क्र्र्रर्र्र्र दाराचा आवाज करत हळूच दाराच्या आडून एक चेहेरा " आत येवू का बाई ?" असा आवाज देवून गेला .
मान वर न करताच मी " हम्म " उत्तर केल . रोजच्या सवयीप्रमाणेच सारं .
ती स्त्री हळूहळू चालत खुर्ची शेजारी येवून उभी राहिली . मग मात्र माझी नजर सरळ तिच्या चेहेर्यावर गेली.
पस्तिशीतली एक कळकट्ट चेहेर्याची ,लांब सडक केस असणारी ..अगदी उंचपुरी .
शरीराने काहीशी मलूल , अशक्त , पण शांत चेहेर्याची एक विधवा माझ्यासमोर येवून उभी राहिली . हल्कस स्मित
करून मी तिला खुर्चीवर बसायला सांगितल तशी ती साडीचा पदर हाताने पुढे घेत सावरून बसली .