काळ कोठडी (भाग -१)
पांढरा शुभ्र रंग दिलेली चौकोनी खोली,साधारण १० बाय १० ची,पंखाही पांढराच .. टेबल ही पांढरेच, आणि त्या गोळ्याही पांढरया ..आयुष्यातले रंग कसे काढू किथे उडून गेले कळलेच नाही. म्हणून मीच सांगितलं उषेला, खोलीला पांढरा रंग देऊन घे.जीवन रंगहीन झालंय तर खोलीला रंग असून काय उपयोग? पंख्याने पण मान टाकली, आज माझी शेवटची सोबतही संपली.. मगाशी आवाज येत होते, उषा मनधरणी करत होती त्या वायरमनची,पगार नाही आला, उद्या अल्ला की बील भरते, मिस्टर आजारी आहेत, जरा माणुसकी दाखवा. त्याने ऐकले नसेलच..
मिसळपाव
ब्लड मनी हा महेश भट्ट साहेबांचा चित्रपट, अर्थात तो कुठूनतरी ढापलेल्या प्लॉटवरून तयार केलेला असणार हे उघड होतेच. त्यातून त्याला अभिनयसम्राट कुणाल खेमू आणि जगप्रसिद्ध अभिनेत्री अम्रिता पुरी असल्याचे कळले आणि आम्ही ब्लड मनी विषयी वाचायचे देखील बंद केले.