सतावणारा प्रश्न तुझा " मी जाऊ "
सतावणारा प्रश्न तुझा
" मी जाऊ "
तुझ्याकडे पाहून तुला हवय काय
माझ्या शिवाय कुणाला कळेल काय
डोळ्यातले भाव ह्रदयातील ताना
माझ्या शिवाय कधी कळतील काय
ओझरता स्पर्श अनं भरलेले ऊर
माझ्या शिवाय कधी मिळतील काय
जाशील तू दूर पण सवयीचा श्वास
माझ्या शिवाय कुठे मिळेल काय
असशील सुखात पण प्रेमाची शाल
माझ्या शिवाय कुणी पांघरेल काय
येताजाता तुझ्या प्रेमाचा कटाक्ष
माझ्या शिवाय कुणी झेलेल काय
ते आसुसलेले ओठ ती प्रेमाची भूक
माझ्या शिवाय कुणी क्षमवेल काय
रुपगव्रीते तुझ्या तारुण्याची तारिफ
माझ्या शिवाय कुणी करेल काय
रंगल्या रात्री तुझ्या प्रेमाचा मिलाप
माझ्या शिवाय कुणी करेल काय
तुझ्या ह्रदयाला हाक प्रेमाची
काव्यरस
मिसळपाव
