Skip to main content

बनावट औषधांच्या सेवना मुळे पाकिस्तानात १०९ म्रुत्युमुखी.

लेखक तर्री यांनी सोमवार, 30/01/2012 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
बनावट औषधांच्या सेवना मुळे पाकिस्तानात १०९ जणांना प्राण गमावावे लागले आहेत. बनावट औषधांचा हा महाराक्षस दिवसेंदिवस विक्राळ रूप धारण करणार असे दिसते आहे. आज ही घटना पाकिस्तान पुरती मर्यादित असली तरी , भारत ह्या प्रकारच्या > ह्या हून भयानक अपघाताच्या अगदी काठावर उभा आहे. भारतामध्ये बनावट औषधांची बाजारपेठ ५००० कोटी रुपपायांची आहे. गेल्या काही वर्षात ही बाजारपेठ झपाट्याने वाढते आहे. ह्या बनावट औषधांचे अनेक प्रकार आहेत. १ . कमी प्रमाणात औषध असणे ( मापात पाप ) ,२. अजिबात औषध नसणे ३. दिसायला मुळ ब्रान्ड सारखेच औषध बनवून फसवणूक करणे ४.

सफर / ओळख अहमदनगरची..

लेखक पियुशा यांनी सोमवार, 30/01/2012 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
सफर / ओळख अहमदनगरची.. नमस्कार मी. पा. करांनो , मी पियू , आज अन पुढे येणाऱ्या भागांत मी तुम्हाला अहमदनगरची ओळख / सफर घडवून आणणार आहे. अहमदनगर शहराचा इतिहास ,इथल्या पौराणिक वास्तू, संग्रहालये , महाल , तीर्थस्थाने अजूनही इतर बर्याच गोष्टीशी आपण सर्वाना परिचित करून देण्याचा मानस आहे ,तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवून पहिला भाग टाकत आहे . ई . स . वी सन १४९४ मध्ये मुघल बादशाह अहमदशहा यांनी अहमदनगर शहराची स्थापना केली . ( याचा इतिहास मी पुढच्या धाग्यात सविस्तर देणार आहे ) ह्या २६ जाने.

आणि अनंतकालाची माता असते

लेखक शरद यांनी सोमवार, 30/01/2012 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
...आणि अनंतकालाची माता असते. उपगुप्त हा नगरश्रेष्टीचा मुलगा. गजांत लक्ष्मी घरांत वास करत होती. उधळावयाला, छानछोकी करावयाला कशाचीच ददात नव्हती. तो तरुणपणीच वासवदत्तेच्या सहवासात आला. ही शहरातील यौवनसंपन्न, लावण्यखनी, कलांचतुर गणिका. दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले. गोष्टीचा सुखांत शेवट व्हावयास काहीच अडचण नव्हती. नव्हती, पण एक अघटित घडले. शहरात गौतम नावाचा एक मुनी आला. त्याने बोधीवृक्षाखाली तपश्चर्या करून जीवनाचा "अर्थ" शोधून काढला होता. त्याच्या प्रवचनांना अलोट गर्दी लोटत होती. गंमत म्हणून उपगुप्तही एक दिवस प्रवचनाला गेला. आणि त्यांतच अडकला.

गॉसिप

लेखक स्पा यांनी सोमवार, 30/01/2012 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
Architectural Animation हा प्रकार आता Design क्षेत्रात चांगलाच रुळला आहे, आता तर तो त्याचा एक अविभाज्य घटकच झाला आहे. 3D visualisation हे एक करिअर होऊ शकत यावर माझा स्वताचाही आधी विश्वास नव्हता, किंबहुना मला त्याविषयी काही माहिती देखील नव्हती. Animation म्हटल कि डोळ्यासमोर कार्टूनच उभी राहायची, किंवा 3D गेम . पण त्यापुढेही हे क्षेत्र किती अफाट आहे , हे हळू हळू आता कळायला लागलंय. पूर्वी एखाद्याला बिल्डींग, स्टोर, किंवा interior करायचं असेल, तर त्याला संपूर्णपणे interior designer किंवा Architect च्या भरोसे रहाव लागायचं.

तात्यांना गाण्याच्या रसग्रहणाची विनंती

लेखक शुचि यांनी रविवार, 29/01/2012 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय तात्या, परवा यु ट्युबवर शोध घेत असताना पुढील नितांता श्रवणीय गीत सापडले. कितीही ऐकले तरी मन काही केल्या भरतच नाही असे. या गीताखाली काही प्रतिसादांमध्ये असे वाचनात आले की गैरफिल्मी असे गीता दत्त या ज्येष्ठ गायिकेने गायले असून "बंगाली" पद्धतीचे हे गीत आहे. माझ्या विनंतीस मान देऊन, आपण या गाण्याचे रसग्रहण कराल काय? सुरवातीला उडत्या चालीचे हे गाणे नंतर मध्येच "विरह व्याकुळ" आलाप लेऊन सामोरे येते. विशेषतः - "बिरही गगन रोये" या ओळींपासून. येथे राग बदलला आहे का? हे गाणे मनावर इतकी जादू करते त्याचे कारण गीता दत्त यांचा स्वर्गीय आवाज केवळ की विविध (कदाचित) रागांची मनोहारी गुंफण?

एक बहारदार जुने गाणे

लेखक प्रदीप यांनी रविवार, 29/01/2012 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी पूर्वी ऐकलेले एखादे गाणे मनात पुन्हा अचानक उतरते. मग ते काही दिवस मनात घर करून बसते. तसे मला अलिकडे मालती पांडेंच्या 'कशी रे तुला भेटू' ने वेढले आहे. http://www.aathavanitli-gani.com/Song/Kashi_Re_Tula_Bhetu सुमारे १९४५ नंतर मराठीत भावगीतांचा नवा जमाना आला. ह्याची सुरूवात गजानराव वाटवे ब बबनराव नावाडीकर ह्यांनी केली. नंतर इतर अनेक कवि/ कवयित्रींच्या रचना घेऊन, अनेक नवनव्या गायिकांसह इतर संगीतकार त्यात उतरले. त्या गायिकांतील एक अग्रगण्या नाव म्हणजे मालती पांडे.

संसर्गजन्य जिवाणू

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 29/01/2012 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी एका माणसाच्या शरीरात नाकावाटे शिरलो. म्हटले याला चांगला मोठा संसर्गजन्य रोग लावावा. कारण आम्ही जातीने जीव-जंतू जिवाणू विषाणू.

तुम्हाला हवा तसा पापलेट तंदुर / ग्रिल्ड पापलेट / पापलेट फ्राय

लेखक jaypal यांनी रविवार, 29/01/2012 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
वर नावातच आहे "तुम्हाला हवा तसा" तर नानव्हेज मंडली साठी तुम्हाला आवडेल ते उदा. पापलेट्,सुरमई,हालवा,रावस,चिकन मटन ई. व्हेज मंडली साठी तुम्हाला आवडेल ते उदा. बटाटा, पनिर, रताळे, बेबीकॉर्न ई. मी पापलेट घेतला आहे. पापलेट आख्खा घ्या किंवा फोडी करुन घ्या.