Skip to main content

कोल्हापुरासंबंधी ,माहिती हवी होती..

लेखक कॉमन मॅन यांनी सोमवार, 16/01/2012 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, भारतीय राज्यघटनेनुसार कलम १९ (१) डी - to move freely throughout the territory of India चा आधार घेत नजिकच्या काळात आमचे काही कामानिमित्त कोल्हापुराला जाणे होणार आहे. तसे पाहता खिशात पुरेसे पैसे असले म्हणजे कोणत्याही ठिकाणी राहण्या-खाण्याची सोय होऊ शकते, परंतु हीच सोय जर आपल्या माहितीच्या ठिकाणी झाली तर अधिक बरे, या हेतूने आम्ही हा चौकशी-धागा लिहीत आहोत. चौकशी क्र १) कोल्हापूर लोहमार्गीय स्थानकाच्या जवळपासच्या एखाद्या चांगल्याश्या परंतु त्यातल्या त्यात स्वस्तातल्या लॉजसंबंधी कुणी काही माहिती देऊ शकेल का? सध्या थंडी असल्यामुळे तेथे गरम पाणी मिळाल्यास बरे होईल.

क्रुझची सफर -- टेक्सास ते मेक्सिको - १

लेखक टुकुल यांनी सोमवार, 16/01/2012 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न होवुन एक वर्ष भरभर गेले आणि लग्नाचा पहिला वाढदिवस जवळच आला होता, बायकोला आधी एकदा म्हणालो होतो कि आपण कधीतरी क्रुझ वर फिरायला जावु. आता अस बोललोच होतो आणी काहीतरी वेगळे म्हणुन विचार केला कि लग्नाचा पहिला वाढदिवस क्रुझ वर साजरा करुयात. एका मित्राच्या अनुभव आणी सल्ल्यानुसार, दोन एक महीने आधिच चौकशी सुरु केली. ठरवलेल्या दिवशी ऑफिसमधुन सुट्टी भेटायची पण खात्री नव्हती. विचार केला जे होईल ते बघता येईल, आधी बुकींग करुन टाकुत. लग्नाच्या तारखेला बोटीवर असु एवढी एकच अट ठेवुन सुरु केली शोधाशोध आणी कार्नीवलची गॅलव्हेस्टन -- प्रोग्रेसो -- कोझुमल -- गॅलव्हेस्टन अशी पाच दिवसांची सफर बुक केली.

नर्मदा परिक्रमा - पुस्तकांची एकत्रित माहिती

लेखक निनाद यांनी सोमवार, 16/01/2012 05:01 या दिवशी प्रकाशित केले.
नर्मदा परिक्रमा विषयावरचे यशवंताचे रसाळ लेखन वाचले. मग थोडी शोधा शोध केली तर ही माहिती हाती लागली. आशा आहे कुणाला तरी उपयोग होईल. नर्मदा परिक्रमा- इतिहास सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर सुरू होते. मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे. स्कंदपुराणात नर्मदेचं वर्णन आले आहे असे म्हणतात. पायी केल्यास ही यात्रा 3 वर्षे 3 महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते असा समज आहे. ही यात्रा अतिशय खडतर आहे.

पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 16/01/2012 04:16 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड मागे एकदा पाली -रायगड येथील सरसगडावर गेलो होतो. यावेळी मुलगा अनंत व भाचा शुभम आणि भाची आर्या यांनी सरसगडावर येण्याचा फारच आग्रह केला. मागील पावसाळा संपल्यानंतर सरसगडावर त्यांना घेवून जाणे झाले. त्याची काही छायाचित्रे.

प्रारब्ध

लेखक ajay wankhede यांनी सोमवार, 16/01/2012 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या भोवती मी हा असा दरवळतो सुगंधालाही का कळेना मी असा कळवळतो हलकाच मंद वारा विभक्तो पारीजातकाला वार्यालाही का कळेना स्पर्श वेदनेचा श्वासात गुंतलेला श्वास भावनेचा श्वासालाही का कळेना हिंकार भावनेचा अन्कुरले बीज गर्भात या भुईच्या मेघांनाही का कळेना भेद अन्तरीचा श्रावणातही तठत्स शरदातील शुक्रतारा ऋतूलाही का कळेना रहस्य या ग्रहांचे संथ सागराचे मन शांत नि स्त:ब्ध ओहटीच्या लाटांनाही का कळेना भरतीचे प्रारब्ध

"सेफ्टी लास्ट"

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 15/01/2012 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
“सेफ्टी लास्ट" गुगल वर असेच काही शोधत असताना हा सिनेमा मिळाला. स्टोरी वाचली. लगेच सिनेमा download केला. सिनेमा बघा. दीड तास मस्त जातील ह्याची खात्री. अधिक माहिती हवी असेल तर लिन्क दिली आहे..... http://en.wikipedia.org/wiki/Safety_Last! (मला जास्त लिहायचा कंटाळा येतो.शाळेत माझा निबंध ८-१०वाक्यात संपायचा. इथे पण ८-१० वाक्यातच विषय संपवला आहे..)

तिळगुळाच्या पोळ्या

लेखक Mrunalini यांनी रविवार, 15/01/2012 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : मैदा - १ कप गव्हाचे पीठ - १/२ कप बेसन - ४ चमचे तांदुळाचे पीठ - ४ चमचे तीळ - १ कप किसलेले सुके खोबरे - १/२ कप गुळ - १ कप तुप - ४ चमचे विलायची पावडर - १/२ चमचा जायफळ पावडर - १/४ चमचा मीठ - १ चिमटी कृती : १. गव्हाचे पीठ, मैदा, मीठ व बेसन एकत्र चाळुन घ्यावे. ह्यात २ चमचे तुप गरम करुन घालावे व नीट मिक्स करावे. ह्यात थोडे थोडे पाणी टाकुन गोळा मळुन घ्यावा व झाकुन ठेवावा. २. कढईत तीळ व खोबरे वेग वेगळे भाजुन घ्यावे. त्यानंतर २ चमचे तुप टाकुन २ चमचे बेसन खरपुस भाजावे. ३. हे सर्व एका भांड्यात गार करावे. ह्यात १ कप गुळ, विलायची पावडर व जायफळ पावडर टाकावी. ४.

प्लॅनेट ऑफ एप्स् (सिरिज)

लेखक गणपा यांनी रविवार, 15/01/2012 02:01 या दिवशी प्रकाशित केले.
विसु. : ही चित्रपटाची ओळख वा परिक्षण नाही. फार तर सहावी सातवीत असेन, तेव्हा दुरदर्शनवर शनीवारी की रविवारी रात्री इंग्रजी चित्रपट लागायचे. मराठी माध्यमवाले आम्ही, आमचं इंग्रजी यथा तथाच होतं. (कोण रे तो अजुनही तसच आहे म्हणतोय?) पण इंग्रजी सिनेमे आवडायचे. मुकपट समजुनच पहायचो. तर एका शनीवारी की रवीवारी रात्री मामाचा फोन आला की एक मस्त चित्रपट लागाय बघ. तेव्हा वाहिन्यांच जंजाळ नव्हतं त्यामुळे दुरचित्रवाणीसंच लावताच चित्रपट नुकताच चालु झालेला दिसला पण तरी चित्रपटाचं नाव आधीच येउन गेलं होतं.

तिळाच्या वड्या ---

लेखक निवेदिता-ताई यांनी शनिवार, 14/01/2012 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - तिळ दोन वाट्या व शेंगदाणे एक वाटी , गूळ बारीक चिरलेला अडीच वाट्या, साजुक तुप दोन चमचे. पुर्वतयारी -- - तिळ व शेंगदाणे खमंग भाजुन घ्या व त्याचे कूट करुन ठेवा. किचन ओटा स्वच्छ पूसून ठेवा. कॄती --- कढईत गूळ व तूप एकत्र करुन पाक करायला ठेवा.

हवीच असते मी!

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 14/01/2012 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूयॉर्कच्या अतिप्रगत रस्त्यांवर सिंगापूरच्या अदृष्य गल्ल्यांमध्ये रोमच्या ऐतिहासिक चौकाचौकात आणि मुंबईच्या प्रत्येक फुटपाथवर निवांत लोळत पडून असते मी तुमच्या दिशादर्शक नाकाखाली गाडीच्या पारदर्शक काचेबाहेर हवं तेच पाहणार्‍या डोळ्यांसमोर आणि तुमच्या घरामागच्या बोळीत सुखेनैव विहरत असते मी उंची मखमली बैठकींवर बसून सिंगल मॉल्टच्या घुटक्यांबरोबर कबाबसोबत तोंडी लावायला मला हटवायच्या गप्पा करतात तेव्हा पांढर्‍या गणवेशात 'सर्व्ह' करते मी अ‍ॅपलपासून बर्गरपर्यंत आणि केकपासून पिझ्झ्यापर्यंत ठासून भरलेल्या फ्रीजसमोर आमचा बबडू काही खातच नाही म्हणतात तिथेच अर्धपोटी भांडी घासते मी कचरा काढायला, गाड्या ध