Skip to main content

बडबड गीते/ बालगीते

लेखक अव्यक्त यांनी रविवार, 24/06/2012 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
..बालगीते/बडबडगीते मनाला कित्ती आनंद देवून जातात ह्याचा प्रत्यय मी नुकताच अनुभवलाय... त्याच अस्सं झाला माझा ८ महिन्याचा मुलगा चि.

साबू-हॉलीवूड गाजवणारा भारतीय अभिनेता

लेखक प्राध्यापक यांनी रविवार, 24/06/2012 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज भारतीयांनी चित्रपट क्षेत्रात जबरदस्त अशी प्रगती केलेली आहे,तरीही भारतीय अभिनेत्यांना हॉलीवूड चे आकर्षण मोठ्या प्रमाणात आहे,अनेक जण हॉलीवूडमधे काम मिळवताना धडपडताना दिसतात,या पार्श्वभुमी वर काळाच्या ओघात मागे पडलेल्या पण हॉलीवूड गाजवलेल्या एका भारतीय अभिनेत्या बद्दल वाचण्यात आले ती माहीती मिपा करांसमोर मांडण्या चा हा छोटासा प्रयत्न. २७ जानेवारी १९२४ ला मैसूर ला साबू चा जन्म झाला. मुळ नाव शेलर शेख साबू.

आता तर आभाळ सुद्धा भरून येत नाही,डोळे मात्र भरुन येतात....

लेखक प्यासा यांनी रविवार, 24/06/2012 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
दोन आठवडे झाले रोज शिवारे बघुन येतो,घास खाऊ वाटत नाही....मन लागत नाही, पोट खपाटीला गेलेल्या लेकरासारखे कोरडे झालय सगळ रान.सैरभैर वाटतय...ज्वारीचे बियाणे बहुदा वाया जाणार,सर्व झाडॆ बोडखी झाली आहेत.उन्ह काही सरत नाही....आता तर आभाळ सुद्धा भरून येत नाही,डोळे मात्र भरुन येतात....व्यवसाय जेमेतेम चालतो,घरी खाणारी तोंडे अन खिसा यांचा ताळमेळ कसा बसणार? मागच्या २- ३ दिवसापासून खूप निराश वाटते आहे ,काही सुचत नाही कुठे मन लागत नाही.

पिपल्स आर्ट : एक चित्रप्रदर्शन वृत्तांत.

लेखक मनोज श्रीनिवास जोशी यांनी रविवार, 24/06/2012 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
बसमधून जाताना पीपल आर्ट , डब्लीन चे चित्रप्रदर्शन हया छोटया जाहीतीने माझे लक्ष वेधले आणि ऑफिस चे बाजूला सारून शोधाशोध सुरु केली. गुगल बाबा कधीही निराश करत नाही. त्याने क्षणार्धात वेबसाईट शोधून काढली (http://www.peoplesart.ie/) आणि मग शनिवारीच हे चित्र प्रदर्शन आहे हे समजले , आणि मग जायचा बेत पक्का केला.( खरे तर ते फुकट आहे हे समजले तेंव्हा बेत पक्का झाला). इतर अनेक विषयांप्रमाणे चीत्रकले मधलेही मला काही कळत नाही , पण जावेसे वाटते.

गँग्स ऑफ वासेपूर - गेट वेल सून, अनुराग!

लेखक श्रीरंग यांनी शनिवार, 23/06/2012 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
स्किझोफ्रेनिया नावाचा एक आजार असतो. यात म्हणे रुग्ण मधूनच स्वत:च्या मूळ स्वभावाशी एवढा विसंगत वागतो, की "हाच का तो?" असा समोरच्याला प्रश्न पडावा. शिवा, सरकार, सत्या, कंपनी, बनवणारा रामगोपाल वर्मा पुढे RGVकी आग, जेम्स, डिपार्टमेंट बनवेल असं स्वप्नात तरी वाटलं होतं का? हिंदी चित्रसृष्टीत रामू हा या आजाराचं सर्वात ठळक व एकमेव उदाहरण आहे.... असा मझा कालपर्यंतचा भ्रम होता.

इंडीयन रोस्टी

लेखक Keanu यांनी शनिवार, 23/06/2012 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
हा थोडा German Rösti च्या जवळपास जाणारा पदार्थ. त्याचं नक्की नाव माहित नाही , आम्ही याला घरी पिझ्झा म्हणतो. लहान मुलांसाठी थोडा वेगळा प्रकार आणि सिमला मिरची न खाणार्‍यांनीही नक्की करुन पहा.