Skip to main content

नक्की कोणता मी प्राणी ...!

लेखक विदेश यांनी शनिवार, 17/12/2011 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
मान हलवता सर मजला 'नंदीबैल' पहा म्हणती - हुषार नाही म्हणून मजला मित्र किती 'गाढव' म्हणती ! डबे शोधतो हळू नेहमी 'बोका' म्हणते आई मला , नुसता चरतो इकडे तिकडे 'घोडा' म्हणती वडील मला ! दादा म्हणतो 'लबाड कोल्हा' पुढेपुढे मी करताना - 'माकड' समजे ताई मला गडबड माझी बघताना ! 'गरीब गाय' म्हणते मला आजी माझी आवडती , जवळ घेउन आजोबा तर माझा 'वाघोबा' म्हणती !

सचिनचा मार्ग 'मोकळा'

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 17/12/2011 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
आता खेळाडूंनाही मिळणार 'भारतरत्न पुरस्कार' 'सचिनचा भारतरत्नचा मार्ग मोकळा' वाचून कुणालाही आनंद होइल अशी बातमी आहे. नीट विचार केला पाहिजे. एका सचिनसाठी ही नियमांची मोडतोड आहे का ! सध्या सरकार कठीण परिस्थितीतून जाते आहे.

कोंबडी घालणार धुमाकुळ हिंदीत

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 17/12/2011 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत गेली काहीवर्षे धुमाकुळ घालणा-या "कोंबडी पळाली" या गाण्याची भुरळ हिंदी चित्रपटसृष्टीलासुद्धा पडली आहे. मुन्नी बदनाम झाली,

सख्या मला सवे तुझ्या

लेखक मकरन्दबेहेरे यांनी शनिवार, 17/12/2011 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
सख्या मला सवे तुझ्या कवेत रे फिरायचे नभात शुक्रचांदणे अजून ही दिसायचे कशास लाज लाजसी घडी घडीस साजणा मनात काय माझिया, कळेल का प्रिया तुला मिठीतले शहार हे धुक्यात रे जपायचे अजून "श्यामसावळ्या" कुशीत गुंतलास ना बटेत सोनकेवडा अजून माळलास ना नको व्रुथा करु उशीर मावळेल चांद रे तुझ्याच आज अंगणी हरीप्रिया खुणावते भरून टाक भांग ही हळूच कुंकवात रे उठेल आसमंत हा जपून कोर श्वास रे बेहेरे मकरंद ०१२०२१२०
काव्यरस

No space...!!!

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 17/12/2011 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मित्र माझ्या घरी आला अचानक.. घरात नेहमीप्रमाणेच पसारा.. मी त्या पसा-यावर कव्हर करायचं म्हणून म्हणालो " इतक सामान झालाय ना..की जागाच पुरत नाही.. आता मोठी जागा घ्यायचं चाललाय.." तो मित्र हसला.. मी म्हणलो "हसायला काय झालं ..? खरच" म्हणाला .. "अरे राजा जागेचा प्रश्न नाही..अव्यवस्था ,बेशिस्त हा तुझ्या स्वभावाचा भाग आहे..मोठी जागा घेउन तुझा पसारा कमी होणार नाही..मोठी जागा घेतलीस तर पसाराही मोठा होइल.. दुसरं काही होणार नाही..!

पानगळ

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 17/12/2011 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
पानगळ ! पाँडिचेरीची आपली एक स्वत:ची वेगळीच संस्कृती आहे. फ्रेंचांची वसाहत असल्यामुळे या भागात फ्रेंच आणि तामीळ संस्कृतीचे एक सुरेख मिश्रण आपल्याला आढळते. अजूनही बरीच फ्रेंच कुटूंबे येथे तग धरून आहेत. काही तरूणांनी येथील स्थानिक घरांशी घरोबा केल्यामुळे अजून एक मिश्र संस्कृती जन्माला आली आणि त्यात तामिळ सुसंस्कृतपणा आणि फ्रेंचांचा धाडसीपणा या गुणांचा एक सुरेख संगम आपल्याला यांच्या पुढच्या पिढ्यांमधे आढळेल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे फ्रेंच लोकांची कलासक्तीही या पिढ्यांमधे पुरेपूर उतरली आहे. मी जे सांगतोय ती परिस्थिती साधारणत: १९४२-४३ सालातली.

(सावली)

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 17/12/2011 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: सावली आता ठरवलय की कवी व्हायचं नाही, पण तरीही येतो एक झटका जस जशा इतरांचा कविता दिसत जातात, कागदांच्या ढिगार्‍यात बसलेला वेचत असतो उमटलेले शब्द अन् शब्द, सोबतीला असतात ताव,कलमे, करत असतात सोबत जुळवणार्‍या यमकांशी, 'ट' ला 'ट' जोडून मुक्तछंदाच्या साक्षीने, आणि लिहीत असतो त्या कागदाच्या तुकड्यांवर उगाच काहिही, सोबतीला असते माझी आकांक्षा मी प्रसिद्ध कवी होण्याची वाट पाहात..... --- न्याहाळे कविछंद
काव्यरस

सावली

लेखक मकरन्दबेहेरे यांनी शनिवार, 17/12/2011 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आता ठरवलय की वेडं व्हायचं नाही, पण तरीही येतो एक झटका जस जशी संध्याकाळ होत जाते, निष्पर्ण वृक्षाखाली बसलेला वेचत असतो वाळलेल पान अन् पान, सोबतीला असतात घुबडे, वटवाघळे, करत असतात सोबत अमावस्येच्या रात्री पौणिमेच्या चंद्रासोबत चांदण्याच्या साक्षीने, आणि लिहीत असतो त्या वाळलेल्या पानांवर नक्षत्रांचे देणे, सोबतीला असते सावली उगवत्या सुर्याची वाट पाहात..... बेहेरे मकरंद ११०२२१७१
काव्यरस