Skip to main content

असा अविचार करू नको

लेखक मूकवाचक यांनी बुधवार, 08/02/2012 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
[फरहाद शहजाद यांची मेहदी हसन यांनी गायलेली 'तनहा तनहा मत सोचा कर' ही गझल ऐकताना सुचलेले मुक्तक] निर्जन एकांती असे रे, भलते विचार करू नको जीवावर बेतेल मित्रा, असा अविचार करू नको खूप झाले क्षणभरासाठी, लाभली मुग्ध प्रीती तुला रे खोटी खरी याची आता, शहानिशा तू करू नको डसणे जिचा 'धर्म' आहे, डंख ती मारून गेली साहणे हे तुझे प्राक्तन, भोगताना विव्हळू नको एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली वर्म आकळले तुला रे, उगाच आता झुरू नको हरलास जरी बाजी जराशी ,सर्वस्व पणाला लावूनी कैफात धुन्द रहा जुगार्या, रूक्ष हिशेबी गुंतू नको जळो वांझ पश्चातबुद्धी, ऐक माझे जरा 'मुक्या' तू डाव नव्याने मांड आता, उगाच ते

एकांग

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 08/02/2012 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुझा; तुझ्याविण फास पारधी; हरलो तुज छबी मागुती वलय गणत उलगडलो तू मुक्त लोळ तडितेचा; मी वृक्ष जखडला मातीचा पसरून विशाखा ओंजळ होउन फुललो पाताळ शोधिले पाहिले न कधि मागे हृदयातिल स्पंदन अंकुर अजुनी जागे भ्रमणात; भ्रमाच्या छायेपाठी फिरलो नवक्षितिजावर मेघांकित दिनकर झालो पाहून पालखी पलकांची; मी फसलो बोलक्या स्मिताच्या लहरींवरती झुललो क्षण कांही पण अंतरास स्पर्शुन गेले एकांग रणी काजळात अंती विरलो ...........................अज्ञात
काव्यरस

मेघा रे... मेघालय !

लेखक चिगो यांनी मंगळवार, 07/02/2012 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: धमु आणि माझी खवखव च्यायला, तू एक काम का नाही रे करत. ते लाईन आणि फोन वरुन आठवलं. इशान्य भारताबद्दल एकुणच लोकांचं अज्ञान अगाऽढ असतंय. तिथल्या पध्दती, जिवनमान, जगण्याची धडपड आणि सरकारी प्रयत्न ह्यावर का नाही लिहित काही? खूप चांगली आणि माहितीपुर्ण लेखमाला होईल...शिवाय पुर्णतः दुर्लक्षित म्हणवल्या जाणार्या भागाची माहितीही होईल लोकांना. ************************************************************** तर आमच्या ह्या दोस्ताच्या विनंतीवजा ऑर्डरीने मी हा लेख लिहतोय..

पितृदेवो भव.............?

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 07/02/2012 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
मातृदेवो भव पितृ देवो भव.......... या विचारांचा पगडा अजून दूर होत नाही. असे कोणाला तरी म्हणत असतानाच शशीकांतचा फोन आला. विजुभाऊ वेळ आहे का? माझ्या एका मित्राना घेऊन येतोय. ठरल्या वेळेच्या पाच मिनिटे अगोदरच एका मध्यवयीन गृहस्थाना घेऊन शशीकांत आला. त्याने मला ओळख करुन दिली थोडेसे बोलणे झाल्यावर शशिकांत म्हणाला याना तुमच्याशी काही बोलायचे आहे. तुम्ही बोला मी निघतो. त्या गृहस्थाना पाहिल्यावर मी थोडासा अंदाज केला. मुलगा अभ्यास करत नाही/ नोकरी नाही वगैरे वगैरे असे काहितरी असेल. पहिल्यांदा ते काहीच बोलत नव्हते.

इच्छा !

लेखक चैतन्य दीक्षित यांनी मंगळवार, 07/02/2012 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
कोणते शब्द वापरू तुझे गुण गाण्या, तू स्फूर्तीचीही मूळ प्रेरणा असशी, मी इच्छा करतो आणि कौतुके तूही लेखणीतून या सारे लिहवुन घेशी | मग शब्दांना त्या लाभे अमृत-उपमा, अर्थाला द्याया उपमा न चले बुद्धी, हे मी नच केले, घडले तुझ्या कृपेने, ही जाणिव होता मनास लाभे शुद्धी | हे सगळे तरिही शब्दरूप, बाह्यांगी, तू निसटुन जाशी मना मोहवुन माझ्या अन् पुन्हा एकदा तुझे रूप-गुण गाण्या, अन् तुला पकडण्याची मज होते इच्छा | - चैतन्य दीक्षित

प्राजक्त फुलला दारी

लेखक जागु यांनी मंगळवार, 07/02/2012 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजक्ताचे नाव काढताच डोळ्यासमोर येतो तो प्राजक्ताचा सडा त्याचा मंद सुगंध. प्राजक्ताच्या फुलाच रुपडंही अगदी सुंदर, केशरी रंगाचे देठ ह्याचे खास आकर्षण. प्राजक्त साधारण जुलै, ऑगस्टमध्ये बहरून येतो. असेच एक प्राजक्ताचे झाड माझ्या लहानपणी माझ्या माहेरच्या अंगणात होते. पावसाला सुरुवात झाली की काही दिवसांतच हा प्राजक्त बहरून यायचा. सकाळी छोट्या असणार्‍या कळ्या संध्याकाळी टपोर्‍या झालेल्या पाहताना मला खूप मजा वाटायची.

सरस्वती.. एक लोकमाता

लेखक शरद यांनी मंगळवार, 07/02/2012 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
सरस्वती ... एक लोकमाता सरस्वती लुप्त होऊन हजारो वर्षे झाली. हिमालयात उगम पावून हरियाना, पंजाब, राजस्थान,गुजराथ मधून वहात जाऊन कच्छच्या रणात समुद्राला मिळणारी सरस्वती, ऋग्वेदात जिचे रम्य वर्णन केले आहे, एके काळी जिचे पात्र ८-१० किलोमीटर रुन्द होते, जिच्या काठावर भारतातील सर्वात पुरातन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत , अशी सरस्वती आज मात्र तुम्हाला पहावयासही मिळत नाही. तिच्या पाण्यावर आज तुम्ही शेती करू शकत नाही. तिच्या लेकरांची तहानभूक ती आज भागवू शकत नाही. भूगर्भातील उत्पातामुळे तिचे पात्र आटले पण तिचे प्रेम मात्र आजही आटलेले नाही. आजही ती भारताला सुजलाम्-सुफलाम् करावयास आसुसलेली आहे.

भेट

लेखक प्रेरणा यांनी मंगळवार, 07/02/2012 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
जागे होण्याआधी गोकुळ शांत अजुन पानांची सळसळ चंद्र केशरी अजुनी आभाळी पहाटवारा वाहे अवखळ अजुन जुईची बंद पाकळी नसे अजुनही किलबिल जागी खट्याळ वारा घाली फुंकर होई हलके राधा जागी दाट सावळ्या केसांना मग हळुच सारुन मागे काना अर्ध्या मिटल्या लोचनात त्या पहिली आठवण होते कान्हा अधीर्‍या ओल्या अंधारातुन भारावून ती चाले वाट तिलाच ऐकू येतो आणिक यमुनेचा तो हिरवा काठ दिसते तेथे बाहू पसरुन तीच आकॄती ओळखीचा बांधा घुमु लागता त्याचा पावा राधा नुरते आता राधा