Skip to main content

सोप्पा लेमन केक

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 19/10/2011 05:27 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: १ वाटी मैदा १२ टेस्पून साखर २ अंडी (फ्रिजमधून थोडे आधी काढून ठेवावी) ४ टेस्पून तेल ४ टेस्पून दुध ११/२ टेस्पून लिंबाचे किसलेले साल (फक्त पिवळा भाग, पांढरा नको नाहीतर कडवट होईल) १ टेस्पून लिंबाचा रस २ टीस्पून बेकिंग पावडर १/२ टेस्पून व्हॅनिला इसेन्स मीठ जरासे चवीपुरते . पाकृ: प्रथम मैदा, मीठ व बेकिंग पावडर एकत्र करुन दोन-तीनदा चाळून घेणे. एका भां

"मराठी रंगभूमीच्या तीस रात्री" - मकरंद साठे

लेखक yeda यांनी बुधवार, 19/10/2011 02:29 या दिवशी प्रकाशित केले.
आधुनिक मराठी रंगभूमीला साधारणपणे गेल्या दीडशे-पावणेदोनशे वर्षांचा अत्यंत समृद्ध असा इतिहास आहे. या कालखंडात महाराष्ट्रातील -आणि भारतातील - सामाजिक राजकीय वास्तवात जेवढे मूलभूत बदल झाले तेवढे त्याआधीच्या काही हजार वर्षांत झाले नव्हते. मराठी रंगभूमी या बदलांची साक्षी होती आणि आपल्या परीने त्यांचे अर्थ लावत- कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणता- तिने काही सक्रीय भूमिकाही निभावली. 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' हा अशा रंगभूमीचा विलक्षण इतिहास तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन, एका प्रकारे तो या कालखंडातील सामाजिक वास्तवाचाच मांडलेला एक लेखाजोगा आहे. या ग्रंथात एक प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आला आहे.

काही नोंदी अशातशाच... - ८

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 18/10/2011 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
या नोंदी लिहायच्या की नाही, असा प्रश्न माझा मलाच पडला. या विषयावर याआधी दोन-तीनदा लेखन झालं आहेच. त्यातली मूळची तथ्यं नवी नाहीत. मग का लिहायचं? प्रश्नाचं स्वाभाविक उत्तर 'नको' असंच होतं. पण एक चाळा म्हणून या दोन दिवसांच्या अनुभवांकडे पाहिलं. थोडं तटस्थपणे. तेव्हा असं लक्षात आलं की, काही गोष्टी आपल्याच संचितात नव्यानं जमा झालेल्या आहेत. त्यांची कुठं तरी नोंद झाली पाहिजे. मग हेही लक्षात आलं की, काही वाचकांना तरी खचितच काही गोष्टी नव्यानं कळतील. लिहायचं, हे ठरलं. हे मनोगत नाही, किंवा स्पष्टीकरणही नाही.

मनस्वी

लेखक भक्ति यांनी मंगळवार, 18/10/2011 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
एखादं धरण बांधून अडवितात नदीला... तेव्हा कसं वाटत असेल तिला ? अंतिम मिलनाची प्रचंड आस घेऊन लहरत जाता जाता अचानक आडवं आलेले धरण ... आणि त्याच्या उभ्या आडव्या विस्तारापुढे आपल्या सारया भावना, जाणिवा, आशा आकांक्षा अश्या थिजून राहिलेल्या एका जागी... उत्कट असोशीची सळसळती शलाका एका ठिकाणी येऊन अशी अबोल झालेली ... वाहणे हा जगण्याचा आदिम स्वभाव विसरून धरणाच्या दगडी छातीवर धडका देणारी ... मनात निराश.. हतबल झालेली ??? खरेच का ??? हतबल??? तसाच "ती" चा प्रवास... "मनस्वी ... " नुकत्याच उघडलेल्या डोळ्यांनी जग पाहताना...

उत्तम मिसळ मिळणारी ५1 ठिकाणे

लेखक विवेक वि यांनी मंगळवार, 18/10/2011 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तम मिसळ मिळणारी ५1 ठिकाणे १) अण्णा बेडेकर, पुणे २) मनशक्ती के॑द्र, लोणावळ ३) मामलेदार, ठाणे ४) मूनमून मिसळ, डो॑बिवली ५) संजिवनी- माडिवालेकॉलनी, टिळक रोड ६) रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड ७) श्री- शनिपारा जवळ ८) नेवाळे- चिंचवड ९) जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी. १०) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा. ११) कुंजविहारी, ठाणे स्टेशन १२) जुन्नर बस स्थानक. १३) फडतरे, कलानगरी. १४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर १५) गोखले उपहार गृह, ठाणे १६) भगवानदास, नाशिक १७) फडतरे मिसळ कोल्हापुर १८) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र, पुणे १९) प्रकाश, दादर २०) दत्तात्रय, दादर २१) वृंदावन, दादर २२) आस्वाद, दादर

अलविदा मिसळपाव!

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 18/10/2011 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
अलविदा, मिसळपाव! या शेवटच्या लेखासह मी तात्पुरता 'मिपा'वरून एक "सहभागी लेखक" म्हणून नाहींसा होत आहे. या संस्थळावर मी आलो तो तात्यांच्या आग्रहावरून. आल्यापासूनच मला कधीच comfortable (याला मराठी प्रतिशब्द सुचत नाहींय्) वाटले नाहीं. कदाचित् हा माझ्या वयाचा परिणाम असेल. कदाचित् श्री सामंत याच कारणाने बाहेर पडले असतील. पण मला आता इथे बरे वाटत नाहीं म्हणून मी रजा घेत आहे. मला इथे अनेक नवीन "पुतणे-पुतण्या" मिळाल्या. कांहींची तर खूपच गट्टी झाली. एक सभासद तर (खराखुरा) भाचा निघाला. या सर्वांची आठवण येऊन कांहींसे औदासिन्य वाटेलच.

नेक्स्ट इज व्हॉट ???

लेखक गवि यांनी मंगळवार, 18/10/2011 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी बाबांना दोन रुपये लिटरने फटफटीच्या टाकीत पेट्रोल भरताना बघितलं. आता सत्तरी गाठली (मी नव्हे, पेट्रोलने.. !!) फोन सगळ्या गावात एकादोघांच्या घरी होते. काळे जड ठोकळ्यासारखे. कटर्र कटर्र आवाज करत डायल करण्याचे. पेजर येऊन "वा.. काय टेक्नॉलॉजी आहे.." म्हणण्याच्या आत जुने झाले. आता मोबाईल सगळ्यांकडे आहे.. वरुन थ्री जी आलं.. टॅब तीनहजारात येऊ घातलाय.. फार पूर्वी पंजाबात अतिरेकी होते. मग काश्मिरात, आता मध्यपूर्वेत.. आणि जगभरात.. फास आवळतो आहे असं फीलिंग सगळीकडे आहे. आर्थिक बाबतीत आता युरोपमधे जबरदस्त क्रायसिस आहे.. आपण यातले अडाणी..