Skip to main content

आय गॉट अ वूमन- रे चार्ल्स

लेखक प्रास यांनी रविवार, 04/12/2011 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रभात मित्रांनो! सकाळी सकाळी आठवण झाली 'रे चार्ल्स'ची. या अमेरिकन गीतकार, संगीतकार आणि गायकाने चांगली ५०-५५ वर्ष संगीत रसिकांवर आपल्या सूरांचं गारुड घातलं. आधी उल्लेख झालेल्या 'ब्लूज' संगीताचाच एक प्रकार असलेला 'सोल' (Soul) संगीत, हे याची खासियत!

बॅचलर्स भजी - खेकडा भजी ;)

लेखक पियुशा यांनी रविवार, 04/12/2011 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
खेकडा भजी: या भजांच्या वेड्यावाकड्या आकारामुळे याला खेकडा भजी म्हणत असावेत . जितका सोपा तितकाच लाजवाब प्रकार सहज बनवता येइल असा ;) एखाद्या सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी वाफाळत्या चहाबरोबर जर गरमागरम कुरकुरी भजी असतील तर ......

...तर सौदीत कुमारी राहणार नाहीत

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 04/12/2011 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑन लाईन म.टा. वाचताना अजून एका बातमीने लक्ष वेघले. त्या बातमीतील जावईशोध वाचून मी उडालो. त्यात म्हणले आहे "स्त्रियांनी वाहन चालविले तर सौदी अरेबियात एकही कुमारी महिला शिल्लक राहणार नाही, असा विचित्र दावा सौदी अरेबियातील 'मजलिस अल-इफ्ता अल-आला' या सवोर्च्च धार्मिक संस्थेने एका अहवालात केला आहे. वाहन चालविण्यासाठी स्त्रियांवरील बंदी शिथील केली, तर अनेक स्त्रिया आणि पुरुष समलिंगी बनतील किंवा पोनोर्ग्राफीकडे वळतील, असाही दावा या तथाकथित अहवालात करण्यात आला आहे. आपला अहवाल 'वैज्ञानिक' असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

चेतना

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 04/12/2011 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
विस्तीर्ण नभावर मेघदळे घनदाट पवनास न बंधन धावतसे फुंफाट क्षितिजास फडकल्या भोर ध्वजा कनकाच्या नांदी दिवसाची उगवे रमल पहाट तिमिरास किनारी कांचनमय अल्हाद भरल्या अंबरभर पुन्हा नव्या अभिलाषा तो अथक प्रवासी चाले आपली वाट पल्लवीत कुसुमे जीवन; नवओघात सृजनाचे दालन; उमले रोज प्रभात चेतना सकल हृदयात; चेतवी वात दुरितांस ऊब तरुछाया कधि अपघात चिरअनंत चाले योगभारला संवाद मी अंश तयाचा आक्रमतो एकांत विसरतो कसा मग मावळणे अभिजात जे ज्यास हवे ते द्यावे आपल्या हातांनी उत्तुंग वागणे राहिल चिरस्मरणात ............................अज्ञात
काव्यरस

चॉकलेट हिरो देव आनंद यांचे निधन.

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 04/12/2011 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच ऑन लाईन म.टा मधे बातमी वाचण्यात आली. सदाबहार देवानंद काळाच्या पडद्याआड सदाबहार, चिरतरुण, चॉकलेट हिरो असे ज्यांचे वर्णन केले जायचे ते ज्येष्ठ सिनेअभिनेते देवानंद यांचे लंडन येथे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अखेरच्या क्षणी देवानंद यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुनील आनंद होता.

दिग्गजांची ओळख :- छत्रपती शिवाजी

लेखक मन यांनी रविवार, 04/12/2011 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या एका स्थळावर एका चर्चेत शिवाजी महाराजांबद्द्ल काही बोलणे सुरु असताना एका प्रतिसादात शिवाजी महाराजांचा एक प्रोफाइलच तयार झाला. त्यांच्या बद्दल लघुनिबंध म्हणता येइलसा किंवा संक्षिप्त परिचय म्हणता येइल असा तो आहे.

परीणाम ( गफलत भाग २ )

लेखक चाफा यांनी रविवार, 04/12/2011 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
निषाद देवनार यांच्या डायरीतून : आदित्य, माझा खास मित्र, सध्या काहीतरी सैरभैर झाल्यासारखे वागतो. एकदम नक्की सांगायचं झालं तर तो त्या `झांबीडी' नावाच्या गावाला जाउन आल्यानंतरच. त्याच्या लेखाला योग्य तो प्रतीसाद न मिळाल्यामुळे असु शकेल कदाचीत. आणि तसं असेल तर त्यात अशक्य असं काही नाही कारण आपल्या लेखाच्या प्रसिध्दीसाठी कुठे कुठे फ़िरला हा माणुस.... पण त्याला योग्य न्याय मिळाला नाहीच. त्या दिवशी मी त्याच्याकडे गेलो तेंव्हाच त्याची अवस्था पाहुन मला वाईट वाटले. खरोखर उत्तम आणि अभ्यासपुर्ण लेखन असते त्याचे अर्थात त्याची मेहनतही तितकीच असते त्या मागे.

भेट !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 03/12/2011 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
भेट ! ३० जून १९४३. बॅलार्ड पिअरच्या पोस्टऑफिसच्या समोर जो रस्ता आहे, तेथे तो पोलीस नेहमीप्रमाणे करडी गस्त घालत होता. खांद्यावरच्या तार्‍यांनी तो एक आधिकारी आहे हे सहजच लक्षात येत होते. तसा रस्त्यावर शुकशुकाटच होता. पण त्याला काय फरक पडणार होता म्हणा. तो त्याचे काम सवयीने चोख पार पाडत होता. रात्रीचे १० वाजायला आले होते आणि हवेतला गारठा ही उत्तरेकडे झुकत होता. समुद्रावरचे गार वारे सुटले होते आणि पावसाच्या शक्यतेने त्या रस्त्यावर नेहमी असणारे नेहमीचे लोकही आज गायब होते. दरवाजांकडे लक्ष देत स्वारी हातातील दंडुका मधेच गरागरा फिरवत डौलात चालली होती.

मन

लेखक navinavakhi यांनी शनिवार, 03/12/2011 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
मनात गुंतते मन .. जनन अन मरण अभिलाषेच्या हिंदोळ्यावर चढणं अन उतरणं गुंतलेल्या मनाला आता सावर पुढे अवघड असेल वळण भावनांच्या पुराला आवर दुःखाचे अन्यथा हेच होई कारण मन होईल कावरं बावरं पण ऐक सांगते हेच असे जगणं !!