स्ट्रॉबेरी फ्रीज कशी करावी? साठवून ठेवावी?
(How to freeze Strawberry?)
थोडे दिवसांपूर्वी स्ट्रॉबेरी पिकिंगला जायचा योग आला. खूप मजा आली. आणि खूप सार्या फ्रेश, सुंदर, लालचुटूक स्ट्रॉबेरी घरी आल्या. आल्या आल्या स्ट्रॉबेरीने भरलेली छोटी टोपली फ्रीजमध्ये ठेवली. मग दुसरे दिवशीपासून विचार सुरू झाला की इतक्या सार्या स्ट्रॉबेरीजचे करायचे काय? केकमध्ये घालाव्यात की जॅम करावा की शेक करावा की आणखी काय करावे.
मग नेटवर जरा शोधाशोध केल्यावर स्ट्रॉबेरी साठवून ठेवायचे मार्ग सापडले. त्यातला सगळ्यात सोपा मार्ग भावला :-D त्यानुसार स्ट्रॉबेरी फ्रीज करायचे ठरवले.मग थोडे R&D करून स्ट्रॉबेरी फ्रीज केल्या. काम फत्ते.
मिसळपाव