Skip to main content

मै पिच्चर में जावू के नको

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 27/09/2011 04:45 या दिवशी प्रकाशित केले.
मै पिच्चर में जावू के नको
ये करू नको, वो करू नको सदा ऐसेच बोलतेय आप तो मै पिच्चर में जावू के नको ये अब्बीच बोल दो मेरे को ||धृ|| देखने में मै हूं बडी देखनी; सब बोलतेय मेरकू चिकनी नही कोई मुझमे कमी; मेरे बगैर पडती गली सूनी कैसी हिरोईन एक नंबर बनती तुम अभी देखो मै पिच्चर में जावू के नको ये अब्बीच बोल दो मेरेको ||१|| मुंबई शहर है बडा मोटा; नाही पैसेका उधर तोटा मत करो मेरेको बेटा बेटा; नाही होंगा अपनेको घाटा अब्बी मेरी अम्मीभी राजी हो गयी देखो मै पिच्चर में जावू के नको ये अब्बीच बोल दो मेरे

(आपणच आता भान ठेवायला हवं)

लेखक शुचि यांनी मंगळवार, 27/09/2011 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमची टिलु(माझी कजाग शेजारिण ) काल घरी आली आणि म्हणाली " शुचि मी आज माझ्या नवर्‍याचे लाड केले" आता ही टिलु कजाग आहे.मी तिला म्हटलं "टिल्या संसारात आक्रस्ताळेपणा करायचा असतो? प्रेम, तडजोड नाही करायची .." तर ती म्हणाली "शुचि माझा नवरा माला म्हटला माझ्याशी (१५ वर्षानी )आतातरी म्य्त्री क्र्र्न्र क???????" आता मात्र मला शॉक बसला.

आपणच भान ठेवायला हव..............

लेखक gangotri_ यांनी सोमवार, 26/09/2011 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पिलु(माझी छोटी शेजारिण ) काल घरी आली आणि म्हणाली " दीदी मी आज वर्गातल्या एका मुलाला कानाखाली दिली" आता ही पिलु 2 रीत आहे.मी तिला म्हटलं "पिल्या तू शाळेत मस्ती करायला जातेस का? मारामारी नाही करायची .." तर ती म्हणाली "दीदी तो मुलगा माला म्हटलं माझ्याशी लग्न करशील का???????" आता मात्र मला शॉक बसला.2 रीतल्या मुलांना कधीपासून लग्नाचं सुचायला लागलं ????? मी तिच्या शाळेत गेले , त्या मुलाशी बोलून त्याला समजावून सांगितलं की अभ्यासात लक्ष द्या . पण .......... पण..... प्रॉब्लेम सुटला का एवढ्यावरच?????? तो त्यांच्या पुरता मिटला .

अमावास्या , नारळ आणि मनोविकार

लेखक JAGOMOHANPYARE यांनी सोमवार, 26/09/2011 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
अमावास्या , नारळ आणि मनोविकार अमावास्येला नारळ का फोडतात ? यामागचे धार्मिक कारण काय आहे? तसेच या दिवशी लिंबु आणि मिरची गाडीला, घराला बांधायचीही प्रथा आहे. ती कशासाठी? अमावास्येला कोणतेही काम सुरु करु नये असे म्हणतात.. ते का? काही लोक ( उदा. दत्तपंथीय शंकर महाराज) अमावास्येला शुभ मानतात आणि नवे काम करावे असेही मानतात. असे का? अमावास्या ( आणि पौर्णिमा) या दिवशी मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात, ते खरे आहे का? ( सर्व जिवंत आणि मृत व्यक्तीना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा.)

तंदूरी तंगडी / विंग्स

लेखक प्रभो यांनी सोमवार, 26/09/2011 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी, परवा मित्राकडे गेलो होतो. शनिवारी क्रिकेट खेळून आणी दंगा घालून झाल्यावर रविवारी चिकन बनवायचं ठरवलं. मी तंदूर तर मित्र रस्सा बनवणार. हे आपलं ब्याचलरी (अनिवासी) घरात असणारं साहित्य घेऊन बनवलं आहे बरंका. :) नुसतं तंदूर खाणार असाल तर हे खालचं साहित्य एका माणसासाठी....रस्स्यासोबत तोंडी लावायला घेणार असाल तर दोघांसाठी ;) साहित्य : १. ७-८ चिकन ड्रमस्टीक्स/विंग्स २. २ चमचे मीठ ३. १-२ चमचे तिखट ४. १ चमचा काळीमिरी पूड ५. १-२ चमचे तंदूर मसाला/चिकन मसाला ६. २ चमचे आलं-लसूण पेस्ट ७. ४ चमचे दही ८. १ चमचा बटर/लोणी/तूप कृती: १. चिकन धुऊन , तसेच स्कीन नको असल्यास स्कीन काढून घ्या. २.

ट्रू एअर स्पीड, ग्राऊंड स्पीड, सर्किट वगैरे...

लेखक गवि यांनी सोमवार, 26/09/2011 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
: विमानाच्या वेगाबाबतीत एक फंडा क्लिअर करुन घेऊ. विमानाचा वेग म्हणजे त्याच्या कॉकपिटात दाखवला जाणारा वेग. हा वेग हवेशी रिलेटिव्ह असतो. विमान हवेला मागे ढकलून पुढे जातं.. जमिनीला नव्हे.. त्यामुळे मागे जाणार्‍या हवेचा स्पीड म्हणा किंवा हवेच्या तुलनेत पुढे सरकणार्‍या विमानाचा स्पीड म्हणा, हाच विमानाचा स्पीड असतो. त्याला ट्रू एअरस्पीड म्हणतात. पण आपल्याला प्रवास तर जमिनीवरच्या ठिकाणांमधे करायचा असतो. त्यामुळे आपल्याला विमानाचा ग्राउंड स्पीड, अर्थात जमिनीशी रिलेटेड स्पीड काढणं भाग असतं. समजा मुंबई गोवा एरियल अंतर ६०० किलोमीटर असेल.

मजला महाग पडले.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 26/09/2011 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
रुप बहरता हसणे, मजला महाग पडले. तुझ्या डोळ्यात फसणे, मजला महाग पडले. ओठांची नाजुक महिरप, वर विभ्रमी चाळे. अधरावर नाव कोरणे,मजला महाग पडले. ते कोवळे तारुण्य.बांधले रेशिम काचोळित अनंग ठसा उमटवणे,मजला महाग पडले. नजर, कधि लाजरी, तर कधि नाचरी नजरेस नजर देणे ,मजला महाग पडले. तु श्रुंगार वेडी, असे बेधुंद रागीणी विसावणे मिठीत तुझ्या,मजला महाग पडले. फुलले, बहरले यौवन,देह सारा जाळतो देहात देह मीसळणे.मजला महाग पडले अविनाश...

"मे डे", "पॅन पॅन" वगैरे..

लेखक गवि यांनी सोमवार, 26/09/2011 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
एव्हिएशन क्षेत्र हे सर्व इतर व्यवसायांप्रमाणे एक स्वतःतलं जग आहे. त्यातल्या काही टर्मिनॉलॉजीज आपल्या कानावर अधूनमधून पडतात. बहुतेक एखाद्या क्रॅशच्या बातमीच्या निमित्ताने किंवा विमान खरेदी घोटाळा वगैरे झाला तर. मला वाटलं की अशा रँडम संकल्पना किंवा शब्द उचलून त्याविषयी थोडंसं सांगावं. बरं वाटलं म्हणजे, ठीक जम्या तर पुढे आणखी कन्सेप्ट्स घेऊन पुन्हा बोर्डावर उतरीन. आता थोडी सुरुवात करतो. "मे डे आणि पॅन पॅन": "मे डे" हा शब्द (शक्यतो तीन तीनवेळा) फ्लाईट रेडिओवरुन म्हटला की विमान प्राणघातक अ‍ॅक्सिडेंटच्या अत्यंत जवळ आहे असं पायलटला सांगायचं असतं.