Skip to main content

"पुरुषांची" खरच गरज आहे का ?

लेखक तर्री यांनी रविवार, 25/03/2012 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व सजीव सृष्टीत दोन मूलभूत प्रेरणा असतात. १.स्वतःचे संरक्षण आणि २.प्रजोत्पादन. सगळ्या सृष्टीमध्ये मानव प्रगत आहे पण हया दोन प्रेरणा मानाव जातीतही तीव्रतेने दिसून येतात. उत्क्रांतीमुळे मानवाच्या बुद्धीचा विकास झाला. हया बुद्धी-विकासाने मानवाला विज्ञानाचे वरदान लाभले.मानव जात ही कळपाने रहाणारी / समाज प्रिय मनात आहे. कळपाने रहाणार्या प्राण्यामध्ये अनेक प्राण्यांप्रमाणे मानव जात ही “मादी-केंद्रित” (female centered) ,“मातृ-सत्ताक” होती. चाकाच्या शोधा नंतरचा महत्वाचा शोध - शेतीचा शोध मानवाला लागला. शेतीच्या शोध लागे पर्यंत मानाव भटका होता. स्त्री ही कुटुंब प्रमुख होती.

*** चैत्र नवरात्र ***

लेखक मदनबाण यांनी रविवार, 25/03/2012 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या ठाण्यात चैत्र नवत्राचे उत्सवी दिवस सुरु आहेत्,ठाण्यातल्या जांभळी नाका इथे असलेल्या मैदानात दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी देवी स्थानापन्न झालेली दिसली आणि मला तिचे दर्शन घ्यायची इच्छा झाली. जमेल तसे फोटु काढण्याचा प्रयत्न केला आहे कृपया गोड मानुन घेणे. :) प्रवेश करता क्षणीच गजाननाचे लोभस दर्शन झाले.

" स्वप्नामधली जमाडीजंमत "

लेखक विदेश यांनी रविवार, 25/03/2012 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
कावळा करतो कुहू कुहू कोकिळा करते काव काव फोडते मांजर डरकाळी वाघोबा करतो म्याव म्याव पळे सर सर सर हत्ती निवांत चाले हळू खार ती कोल्होबा चिडीचूप बसतो ससोबा गुरगुरगुर करतो आरोळी उंदीरमामाची ती वनराजाला वाटे भीती माकड चाले जमिनीवर कासवाची उडी झाडावर आई छान सांगते गंमत बंडू ऐके पेंगत पेंगत रंगुनी जाई बघत बघत स्वप्नामधली जमाडीजंमत

गावी जमिन घेण्यापुर्वी आवश्यक गोष्टी ....

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 25/03/2012 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच एक लेख वाचनात आला...अर्थात "मिसळ-पाव" वर... जमिन, घर आणि मनस्ताप.... तो लेख आणि त्याच्यावर आलेल्या प्रितिक्रिया वाचुन, मी पण जमिन घेण्यापुर्वी खालिल गोष्टीन्ची तयारी आधी करावी असे म्हणतो... १. शस्त्र आणि परवाना घेणे .....(आधी शस्त्र आणि मग परवाना घ्यावा म्हण्तो...सध्या तरी वारे असेच वाहत आहे) २. आधी घर बान्धावे आणि मग परवानगी काढावी असा "आदर्श" पहिल्यापासुनच आहे.... ३. रोज दारु पिवुन गावात धुमाकुळ घालावा... ४.

रेल्वे प्रवास!

लेखक amit_m यांनी रविवार, 25/03/2012 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी मी रेल्वेच्या AC 2 TIER या वर्गातून सुमारे १०००किलोमीटर प्रवास केला. आरक्षण तत्काळ कोट्यातून आंतरजालावरून केले होते. सांगायचा मुद्दा असा की तिकिटावर माझे नाव आणि ओळखपत्र नंबर चुकीचा टंकित झाला, त्यामुळे तिकीट परीक्षकाने माझ्याकडे तिकीटाची पूर्ण रक्कम + २५० रुपये असा दंड मागितला. मी दंड द्यायला नकार देऊन त्याच्याशी बरीच हुज्जत घातली आणि शेवटी विजयी झालो. याबाबत रेल्वे चा नियम काय आहे? तिकिटाचे पूर्ण पैसे दिले असताना फक्त नाव आणि ओळखपत्र नंबर चुकीचा असल्याने दंड भरावा काय? (मी ओळखपत्र म्हणून PAN card दाखवले होते)

शाळा?

लेखक किचेन यांनी शनिवार, 24/03/2012 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
सगळीकडे 'शाळा'चा फार उदोउदो चालला होता म्हणून बघितला.सुरुवातीलाच डोक्यात गेला.मी पुस्तक वाचल नाहीये,त्यामुळे मूळ पुस्तकाचा विषय मला माहित नाही.पण इथे तर पूर्ण चित्रपट विषयावरच बनवलाय.नववीतल्या मुलांच्या मानाने आणि शाळा या नावाचा विचार केला चित्रपटात शाळेचा फळा आणि वर्ग एवढंच आहे.बाकी शाळेची मुल,त्यांची टिंगल टवाळी कॉलेजमधल्या मुलांसारखीच आहे.

[मदत हवी] टाटा कम्युनिकेशन्स/व्हीएसएनेल पासून सावध राहा

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 24/03/2012 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
टाटा कम्युनिकेशन्स (पूर्वीचे व्हीएसएनेल) ने माझे जवळ जवळ १४-१५ वर्षे जुने पोस्टपेड डायल-अप अकाऊंट अचानक बंद केले. त्यामुळे मला सध्या भयानक मनस्ताप होत आहे. कारण हा माझा ईमेल पत्ता असंख्य ठिकाणी दिलेला आहे. चवकशी केल्यावर त्यांनी मला पैसे न भरल्याचे कारण सांगितले. वास्तविक मी त्यांना माझ्या क्रेडिट कार्डवर बील चार्ज लावण्याकरता योग्य ती परवानगी दिलेली होती. त्यांनी मला कोणतीही नोटिस/पूर्वसूचना दिलेली नाही. मला याबाबतीत कायदेशीर कारवाई काय करता येईल याची माहिती हवी आहे.

सांब भोळा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 24/03/2012 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
रानात सांब भोळा उघडा असे दुपारी 'देवा कसाही तू रे...!?' मी एक त्या विचारी म्हणतो मलाही सांब 'मी खेळ तव मनाचा, असतो निसर्ग सारा.. कधी देव का कुणाचा..?' 'पडणार साऊली जी माझेच अल्प रूपं.., का बांधता तुम्ही हे.. नसते खुळे हिशेबं..?' 'व्यापुनि चराचरी या मी विश्वरूपं सारे..., माझेच भोग मजसी.. छळतीलं का कधी रे..?' 'तुमच्या खुळ्या स्वभावी मज देव-जन्म आहे.., कुणी 'देवं' का म्हणा ना..? अंती निसर्ग आहे...!' 'त्याचीच शुद्ध किमया भासे तुम्हा उन्हाळा, निर्जीव मूळचा मी तुमचाच सांब भोळा...!'
काव्यरस