Skip to main content

दुष्काळ

लेखक शैलेन्द्र यांनी बुधवार, 06/06/2012 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोरड्या विहरीतुन आटलेला दुष्काळ, रस्त्यातल्या पाईपातुन फुटलेला दुष्काळ, गळत्या टँकरमधुन गावकीला तुडवत, सोन्याच्या मोलाने लुटलेला दुष्काळ. पंचायतीत मंजुरीला आलेला दुष्काळ, मंत्रालयातुन पास केलेला दुष्काळ, टक्क्याच्या हिशोबाने चोख वाजवुन, आपापल्या घरी नेलेला दुष्काळ. टग्यांनी बघ्यांचा चोरलेला दुष्काळ, रिकाम्या पोटातुन कोरलेला दुष्काळ, हिरव्या वावरांतुन, पाटाच्या कडेने, भरपाईच्या पाण्याने पेरलेला दुष्काळ. खादीतुन बोलणारा प्रागतीक दुष्काळ, एन्जीओतुन खर्चलेला जागतीक दुष्काळ, भेगाळल्या जमीनीत जळुन मेलेला, लाचार निर्वासीत अगतीक दुष्काळ
काव्यरस

...पाऊसगाणे...

लेखक विदेश यांनी बुधवार, 06/06/2012 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
धरतीची आस होउनी उदास अंतरी भकास प्रार्थिते देवास हजार डोळे आभाळास पहाती निष्प्राण होउनी केविलवाणे होती आस ती मनास गावे पाऊसगाणे मनांत रोजचेच पाण्याचे रडगाणे मना लागलीसे धरतीची ओढ कोसळे आभाळ पाऊस होऊन

चित्रपटात सर्वप्रथम!

लेखक आर्या१२३ यांनी बुधवार, 06/06/2012 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटांच्या इतिहासाबद्दल काही लिहावं अशी फार इच्छा होती. कारण ही माहिती मराठीत पुस्तकांव्यतिरिक्त आंतरजालावर कुठेही सापडली नाही. खुप दिवसांपासुन कुठल्यातरी मासिकातुन उतरवलेले संकलन मी आंतरजालावरुन साजेशी चित्र काढुन पुन्हा संकलीत केले. आणि हे आपल्यापुढे सादर करत आहे. काही चुका असल्यास दुरुस्ती करावी.
सर्व चित्रे आंतरजालावरुन साभार!

मेसोअमेरीका(४.२) - माया (The Mathematicians)

लेखक किलमाऊस्की यांनी बुधवार, 06/06/2012 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
"Nature to him (Newton) was an open book, whose letters he could read without effort." - Albert Einstein
आल्बर्ट आईन्स्टाईनचं हे वाक्य मायन्सना तंतोतंत जुळणारं. आपल्या आसपास असणारा निसर्ग आपला गुरू. तो आपल्याला दोन्ही हातांनी भरभरुन देतो. पण त्याच बरोबर त्याची विविध रुपं, नाना छटा, एक ना अनेक तर्‍हा. निसर्गातील सूक्ष्मातीसूक्ष्म फरक अचूक मोजून मापून नोंदवण्याची मायन्सची धडपड. एक झपाटलेपणच म्हणा ना! मग त्यातूनच जन्म झाला त्रिकालाबाधित कालमापन पद्धतीचा, अदभूत खगोलशास्त्राचा आणि अमेरिका खंडातल्या पहिल्यावहिल्या प्रगत अंकपद्धतीचा.

राजमाची

लेखक दशानन यांनी बुधवार, 06/06/2012 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
DSC02377.jpg DSC02318.jpg DSC02328.jpg (हा देव कुठला?

फूड प्रोसेसर कोणता घ्यावा?

लेखक एमी यांनी बुधवार, 06/06/2012 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
कणिक मळणे आणि मिक्सर हे फंक्शन्स नीट चालावे. बाकी ज्युसर चॉपर चा फारसा वापर होणार नाही. मोटर चांगली हवी. माउथशट, नापतोल वर बरेच रिव्ह्यू वाचले. ओळखीतल्यांना विचारले. त्यांनी सांगतले केनस्टार, फिलीप्स. डी मार्ट, बीग बाझार मधे फक्त बजाज, उषा, महाराजा चे एक एक मॉडेल आहे. केनस्टार, उषा चा रिव्ह्यू चांगला नाही. फिलीप्स7625 कसा आहे? जार २ च आहेत त्यात पण मला कणिक मळणे आणि मिक्सर च हवाय. मिपाकर मदत करु शकतील का?

पागोळी

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 06/06/2012 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
घन; वेस ओलांडून आला सोनियाचा सण धुळवड आकाशात ऊर घगर भरून झरे रेशमाचं पोत सारे दारूण झाकून रोमरोम शहारून गाई अंकुरात धून थेंब थेंब फुटे वाळा वारा शकून पिऊन झिंग ओलेत्या मेघाची सय सय उधाणून सरे चातकाचे ऋण मोर माना उंचावून भिजलेल्या अंगणात मन पागोळी होऊन .........................अज्ञात
काव्यरस

रत्नांच्या बघ राशी झाल्या..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 05/06/2012 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नांच्या बघ राशी झाल्या, माझ्या काचखड्यांच्या काटे भरल्या वाट होती , मखमल पायघड्यांच्या ओले हिरवे झाले माझे, मौसम निष्पर्णाचे निळे जांभळे फ़ूल श्रावणी, देही गोकर्णाचे तुझ्यासोबती वाटा सार्‍या, यमनामधले गाणे घमघमणार्‍या सुरावटींशी, नाते लोभसवाणे रोमरोमी भिजते मीही, हळवा श्रावण दे ओघळते मी प्राजक्तासम, भिजलं अंगण दे उधाणू दे ना सागरलाटा, तुझ्या किनार्‍यावरी तुझी पौर्णिमा होऊन आले, तुझ्याच मी अंबरी -प्राजु
काव्यरस

जगज्जेता विशी!

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 05/06/2012 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या १२ वर्षात तो पाच वेळा जागतिक अजिंक्यपदाचा मुकुट डोक्यावरती चढवून आहे (ही 'तपःश्चर्याच' म्हणायला हवी! :)) , जगातले अनेक प्रतिस्पर्धी बुद्धीबळपटू त्याच्या खेळाला वचकून असतात, गॅरी कास्पारोवसारखा त्याचा एकेकाळचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि नंतरचा सहकारी देखील त्याच्याबद्दल अनुदार उद्गार काढतो तेव्हा तो एका अढळपदाला पोचलाय याची खात्रीच होते! ३१ मे २०१२ ला मॉस्कोतल्या त्रेत्याकोव आर्ट गॅलरीमध्ये 'जन गण मन' वाजलं, आनंदने विजेतेपदाचा चषक उंचावला आणि माझे डोळे भरुन आले!