Skip to main content

निशाण

लेखक मनीषा यांनी बुधवार, 25/07/2012 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
२५ जुलै - कारगिलच्या विजयी वीरांना आदरपूर्वक ... हिमगिरीच्या धवल शिखरावर फडफडणारे तिरंगी निशाण ... त्याच्या वाटेवर शिंपले आहेत रक्ताचे सडे .. उधळले गेले आहे सुवासिनींचे कुंकु ... त्याचा लालस केशरी रंग जाणवतो अजून नजरेला मरणाची भिती , शिकवलीच नाही कुणी बर्फाच्छादित वाटांवरुन चालताना आठवले नाहीत कधीच आपले संसार मातृभूमिच्या काळजात खुपसलेल्या खंजिराची कळ उठते आहे मस्तकात तळपत्या तेगीचा निर्धार रुतला आहे मनामनात कुठुन, कधी आणि किती येतील ते आणि पडेल काळाचे जाळे सांगता येत नाही काहीच समोरुन येतील , कि पाठीवर करतील वार हे ही ठाऊक नाही अंतरी आहे फक्त एकच जाणीव जपायचे आहे ह

वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 25/07/2012 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सकाळी झोपेतून उठतो तेव्हा आजचा दिवस कसा जाणार आहे किंवा आत्ता इथे आहोत, दिवस संपताना कुठे असणार आहोत वगैरे काहीच आपल्याला माहित नसतं. याचं अगदी शब्दशः प्रत्यंतर मला आलं, परवा, २२ जुलैला. दिवस सुरू झाला पुण्यात आणि अगदी अनपेक्षितपणे संपला मेंढ गावात, जितूच्या घरी. *** गेल्या काही दिवसांपासून, किंवा महिन्यांपासून म्हणा हवं तर, वांग मराठवाडी हे नाव सतत कानावर येत होतं. मधून मधून मेल्स येत असत. त्या सगळ्यावरून झालेलं आकलन एवढंच होतं की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वांग नदीवर मराठवाडी इथे एक धरण बांधलं जात आहे. शासकिय भाषेत बोलायचं तर 'वांग मध्यम प्रकल्प'.

पुणेरी मल्टीस्पाईस कट्टा..

लेखक अक्षया यांनी बुधवार, 25/07/2012 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईचा कट्ट्याचा वृतांत आणि फोटो पाहून.. पुणेकरांना कसे गप्प बसवेल? रविवारी सकाळी ११.३० वाजता Multispice कर्वे रोड येथे फॅमिली कट्टा आयोजित केला आहे. ११.३० यासाठी की नुसते जेवलो आणि निघालो असे व्हायला नको..आणि हो याचा उल्लेख जरी फॅमिली कट्टा असा असला तरी सगळे सुखी लोकही ( लग्न न झालेले.. ) सहभागी होऊ शकतात याची नोंद घ्यावी..:) भेटूया मग रविवारी... जे येणार आहेत त्यांनी या बद्दल मला, ५० फक्त आणि मोदक यांना व्यनी करावा किंवा खरड करावी. पत्ता: Multi Spice Restaurant 020 25458086, +91 8898738535 46/2, Near Mhatre Bridge, Opposite, Siddhi Gardens, Karve Nagar, Pune

प्रवाह....

लेखक वेणू यांनी बुधवार, 25/07/2012 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी आयुष्य, साचून राहिल्यासरखं वाटतं! सगळे मु़ख्य प्रश्न एकाच पदावर जाऊन बसलेले, अनुत्तराच्या! वेळेने तरी किती कळ सोसावी? शेवटी, आपल्याच इच्छाशक्तीची कुदळ, आपलेच दोन घाव आणि साचलेल्या आयुष्याला नवी वाट, नवा प्रवाह!! मोकळ्या झालेल्या त्याच खळग्यात, सार्‍या किचकट प्रश्नांना टाकून, मुठमाती दिलेली, कायमसाठी! आता, नव्या प्रवाहाचा उन्माद, त्याचा खळाळ, सुगंधी.... वेडावणारा! -वेणू

लाईफ हिस्टोग्राम

लेखक यशोधन वर्तक यांनी बुधवार, 25/07/2012 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
लाईफ हिस्टोग्राम " how much land does a man need “ . प्रसिद्ध रशियन विचारवंत लिओ टोलस्टोय याची एक कथा आहे . कथा सूत्र काहीसे असे आहे की एका माणसाला हे बक्षीस मिळते की तो पहाटेपासून संध्याकाळ पर्यंत जेव्हडे अंतर पायी काटू शकेल तेव्हढी जमीन त्याला मिळेल . तो माणूस भल्या पहाटे चालायला सुरुवात करतो , काही वेळानंतर त्याला आपला वेग कमी वाटू लागतो म्हणून तो पळू लागतो खूप धाप लागते तरी हावऱ्या सारखा पळतच राहतो . खूप पळाल्यावर त्याला प्रचंड धाप लागून खोकल येतो रक्ताची उलटी होवून तो मरण पावतो .

रिंद जन्नत मे जा चुके

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 25/07/2012 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
एक शेर आठवला. कधी ऐकला ते ठाउक नाही. बहुधा नववीच्या धड्यात होता कोणाचा आहे ठौक नाही "रिंद जन्नत मे जा चुके वाअजे मोहतरम रह गये" अर्थः चांगले लोक स्वर्गात गेले आहेत इथे जे काही राहिले आहेत ते सर्वसामान्य लोक आहेत. चांगले लोक लवकर जातात, काहीच न करता केवळ प्रेक्षक असणारे सर्वसामान्य मात्र उगाचच बरेच जगतात. ज्या शायराला हा शेर सुचला असेल त्याने विमनस्क मनस्थितीत हे शब्द लिहीले असतील पण बर्‍याचदा असे दिसते की सुस्वभावी, हसतमुख नेहमी दुसर्‍याच्या मदतीला धावणारे,आयुश्यीतील मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगणारे मित्र /आप्त हे अल्पायुशी असतात्.ते अचानक आजाराने/अपघाताने मृत्यू पावतात.

पापभीरू

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी बुधवार, 25/07/2012 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
एका वृत्तवाहिनीवर अत्यंत गंभीर चेहरा करून तावातावाने एक वृत्तनिवेदक राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात सुरु असलेल्या घोटाळ्याबद्दल बोलत होता आणि आयोजनासाठी जबाबदार असलेल्या एका राजकारणी व्यक्ती आणि त्याचे सहकारी-कम्-चमचे यांच्यावर, झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल पुराव्यांसकट आरोपांवर आरोप करत सुटला होता.

दोशी मोहित मर्जर... (भाग १)

लेखक अन्तु बर्वा यांनी मंगळवार, 24/07/2012 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
"परदेसी परदेसी जाना नही...मुझेऽऽऽ छोडके... मुझे छोडके" स्वारगेट बस स्ट्यांड्च्या ३ नंबरच्या प्लाट्फार्म वर 'दोशी वडेवाले' या पुण्याच्या दोन नंबरच्या वडापाव सेन्टरच्या मालकाचा; गायधनी दोशीचा नोकिआ १२०० मोबाइल वाजला. अनोळखी नंबर मोबाईल स्क्रीन वर बघून तो बावचळला. पर्वतीहून तो फोन आला होता. गायधनी दोशी: "ह्यालो...?" पलीकडचा आवाज: "गायधनी, मी मोहित नाइक बोलतोय. एक कर्त्यव्य म्हणुन तुम्हाला कॉल केलाय. उद्या मोहित वडेवाले तुमच्या उपहारग्रूहामधे काम करणार्या सगळ्या पोरांना डबल पगाराची खुल्ली आफर देणार आहे. " क्लिक! (गायधनीने कॉल कट केला.) मोहित नाईक: "आयला! काय उमजेनासं झालयं...