मिपाला चौथ्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा
नमस्कार मंडळी,
आज गणेश चतुर्थी! आज आपलं लाडकं मिपा (तिथीने) चार वर्षाचं झालं. गेल्या चार वर्षात मिपावर अनेकविध विषयांवर दर्जेदार चर्चा वाचता आल्या, त्यात भागही घेता आला. तसेच मिपामुळे अनेक नव्या ओळखी झाल्या, मित्रपरिवार वाढला. आता तर मिपाशिवाय पूर्वी कसे राहत होतो असाच प्रश्न पडू लागला आहे.
असे हे उत्तम, दर्जेदार आणि सुंदर संकेतस्थळ चालू करून माझ्यासारख्या अनेकांना मायमराठीतून इतरांबरोबर संवाद साधायची संधी दिल्याबद्दल तात्या आणि नीलकांतचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.
मिसळपाव