाहिले पाहिजेत असं नाही. आत्ताच मेट्रोने (पुण्यातली नाही, आधीच स्पष्ट करतो) प्रवास करताना एक खूपच गोड म्हणता येईल असं एक कुटुंब सोबत होतं. त्यात एक सर्वात गोड अशी मुलगी होती. वय असेल अंदाजे 5-6 वर्षे. इथे हैदराबादला परकर पोलकं घालणाऱ्या मुली सर्वत्र असतात. त्यामुळेच की काय छान दिसत होती. तिचा दादा असेल 10-12 वर्षाचा. तर तो तिला सारखं मास्क लावण्याविषयी टोकत होता. पण ह्या मुलीचे वरचे 4 दात पडले होते आणि त्याचा कोण आनंद तिला झाला होता!

भिंतीवरचा चिवट पिंपळ

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 30/03/2022 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
भिंतीवरचा चिवट पिंपळ ----------------------------------------------------------------------------------------------------------- रेश्मा कण्हली. तिने अस्वस्थपणे कूस बदलली . तिच्या अंगात कणकण होती. तिचे दाट, काळेभोर रेशमासारखे केस मोकळेच होते. ते आता अगदीच गबाळेपणाने कसेही पसरले होते. परत तिला ग्लानी आली. त्यात तिला काहीबाही आठवत राहिलं. तिला तिचं लहानपण आठवलं . गावातलं. कित्ती छान होतं ते ! गरिबी असली तरी. तिचा बाप मोलमजुरी करायचा . तिची आई बाळंतपणातच दगावली होती. त्यामुळे बाप आणि आजी त्या आईविना पोरीला जास्तच जीव लावत. ते एका झोपडीत रहात. समोर लांबवर डोंगर होता. बाप दिवसभर कामाला.

पंचमीतले रंग सांडले........

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 30/03/2022 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
पंचमीतले रंग सांडले झाडांनी ते बघा झेलले डोक्यावरती तुरे गुलाबी धुंद होऊनी फाग नाचले लुसलुशीत ही कवळी पाने मोहरून गेली सर्वच राने आंबोळ्या निंबोळ्या सवे खेळती ओढून नुतन वस्त्रे गर्द पोपटी कोण चितारी चित्र काढतो रंगांची रागदारी मांडतो कोकीळ मंजुळ कुजन करते मन मुदित हिंदोळ्यावर झुलते कसरत २९-३-२०२२
काव्यरस

राजधानीची सफर (भाग-३)

लेखक पराग१२२६३ यांनी बुधवार, 30/03/2022 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
भोपाळ जंक्शनवर गाडी थांबल्यावर मी खाली उतरून जरा फलाटावर रेंगाळलो. इथे आमच्या ‘राजधानी’चे चालक, गार्ड, तपासनीस, पोलीस बदलले गेले. भोपाळ जं.वर नियोजित वेळेच्या दोन मिनिटं आधी दाखल झालेली आमची ‘राजधानी’ सुटली मात्र नियोजित वेळेच्या 4 मिनिटं उशिरा म्हणजे मध्यरात्री 2:09 वाजता. भोपाळनंतर पाचच मिनिटांनी मोटारगाड्या वाहून नेणारी WAG-9 इंजिन जोडलेली मालगाडी भोपाळच्या दिशेने गेली. आता आमच्या ‘राजधानी’नं पुन्हा एकदा मस्त वेग पकडला होता. आता घड्याळाचे काटे पहाटेचे 3:27 वाजल्याचे दर्शवत होते.

“द नंबर यू हॅव डायल्ड डझ नॉट एक्सिस्ट.”

लेखक भागो यांनी मंगळवार, 29/03/2022 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी स्वतःला हातगाडी सारखं ढकलत ढकलत घरी चाललो होतो. ऑफिसला जाताना ढकलगाडी परत येताना पण ढकलगाडी. ऑफिसात कुठे ठेवणार नाही का? ढकल ढकल एकदा फिरून रे.... शेजारून एक लांब लचक गाडी अगदी खेटून गेली. थोडा धक्का लागला असता म्हणजे? जो पाहावा तो माझ्या जीवावर उठलेला.सुखाने जगू देखील देत नाहीत, हे गाडीवाले. कर्र कच्च त्याच गाडीवाल्याने अर्जंट ब्रेक लावले होते. गाडीतून झ्याक प्याक सूटवाला उतरला माझ्याकडे पळत येत होता. आता हा काय मला फायर करणार काय? माझी काहीही चूक नव्हती. मी थोडाच ऐकून घेणार होतो? सूटवाल्याने येऊन मला मिठीच मारली की हो.

50 लाखांचं घड्याळ

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 29/03/2022 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
खातोश्री (50 लाखांचं घड्याळ) टिक टिक टिक टिक टिक टिक टिक टिक चालते आहे घडी. भ्रष्टाचार धूण्याची हो सापडेल का कुठे वडी? 2 कोटी च्या भेटीनं उभारली पाडवा गुढी डायरी मधे नोंद पहा मिळाली आहे बडी कुटूंबाची चंगळ चाले बांधली राष्ट्रवादी घडी तीन नापास, सत्तेत आले खेळून एक डाव रडी टिक टिक टिक टिक टिक टिक टिक टिक चालते आहे घडी. भ्रष्टाचार धूण्याची हो सापडेल का कुठे वडी? कॅमेरा असता, घड्याळात तर वेब सिरीयल काढेल ईडी जेलमधे जाल जेव्हा चालेल जनता-जनार्दन छडी.