Skip to main content

मी वळूनी हासले - चुकले जरासे

लेखक सांजसंध्या यांनी मंगळवार, 27/03/2012 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी वळूनी हासले - चुकले जरासे प्रश्न त्याचे टाळले, चुकले जरासे उत्तराशी थांबले, चुकले जरासे शीळ त्याची ओळखीची रानभूली मी वळूनी हासले - चुकले जरासे पाळले ना भान तू मज छेडतांना लाजले मी लाजले, चुकले जरासे भावनांना बांधले त्या, धुंद राती आज का सैलावले चुकले जरासे बंद होते द्वार माझे तव सुरांना का कशी नादावले - चुकले जरासे रोखले मी आसवांच्या आठवांना शेवटी रागावले - चुकले जरासे सोडतांना गांव जे मन घट्ट केले त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे सांजछाया दाटल्या या अंगणाशी मी पुन्हा भांबावले, चुकले जरासे संध्या २६.११.२०१० रद्दीफ : एक शेर कुणीतरी एसेमेस केला होता. त्यातला चुकलो का ...

तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 27/03/2012 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? ह्या शंकेच उत्तर मला अजुन मिळाल नाही आहे. ह्याला कारणही तसच घडल. परवा रवीवारी , मी व माझे दोन मित्र एका प्रसिध्द फडात तमाशा पहायला गेलो होतो. बाहेर बरीच लांब रांग लागली होती. त्या रांगेत उभे रहीलो असतो तर सहजच आम्हाला दोन ते तीन तास लागले असते तिकिटं काढायला. माझ्या मित्राने तिथे असलेल्या 'साखरभाताला' विचारले आज ही रांग एव्हढी लांब का आहे? तर तो म्हणाला जत्रेच्या सुपारीची आहे. ती रांग एव्हढी लांब होती की मला खरंच नवल वाटल की जर जत्रेत फड भरवून ह्या मातीची संस्कृती जपली जात असेल तर मग आपली संस्कृती फक्त तमाशांवर चालायला हवी. नाचव बाई जप संस्कृती.

एका चोरीची चित्तरकथा

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 27/03/2012 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्याचे दिवस. उकाडा जबरदस्त वाढलेला. आणि गावात चोऱ्यांचे प्रमाणही वाढलेले. दर ४-५ दिवसांनी एक एक नवीन चोरी होऊ लागलेली. भुरटे, सराईत आणि हुमदांडगे असे सगळेच चोर मोकाट सुटलेत की काय असे वाटण्या इतके चित्रविचित्र , सुरस आणि चमत्कारिक चोऱ्यांचे प्रकार ऐकायला मिळू लागलेले. एक एक किस्से ऐकून लोक थक्क होत. होता होता एक दिवशी चक्क आमच्या कॉलनीतच चोरी झाली. तोही प्रकार इतका चमत्कारिक की पहाटेच्या वेळी कटावणीने दार उघडू पाहणाऱ्या चोरांना घरातील आजोबांनी (चष्मा घातला नसल्यामुळे) मालकाचे मित्र समजून स्वत:च कडी वगैरे काढून आत घेतले !

प्रतिभाबाईंचा प्रचंड प्रवासखर्च !

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 27/03/2012 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या लाडक्या , पहिल्या महिला राष्ट्रपतीबाईंचा परदेश प्रवास हा तब्बल २०५ कोटी रुपये इतका भारी ठरला आहे. बाईंनी नि:संकोचपणे सढळ हस्ताने आपल्या कुटुंबियासहित मुबलक दौरे केले. ह्यातल्या कुठल्याही दौर्याचा भारताला काडीचाही फायदा नाही हे वेगळे सांगायला नकोच. बाकी बाबतीत सुमार असणारी ह्या बाईंची कारकीर्द ह्या बाबतीत अस्मानही ठेंगणे वाटावी अशी उत्तुंग आहे. एका राजकारणी घराण्यातली एक स्त्री. पण त्यांच्या कारकीर्दीत त्यांच्या कुटुं बियां बद्दल मुख्यतः वादग्रस्त, वाईट असेच ऐकले आहे. अमरावतीत कुठल्याशा कार मधे कोट्यावधी रुपये सापडले आणि ते म्हणे निवडणूकीत वाटायला आणले होते.

क्रुसावरिल माणिक

लेखक ajay wankhede यांनी मंगळवार, 27/03/2012 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
तू आलास ,थांबलास, आणि मनाला चटका लाऊन गेलास. शब्दांना शब्दांच्याच माळेत गुंफलेस तु लय, ताल, माधुर्य सार्‍यांनाच थंड निखार्‍यावर जाळलेस तु चालावयास पायवाट होति या नागफणिच्या वनात हळुवार कोरलीस आपलीच पायवाट तू पाणी विद्रोहाचे पिऊनि, उतरलास सागरात या झेलणारा मंथने हजारो तु एकटाच देवमासा मज नाहि आज दु:ख क्रुसावरिल 'माणिका' होशिल भाग तु या मैत्रेय जातकाचा. ................................................................................................................... कविवर्य 'ग्रेस' यांना विनम्र अभिवादन
काव्यरस

फोटोशॉप किडे - भाग १

लेखक स्पा यांनी मंगळवार, 27/03/2012 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांसाठी फोटोशोप शिकवण्याचा हा छोटासा प्रयत्न आपण आज फोटोंवर संस्करण कसे करतात , त्याची ओळख पाहू फोटोशोप उघडा file --- open --- तुम्हाला हवी असलेली image हा फोटो मी घेतलाय आता उजव्या कोपर्यात जी window आहे , त्यात background या नावाने आत्ताच्या फोटोचा layer बनलेला आहे , त्यावर right click करून duplicate layer करा

अलखपैंजणी परखडमोती

लेखक शरदिनी यांनी मंगळवार, 27/03/2012 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
सुशिरनभाले चरित्रक्रांता लखलख दर्जा झुरतो दर्द शिरशिरी बाधा व्याकूळ साहित्याला लुचतो नवगेयाच्या शिंकाळ्यावर तीर्थ दुपारी झडतो झळझळ जिव्हा हरित भुसनळे सम्यकधावन करतो सुकल्या ओष्ठी निबंधतस्कर मारे वारे स्त्रवतो रुधिर धाबळी साजणलपलप आस्वादातून डुबतो विझल्या पणतीवरी धुराच्या नक्षीलाही गिळतो त्या वातीवर त्या गंधावर शतखंडाने जळतो चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो शरदिनी.... पुणे २६ मार्च २०१२

चंद्रकोर आणि चांदणी

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 26/03/2012 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री पश्चिम क्षितिजावेळ काही काळ एक तेजस्वी चांदणी/ तारा चंद्रकोरीच्या बराच जवळ दिसत होता. अर्थात फोटोमध्ये ते बर्‍यापैकी दूर दिसतात पण ती फ्रेम म्हणजे विस्तिर्ण क्षितिजावरचा एक लहानसा भाग आहे त्यामुळे तसे दिसते. moon1 lr moon2 lr

ग्रेस!!

लेखक शैलेन्द्र यांनी सोमवार, 26/03/2012 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
टीचली काच बिलोरी, दुखा:चा हलला पारा, अस्फुट वेदना जाते, मग वाहे उदास वारा.. एकाकी होता कोणी, रिचवित विषाचे प्याले, हळुवार तरल जखमांचे, गुंफीत मोती ओले.. शब्दांतुन द्यावे त्याने, चरचरीत तलम हुळहुळते, अन जग शोधित बसते, त्याच्याशी आपुले नाते.. रक्तातील गहरी त्याने, काजळी लपवली नाही , नक्षीत कवडश्यांच्या, कधी प्रकाश चोरला नाही.. कोंडले आतुन काही, विष्षण्ण नाद निनादे, झुंबर दचकुन हलले, अन लोलक एक उनावे.. -- शैलेंद्र
काव्यरस