Skip to main content

जन्नत २

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 07/05/2012 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
इम्रान हाश्मीचे चित्रपट चालण्याचे कारण गमतीने 'ASS' (Action, Songs, Sex) असे आम्ही कायम म्हणत आलेलो आहोत. नुकताच आलेला त्याचा जन्नत २ देखील ह्या सगळ्या अपेक्षांना पुरून उरतो. कुणाल देशमुखचे दिग्दर्शन आणि भट गँगचे प्रॉडक्शन हा चित्रपट घेऊन आले आहे. नेहमीप्रमाणेच हा चित्रपट mechanic ह्या चित्रपटावर थोडाफार बेतलेला आहे. अर्थात भट गँगची ती खासियतच आहे म्हणा.

हाऊ टू गेट पेड फॉर यू आर वर्थ

लेखक शुचि यांनी सोमवार, 07/05/2012 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एका मित्राच्या सांगण्यावरुन, मी अ‍ॅमेझॉनवरुन पुढील पुस्तक मागविले - "हाऊ टू गेट प

वालाच्या शेंगा अन चपात्या

लेखक कुंदन यांनी सोमवार, 07/05/2012 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
राम्राम मंडळी... स्पा सारख्या आमच्या पाड्यावरच्या नवशिक्या होतकरु मित्रांसाठी ही पेशल पा कृ: वालाच्या शेंगांची रस्सा भाजी अन घडीच्या चपात्या. साहित्य : १) वालाच्या शेंगा ( नीट निवडुन , नाकी काढुन , कापुन) ( इकडे मिळतात तशा , पणं आमच्या मातोश्रीनी नीट साफ करुन वाळवुन डबा भरुन दिलाय. त्या शेंगा मी कुकर मध्ये वाफवुन घेतल्या) २) २ हिरव्या मिरच्या ३) १ मोठी लसुण पाकळी ४) मुठभर शेंगदाणे ५) १ जुडी कोथिंबीर ( निवडुन ) , कोण रे तो कोथिंबीरीच्या काड्या बोलला तो. नको असलेल्या काड्या आमच्या बिका ला द्याव्यात. ६) १ चमचा तेल , फोडणी साठी ७) हिंग-जिरे-मोहोरी-हळद इ.

सत्यमेव जयते

लेखक सोत्रि यांनी रविवार, 06/05/2012 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
भल्या भल्यांना टीव्हीच्या छोट्या पडद्याने मोहात पाडले आहे. अमिताभ, सलमान, शाहरूख ह्यांच्या मांदियाळीत आता मि. परेफेक्ट, आमिर खान, हाही सामिल होतो आहे. तो सत्यमेव जयते ह्या एका कार्यक्रमाद्वारे छोट्या पदद्यावर येतो आहे. आजपासून दर रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम १६ भागांत दाखवला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट 'थीम्ड टॉक शो' असा आहे. स्त्री भ्रूण हत्या, बाल कामगार असे वेगवेगळे सामाजिक विषय/मुद्दे घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया ह्यावर चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.

कात्रज ते सिंहगड - (K2S) - नाईट ट्रेक - कोणी इच्छूक आहे का..?

लेखक मोदक यांनी रविवार, 06/05/2012 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रेकिंग ग्रूप मधल्या एका मित्राची NIM (Nehru Institute of Mountaineering) च्या बेसिक कोर्स साठी निवड झाल्याने त्याचा स्टॅमीना वाढवण्यासाठी आणि आम्ही सोबत म्हणून येते काही महिने दर शनिवारी (किंवा जसे जमेल तसे पण शनिवार नक्की) कात्रज ते सिंहगड ट्रेक करायचे ठरवत आहे. हा एक थकवणारा पण विलक्षण आनंद देणारा ट्रेक आहे. कात्रज जुन्या बोगद्यापासून निघाल्यानंतर एका दृष्टीक्षेपात दिसणारे झगझगीत पुणे... संपूर्ण वाटेदरम्यान खुणावणारा आणि हुलकावणी देणारा सिंहगडावरील टॉवरचा लाल दिवा... वाट दाखवणारा शीतल चंद्रप्रकाश... पौर्णीमेच्या रात्री मध्यानवेळेसारखी पडणारी आपली सावली... काळेभोर, निरभ्र आणि लुकलुकणार्‍

का...का...का....काकस्पर्श!

लेखक सन्जोप राव यांनी रविवार, 06/05/2012 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
'एक विलक्षण प्रेमकहाणी' म्हणून बराच गाजावाजा झालेला, जाहिरातींतून उत्सुकता चाळवणारा 'महेश वामन मांजरेकर' दिग्दर्शित 'काकस्पर्श' काल पाहिला. ( हे 'महेश वामन मांजरेकर' म्हणजे 'वास्तव'वादी महेश मांजरेकरच का? बहुदा असावेत.) अडीच-तीन तास कुठेतरी काढायचे होते, बाहेर मनस्वी उकडत होते. चित्रपटगृह चांगले, वातानुकूलित होते. या सबबी वाचकांसाठी नसून मी माझ्या 'मना सज्जना' ला सांगितलेल्या आहेत. मन हे ( 'काकस्पर्श' सारखे ) विलक्षण असते. ते हा चित्रपट बघून झाल्यावर पुन्हापुन्हा म्हणत होते, नुसताच मॉलमध्ये फिरला असतास, 'तेज' बघीतला असतास, 'विकी डोनर' बघीतला असतास... स्वातंत्र्यपूर्व काळातले कोकणातले एक खेडे.

उन्हाच्या झळा, झळया या पासून बचाव कसा करावा?

लेखक कलंत्री यांनी शनिवार, 05/05/2012 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळा जसा वाढू लागतो तसे तसे जीवाची काहिली होत जाते. प्रत्येक क्षण जगणे अवघड होत जाते. उच्चवर्गियांसाठी वातानुकुलित यंत्रणा, थंड हवेची ठिकाणे इत्यादी पर्याय असतात, परंतु सर्वसामान्यासाठी मात्र उन्हाळा एक परिक्षाच घेऊन येत असतो. माझ्या लहानपणी ( ३०/३५ वर्षापूर्वी) पंखा असणे ही सुद्धा चैनीची बाब समजली जात असे किंवा थोड्याश्या भर उन्हातून थोड्याश्या सावलीमध्ये गेल्यास सुध्दा उन्हाच्या झळयापासुन सहजपणे बचाव करता येत असे. आता वाहनाच्या अमर्याद वाढलेल्या संख्येमुळे अथवा वृक्ष / जंगल तोडीमुळी तापमान वाढतच चालले आहे. त्यासाठी काही छोट्याशा सूचना, शिफारशी इत्यादी. १.

सांडगे-मेथी भाजी

लेखक नेहरिन यांनी शनिवार, 05/05/2012 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:- १मध्यम आकाराची मेथीची जुडी (गड्डी),१वाटी ओलखोबरं, मुठभर दाणे,१ वाटी सांडगे , १टीस्पुन लाल तिखट, १टीस्पुन कांदालसुण मसाला, १टीस्पुन हळद,१टीस्पुन हिंग, १टीस्पुन मोहरी, २टेबलस्पुन तेल,चविपुरते मीठ २ मध्यम आकाराचे कांदे. कृती :- मेथीची गड्डी निवडुन धुवुन घेतली . पाणि निथळल्यावर बारीक चिरुन घेतली.कांदे बारिक चिरुन घेतले. दाणे भाजुन कुटुन घेतले. एका कढईत २ टेबलस्पुन तेल घालुन सांडगे थोडेसे परतुन घेतले.

माझे सत्याचे प्रयोग - बॅचलर खिचडी

लेखक स्पा यांनी शनिवार, 05/05/2012 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
ढिस्क्लेमर १. सदर पाककृती हि एका बॅचलर ने केलेली आहे २. आपण बॅचलर असल्याची हि जाहिरात नसून , नवीन बॅचलरांसाठी मार्गदर्शन दीपिका समजावी ३. गणपा, सानिका स्वप्नील, मृणालिनी .. यांच्या पाकृन्सारखी हि टकाटक.. खतरनाक.. कातील.. जीवघेणी वेग्रे नाही.. अपेक्षाभंग होईल.. वेळीच धाग्याबाहेर पडू शकता ४.भांडी, चमचे आणि किचन उच्च नाही...

मानवी जीवनात धर्माचे स्थान काय?

लेखक पुण्याचे वटवाघूळ यांनी शुक्रवार, 04/05/2012 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देतील अशी अपेक्षा आहे. शंकराचार्यावरचा धागा आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचल्या. त्या धाग्यात म्हटले आहे की आपल्या सर्वोच्च धर्मगुरूंविषयी किंवा धर्माविषयी हिंदूंइतके औदासिन्य दाखविणारा दुसरा समाज नसेल!!