Skip to main content

हैदराबाद...

लेखक उगा काहितरीच यांनी सोमवार, 23/04/2012 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ... ब-याच दिवसांनी मिपावर लिहिन्याची संधी मिळतेय. तेव्हा नविन वस्तव्याबद्द्ल थोडेसे.. सध्या आमचा मुक्काम आहे हैदराबादला. जावा शिकन्यासाठी. शिकन्यासोबतच बरेचसे फिरणे सुद्धा झाले. पहिल्यांदा भेट दिली ती बिरला मंदिरला. बिरला मंदिरमध्ये गेल्या गेल्या मोबाईल वगैरे खालीच ठेवावा लागतो त्यामुळे फोटो काढन्यापेक्षा परीसर पाहन्यातच समाधान मानावे लागते. जी की खरोखरच चांगली गोष्ट आहे. बिरला मंदिर हे कोण्या एका विशीष्ट देवाचे मंदिर नसुन भरपुर मंदिरे एकत्रीतच आहेत. प्रत्येक देवाची विशीष्ट प्रकारे पुजा वगैरे होत असते. प्रत्येकच मुर्ती केवळ अप्रतीम... मला आवडलेली मुर्ती म्हणजे बालाजीची .

जमात : visitors

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 23/04/2012 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
या आधी आपण आमच्याबरोबर काही जमातींचा अभ्यास केलात (आधी पंचनामा केलात असे लिहीले होते ) .आज आपण ज्या जमातीवर प्रकाश दिवाकर सोनपितळे टाकणार आहोत, त्या जमातीत सध्यस्थितीत मानव म्हणुन जन्म घेणार्‍यास किमान एकदा तरी जावे लागते असे सदरहू लेखकांस वाटते, तसे लेखकासं बरच काही वाटते, ऊदा.

दापोली - कर्दे

लेखक साबु यांनी सोमवार, 23/04/2012 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्याच्या गेल्या वीकान्ताला... दापोली - कर्दे येथे जाणे झाले... काही निवडक फोटो देत आहे.. मिपाकराना आवडतील अशी आशा करतो... १. आन्जर्ले येथे जाताना ... २. कर्दे येथील समुद्र कीनार्यावरुन सुर्यास्त... ३. डोल्फिन्स.. मुरुड बीच.... ४.

ऑपरेशन एंटेबी

लेखक अमृत यांनी सोमवार, 23/04/2012 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
२७ जुन १९७६, दुपारी साडेबाराला 'एअर फ्रांसचे' उड्डाण संख्या A १३९ हे एअरबस ३०० विमान ग्रीस मधिल अथेन्स विमानतळाहून पॅरीसला जाण्याकरीता उडाले. इज्राइल मधिल 'तेल अवीव' येथून निघालेल्या या विमानात २४८ प्रवासी व १२ हवाई कर्मचारी होते. विमानात मुख्यतः इज्राईल, फ्रांस, ग्रीक, अमेरीका, इंग्लंड तसेच इतर देशातील नागरीक प्रवास करीत होते. विमान अवकाशात झेपावताच अवघ्या काही वेळातच विमानाला २ पॅलेस्तीनी आणि २ जर्मन अतिरेक्यांनी अपह्रुत केले. पैकी २ अतिरेकी 'Popular Front for the Liberation of Palestine – External Operations' आणि उर्वरीत २ 'German Revolutionary Cells' या संघटनांशी संबंधीत होते.

नाव चालते नावीका रे

लेखक सांजसंध्या यांनी सोमवार, 23/04/2012 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
नाव चालते नावीका रे नाव चालते नावीका रे ............................. वाराभरली शीडे खुणावी, पैलतीराला निघाया रे ||धॄ|| जन्मभरिची ओझी घेती, दोन किना-या मधे तैरती रंगमंच हा वाही कुणाचा, पाण्या वरती रे... | १ | पल्याड जावे हीच आकांक्षा, कुणी मागता तुजला भिक्षा धीराने तू वल्हवित नेशी, चिंता कसली रे.. | २ | तरी कशाला चिंता वाहे, कर्मदरिद्री तया म्हणावे अज्ञान्याला कशी कळावी, ओळख तुझी ही रे | ३ | नाव चालते नावीका रे ................................ - संध्या
काव्यरस

दहि भल्ले

लेखक नेहरिन यांनी सोमवार, 23/04/2012 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
दहि भल्ले म्हणजे दहिवडे नाहित .हा एक चाट प्रकार आहे.यासाठी लागणारे साहित्य खालिल प्रमाणे. साहित्य :- १वाटी उडदाची डाळ, १पाकिट पाणिपुरिच्या पुर-या, १वाटी चिंचेची चटणी, १ टेबल स्पून चाट मसाला ,१ चमचा लाल तिखट, १ चमचा जिरे पावडर ,१ चमचा धने पावडर ,१/२ लिटर दुघाचे दही, मीठ ,१वाटी पिठी साखर,१/२ हिरव्या मिरच्या १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबिर. कृती :-उडदाची डाळ ४/५ तास भिजत घालावी. नंतर पाणि काढुन टाकुन त्यात २ हिरव्या मिरच्या घालुन मिक्सर मधुन वाटुन घ्यावी .

पुणे-नशिक प्रवास एक सुस्त(z...z...) अनुभव

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 23/04/2012 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो , परवा काही कामानिमीत्त पुण्याहून नाशिकला येण झालं, त्याचा हा वृत्तांत .... प्रवास म्हटला की कधी कधी कंटाळवाणा असतो तर कधी कधी एखादा चुस्त अनुभव देउन जातो. तुम्ही कोठे आणि कुणाबरोबर प्रवास करताय यावर बरच काही ठरतं.शिवाय प्रवास आपण कशानं करतोय यावरही बरच काही ठरत असतं. असो, बरच विषयांतर झालं, मुळ मुद्यावर येतो, नमनालाच घडाभर तेल नको घालायला. नाशिकला लवकर पोहोचायचं असल्याने पहाटे चारला मला उठवायला पार्टनरला सांगून ठेवले. त्याची सध्या नाईट शिप्ट संपून गेलेली होती पण त्या शिप्टच्या सवयीमुळे त्याला रात्री झोप लागत नाही. त्यामुळे त्याने बरोबर चार वाजता ओरडून उठवले.

नशिक -पुणे प्रवास एक मस्त(?) अनुभव

लेखक प्राध्यापक यांनी रविवार, 22/04/2012 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो , परवा काही कामानिमीत्त नाशिक वरुन पुण्याला येण झालं, त्याचा हा वृत्तांत .... प्रवास म्हणल की कधी कधी कंटाळवाना असतो तर कधी कधी एखादा मस्त अनुभव देउन जातो.तुम्ही कुठ आणी कोणाबरोबर प्रवास करताय यावर बरच काही ठरतं.शिवाय प्रवास आपण कशानं करतोय यावरही बरच काही ठरत असतं. असो,बरच विषयांतर झालं ,मुळ मुद्यावर येतो ,नमनालाच घडीभर तेल नको घालायला. पुण्यात लवकर पोहचायचं म्हणून पहाटे ४ वाजता चा मोबाइल मधे अलार्म लावला होता,तरी आवरता आवरता ६वाजले मग घरी नाष्टा करायचा विचार बाजुला सारला आणी गाडी काढली ,५ मिनीटाच्या आत हायवे ला लागलो, अर्थातच सकाळी रस्त्यावर फारशी वाहनं नव्हती ,एप्रील चा महीन

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी रविवार, 22/04/2012 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो. जादव पायेंग मात्र विसरभोळा नाही. सोयिस्करपणे विसरणे तर त्याच्या गावीही नाही.

सांग सांग भोलानाथ...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 22/04/2012 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज मार्केटयार्डातुन फुलं घेऊन परत येताना,डोस्क्यावरच्या उन्हानी आणी आधी मार्केटमधे याच उन्हाळ्यामुळे फुलांच्या अव्वाच्यास्सव्वा वाढलेल्या रेटनी चांगलाच तापलो होतो.साली आंम्ही कायमची गिर्‍हाइकं असुनही अतिमहाग किमतीनी अती पडिक माल उचलायची वेळ आली की हे असच होतं.बाहेर पार्किंगकडे येऊन आमच्या न्हेमीच्या हाटिलवर गेलो.तर आज तेही काही अ-परिहार्य कारणानी बंद...! म्हणुन दुसरी टपरी गाठली आणी तिथे चहा देणार्‍या पोर्‍यानी सक्काळीच घातलेल्या इस्त्रीच्या शर्टवर चहा सांडवला.मग त्याच्या मालकाच्या शिव्या उघड आणी माझ्या मनात देऊन झाल्या.आज आपला दिवस नाही.असं मनाशी पुटपुटत गाडी काढली आणी कुठेतरी निरा मा