दुर्योधन आणी दु:शासन
१०० कौरवान्पैकी सगळ्यात फेमस कौरव म्हणजे दुर्योधन आणी दु:शासन. बाकी ९८ म्हणजे उपेक्शितच. मला नेहमी प्रश्न पडतो की ध्रुतराश्ट्र आणी गान्धरी जोडप्याने आपल्या पोटच्या मुलान्ची नावे दुर्योधन आणी दु:शासन कशी काय ठेवली? कोणते आई-बाप आपल्या मुलान्ची नावे 'दु' या अक्शराने सुरु होणरी ठेवतील? ह्या दोघान्च्या नावामागे मला वाटते की खालील पैकी १ कारण असावे
१) ध्रुतराश्ट्र आणी गान्धरी यन्ना आपल्या या सुपुत्रान्चे पाय पाळन्यात दिसले असतील म्हणुन ही नावे ठेवली.
२) ह्या दोघान्ची मुळ नावे सुर्योधन आणी सु:शासन ही असावीत पण त्यानी पुढे लावलेल्या दिव्यान्मुळे ती बदलुन दुर्योधन आणी दु:शासन झाली असावीत.
मिसळपाव

