Skip to main content

कविता व भावगीत

लेखक शरद यांनी रविवार, 15/07/2012 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
मागील एका लेखात विषय आला होता " कविता व भावगीत यात फरक करता येतो का ? आणि तसा फरक असेलच तर तो कशामुळे उद्भवतो ? आता हे शक्य आहे की चांगला कवी सुरेख भावगीत लिहू शकेल आणि श्रेष्ठ भावगीतकार सुरेख कविताही लिहून जाईल. दोन उदाहरणे म्हणजे मंगेश पाडगावकर आणि शांताबाई शेळके. उलटे उदाहरण म्हणजे आरती प्रभूंचे. त्यांच्या अनेक सुन्दर कविता रसिकांच्या मनात घर करून असतात पण भावगीत ? लक्षात आले का मला काय म्हणावयाचे आहे ? पण हा फरक अधोरेखित करावयास आज एक छान उदाहरण देतो. काळ साधारणत : साठ एक वर्षांपूर्वीचा.

गुवाहाटीच का बरे --

लेखक शकु गोवेकर यांनी रविवार, 15/07/2012 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
गुवाहाटी व बागपत पाठोपाठ गुजरात व छ्त्तीसगड येथे कालच घडलेल्या या घटना -- विडीओ नेट वर १) गुजरात मधील धाओड भागात एका नराधमाने महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार करुन त्याचा विडिओ नेट वर अपलोड केला व सीडी काढुन त्या वितरित केल्या २) छत्तीसगड मधिल विलासपुर ते रतनपुर मार्गावरिल खुन्टाघाट येथे फिरावयास गेलेल्या जोड्प्याना बंदुकिच्या धाकाने कपडे काढावयास लावुन नग्न होण्यास भाग पाड्ले व तश्या अवस्तेत एस एम एस काढ्ला गेला व हा एस एम्स वितरीत केला ३) बंगलुरु येथे सात वर्षाच्या मुलीचे मंजुनाथ नावाच्या युवकाने शील अपहरण केले या व अशा बातम्या वाचुन मन विषन्न होते रामदास फुटाणे यांनी एका कवि

गुवाहाटी आणि बागपत

लेखक पुण्याचे वटवाघूळ यांनी शनिवार, 14/07/2012 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसात आपल्याच देशात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे कोणाही सुसंस्कृत भारतीयाची मान शरमेने खाली जाईल आणि संतापाचे अंगार दाटून येतील.आणि दुर्दैवाने आपण त्याविषयी काहीही करू शकत नाही म्हणून हळहळ व्यक्त करण्याशिवाय फारसे काही करू शकणार नाही. घटना १: स्थळ: गुवाहाटी.

ललिताचं लळित

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 14/07/2012 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
"तू ललित का लिहीत नाहीस?' बारावीत आमच्या एका (साहित्यिक) वर्गमित्रानं मला हा प्रश्‍न केला होता. ललित अशा नावाचा लेखनाचा काही प्रकार असतो, हे तेव्हा मला प्रथम कळलं होतं. तो स्वतः चांगलं ललित लिहितो, असा त्याचा दावा होता. अर्थात, कॉलेजच्या "सहकार' मासिकातही त्याचं लेखन छापून आणेपर्यंत त्याची मजल होती, त्यावरून तो निश्‍चितच मोठा साहित्यिक असावा. तर सांगण्याचा उद्देश काय, की लिखाण म्हणजे एकतर कथा, कादंबरी, नाटक किंवा कविता, एवढंच मला माहीत होतं. गेला बाजार प्रवासवर्णन.

' खिडकीमधुन गच्ची तुझी......!'

लेखक जेनी... यांनी शनिवार, 14/07/2012 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
कटलेल्या पतंगाकडे त्याच्यासोबत नाराज होऊन बघणारी , त्याच्या मदतीने उंच आकाशातले तारे मोजणारी, त्याला भिजवणारी ,त्याच्यासोबत भिजणारी ,त्याच्या मनातली असंख्य गुपितं जपणारी, दारुच्या बाटल्या लपवून घेऊन त्याच्या कटात स्वतःला सामील करुन घेणारी ,रात्रीच्या अंधारात त्याच्यासोबत दिवसभरातला उन्हं सावल्यांचा खेळही थांबवणारी ......गच्ची . ठाण्याच्या आनंद टॉकिज मागे असणार्‍या तीन ते पाच मजली इमारतीच्या गर्दीत आमच्याही इमारती वसलेल्या . जागेच्या भयाण, न सुटलेल्या प्रश्नाला जागलेल्या.

कै. दारासिंह यांना सादर संगीतमय श्रद्धांजली,

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 13/07/2012 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
कै. दारासिंह यांना सादर संगीतमय श्रद्धांजली, फार पुर्वी दारासिंहानी आम्हाला आनंद दिला त्यांच्या फ्लाईंग किक्स व फ्री स्टाईल डावपेचांमुळे. आम्ही फिदा होतो 'लुटेरा' (१९६५) पाहून. त्यात लप्याचे संगीत, सिनेमा फार लक्षात राहिला. त्यातील गाण्यामुळे.... १ पतली कमर नाजुक उमर....... स्त्री वेषातील दारासिंहची नृत्यकला !

मदत: कोडे आणि बुध्यांक चिकित्सा

लेखक चिखलू यांनी शुक्रवार, 13/07/2012 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
एका IQ टेस्ट बद्दल मला मदत हवी आहे. कंपनीत आजच ही टेस्ट दिली आणि काही कोड्यांची उत्तरे पटकन जमली नाही. डोक्यातून किडा जात नाही, उत्तर आणि लॉजिक समजत नाही तोपर्यंत. ही टेस्ट बुध्यांक काढण्यासाठी वापरली जाते आणि Percentile पद्धतीनुसार निष्कर्ष काढले जातात. पूर्ण नाव रॅवेन् प्रोग्रेसिव्ह मॅट्राईसेस टेस्ट. गुगल वर अधिक माहिती मिळेल. इथे मुद्दाम देत नाही. यात २X२ किंवा ३X३ मॅट्रिक्स असतो, ४ किंवा ९ पैकी एक न दिलेली आक्रुती शोधायची. लॉजिकसाठी आडवे, उभे प्रोग्रेशन जुळले पाहिजे. काही ठिकाणी कर्णानुसारही जुळलेत. खाली दिलेल्या चित्रात एकुण ५ कोडी आहेत. मला २,३ व ५ बद्दल लॉजिक समजले आहे.

घरचा आहेर

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी शुक्रवार, 13/07/2012 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
घरचा आहेर पैठणला असतांना तिथल्या खुल्या कारागृहाला आठवड्यातून एकदा भेट द्यावी लागे. भेटी दरम्यान आजारी कैद्यांना तपासून उपचार करणे, आधीच्या भेटीतल्या आजारी कैद्यांची विचारपूस करणे, तुरूंगाच्या किचनला भेट देवून पहाणी करणे, तिथल्या वैद्यकिय अधिका-याशी चर्चा असा सर्वसाधारण कार्यक्रम असे. आवश्यकता वाटल्यास कैदी आमच्या हेल्थ युनिट मधे तपासणीला पाठवले जायचे. तिथं त्यांची तपासणी करून उपचार केले जात. क्वचित प्रसंगी त्यांना दाखल करून उपचार केले जात.

निर्माल्य

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी शुक्रवार, 13/07/2012 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या डायरीत केविलवाणं झालेलं एक गुलाबाचं फूल सापडलं.. तुझ्या वाढदिवसाला घेतलेलं आता बरचसं हिरमुसलेलं डायरीच्या त्याच दोन पानांवर दिसले आठवणींच्या शिंतोड्यांसारखे उमटलेले गुलाबी ठिपके खिडकीबाहेर दिवसा मोहवणार्‍या नेहमीच्याच गुलमोहराने रात्री सावल्यांचे भेसूर आकार नाचवावेत तसे... आपल्या आठवणींच्या जणू तशाच सावल्या झाल्या आहेत आणि नातंही त्या गुलाबासारखं.... वाहिलेल्या दुर्वांचं शेवटी निस्तेज निर्माल्यचं होतं ना गं, कालच्या पूजेची अस्पष्ट आठवण करुन देणारं! - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
काव्यरस