अष्टभूजा...की....अष्टावधानी की....
एक वर्ष झाले आणि आम्हाला घरी जायची ओढ लागली..कंपनीत रीतसर अर्ज केला आणि तिकीटाची वाट बघत बसलो...
घरी तशी कल्पना दिली आणि घात झाला..
दुसऱ्या दिवसापासून बायकोने सामानाची यादी द्यायला सुरुवात केली...ह्या वेळी सुका-मेव्या शिवाय इतरही यादी खूप होती...मी पण खूपच चिडलो आणि बायकोसाठी काहीच खरेदी करायची नाही असे ठरवले...
एक दिवस रजेचा अर्ज मंजूर झाला आणि मी विनंती केल्याप्रमाणे दुबई थांबा असलेले तिकीट पण मिळाले... चला आता पूर्ण १ महिना फक्त आराम...
मिसळपाव
आम्ही दोघांनी नवीन गाडी घेऊन महिना झाला होता पण अजून बाहेर हिंडायला गेलो नव्हतो, म्हणून गेल्या शनिवारी तुषारला फोन केला
मी: काय रे काय करतोयस ?
तुषार: काही नाही रे !!! आराम चालू आहे.
मी: चल मग उद्या कुठे तरी लांब भटकून येऊ. पालीला जाऊन येऊ.
तुषार: थांब जरा, तुला संध्याकाळी फोन करून सांगतो.
मी: ठीके !!!
आमच्या आळशी गड्याने (तुषार) संध्याकाळी फोन तर केला पण म्हणाला पाली नको, जवळच्या जवळ नारायणपूरला जाऊन येऊ. मी म्हणालो ठीके हे नाही तर ते.