Skip to main content

गुरूबिन कौन बतावे बाट (दत्त संप्रदाय)

लेखक शरद यांनी रविवार, 01/07/2012 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
गुरूबिन कौन बताये बाट (दत्त संप्रदाय) दत्त संप्रदाय फक्त महाराष्ट्रातच आढळून येतो. थोडासा अपवाद म्हणजे गाणगापूरच्या आसपासचा कानडी मुलुख. पण महाराष्ट्रात तो एक प्रमुख पंथ आहे व नवीन पायंडा पहाता तो वाढीस लागला तरी आश्चर्य वाटावयाचे कारण नाही. " मी तुझ्या पाठीशी आहे " हा दिलासा बर्‍याच तरुणांना पुरेसा वाटतो असे दिसते. मुंबईतील स्वामी समर्थ यांच्या मंदिरात चांगली गर्दी असते. हे लोण इतर शहरात पसरणे सहजशक्य आहे. शिर्डीनंतर साईबाबांची मंदिरे इतर शहरात पसरू लागली आहेत, तसेच. आजच्या तरुण पिढीला याचे आकर्षण का वाटत आहे याचे विवेचन शेवटी करणार आहे. या संप्रदायाची माहिती आज करून घेऊं.

नर्गीसी कबाब

लेखक गणपा यांनी रविवार, 01/07/2012 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
काय मंडळी कशी झाली आषाढी एकादशी? साबुदाण्याची खिचडी/वडे, भगर , उपवासाची भाजी, हाणलीत की नाही? या तर मग कालच्या उपवासावर उतारा घेऊया. आजचा पदार्थ थोडा वेळ काढु आहे. पण जीभेचे चोचले पुरवायचे तर पेशंस हवेतच नाही का?

"प्रयास" वरून आठवलं....

लेखक मन यांनी शनिवार, 30/06/2012 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच प्रयास (http://www.misalpav.com/node/22102) वाचला. ओपरा विन्फ्रे बद्दलचा एक धागा आठवला .(http://www.misalpav.com/node/15853) विलक्षण आयुष्य, विलक्षण घटना. अधिक काय बोलणार. तसच लान्स आर्मस्ट्राँगही आठवला. उत्तम सायकलपटू, ऐन उमेदीच्या काळात(१९७१चा जन्म, १९९६ला कॅन्सरचे निदान झालेले) अवघड ठिकाणी कॅन्सर झालेला. त्याच्या उपचारानेही बराच अशक्तपणा येणार असे डॉक्टरांचे मत.

गंध फुलांचा

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी शनिवार, 30/06/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
"गंध फुलांचा" ऐकल्यावर मनात नेमकं काय दाटायचं कुणास ठाऊक मला तेव्हा नेमकं काय वाटायचं आतून येणारी हाक त्या हाकेतली आर्त स्पंदनं याचा ठावच घेतला नव्हता मनातल्या वादळाचा तेव्हा अर्थच उमगला नव्हता येणारी हाक कुणाची होती की होते ते फक्त मनाचे खेळ? ती होती का "आशा"च्या आवाजाने निर्मिलेली एक अगम्य, वेडी आशा.....? की अव्यक्त भावनांची हळुवार अमूर्त भाषा? मग जळमटं बाजूला सारून जुन्या कपाटातून काढलीच बाहेर माझ्या आयुष्याची वही तिची पानं थोडी कोरी थोडी भरलेली तुझ्यासमोर ठेवली तेव्हा सारं काही उमगलं बांध फोडून मनात दाटलेलं त्या वहीवर अलगद उमटलं भरलेल्या पानांना तुझ्या अक्षराची सोबत झाली कोरी पानं वाट

काया ही पंढरी, आत्मा हा विट्ठल..

लेखक अमोघ शिंगोर्णीकर यांनी शनिवार, 30/06/2012 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्र टाईम्स मधे डॉ. रामचंद्र देखणे यांचं "पालखी" हे सदर प्रकाशीत होतंय. रोज घरून ऑफिसला कितीही लवकर निघालो किंवा घरी येण्यास कितीही उशीर झाला तरी मी ते वाचतोच वाचतो. ते वाचलं की दिवसाचा सगळा थकवा कुठल्याकुठे पळून जातो. आजचं ते सदर वाचूनंच ही पोस्ट सुचली. पालखीला वेळेत पोहोचलोच नसतो जर किश्या ने मदत केली नसती तर. त्याचे खास आभार. आदल्या दिवशी म्हणजे गुरूवारी ऑफिसमधून संध्याकाळी ६.०० ला निघालो तेव्हा मनातली धाकधूक वाढली होती. कारण घर गाठून मग पुणं गाठायचं होतं. घरी पोहोचेस्तोवर १०.०० झाले होते. तसंच थोडं जेवण पोटात ढकलून, वंदनाहून ११.३० ची एस्.टी (स्वारगेट) पकडली.

उपवासाचे बटाटे वडे --

लेखक निवेदिता-ताई यांनी शनिवार, 30/06/2012 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
एकादशी दुप्पट खाशी --- साहित्य :- उकडलेले बटाटे ३ ते ४, चार - पाच हिरव्या मिरच्या , थोडे लाल तिखट, एक छोटा आल्याचा तुकडा, वरई पिठ एक वाटी, शाबूदाणा पिठ पाव वाटी, बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ, तळणीसाठी रीफ़ाईंड तेल किंवा तूप. कृती:- प्रथम उकडलेले बटाटे हाताने मॅश करून घ्यावेत. हिरवी मिरची, आलं मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. तेलावर हे वाटलेलं आलं, मिरची थोडसं परतून घ्यावं. मॅश केलेला बटाटा घालावा व लगेचच आच बंद करावी. नंतर हे सर्व एकत्र करुन या मिश्रणाचा छान गोळा करून घ्यावा मग वरई पिठ व शाबूदाणा पिठ व लाल तिखट, सोडा,व मीठ हे सर्व एकत्र करावं.