आयुष्याच्या कॅलिडोस्कोपमध्ये वेगवेगळ्या वळणांवरती वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला भुलवतात, आकर्षक वाटतात. आता लहानपणीच पहा ना, असं मूल क्वचितच सापडेल ज्याला फुलपंखी पर्या, राजपुत्र-राजकन्या, आगीच्या ज्वाळा ओकणारे , आकाशात संचार करणारे ड्रॅगन यांनी मोहविले नसेल.
त्याच लहान मुला/मुलीने जरा तारुण्यात पदार्पण केले की वसंतोत्सव, बहाराचा काळ सुरु होतो.ज्या ड्रॅगनची भीती लहानपणी वाटत असते तोच ड्रॅगन जिंकावासा वाटू लागतो. "Evoke the fire within" अशा धाडसी वृत्तीचा वाटून खुणावू लागतो.