Skip to main content

प्रबळ सौन्दर्य

लेखक सौरभ उप्स यांनी शनिवार, 28/07/2012 02:17 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/२२३४३ वरील धाग्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. प्रबळ ला ट्रबल करत चाललेल्या प्रवासात कही सुन्दर असे फोटोस टिपन्याची संधि मिळाली... खरतर फोटोग्राफी ची आवड जपताना ट्रेकिंग ची आवड कधी लागली कळलच नाही म्हणून ट्रेकिंग चे काही मी काढलेले फोटोस वरच्या धाग्यात स्पा ने टाकले आहेत... मुद्दामून काही ख़ास असे निसर्गाचे फोटोस वेगळ्या धाग्यात टाकत आहे... Camera साधा - sony cybershot DSC-W510 वापरला आहे... १.

एक सुखद फ्युजन

लेखक प्रास यांनी शुक्रवार, 27/07/2012 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टी अपघाताने घडतात. अशा अपघाताचा परिणाम बघता, ते वेळोवेळी का होत नाहीत याबद्दल खट्टू व्हायला होतं. अर्थात असे अपघात पैशापासरी न घडणं यातच त्यांचं महत्त्व अधोरेखित होत असतं, नाही का? असे हे उपरोल्लेखित अपघात आपल्या संगीत सृष्टीत ठराविक काळाने पुन्हा पुन्हा घडत असतात आणि त्यातून ते आपलं जीवन आणखी सुसह्य करून सोडतात असं आपलं मला वाटतं. असाच एक अपघात १९९२ मध्ये कधीतरी घडला आणि आपलं सांगीतिक विश्व समृद्ध करता झाला. जाहिरातींच्या जिंगल्सना संगीत देणारा संगीत दिग्दर्शक त्या वेळेला रेकॉर्डिंग रूममध्ये जिंगलचे शब्द अर्थात जिंगलचा फायनल ड्राफ्ट येण्याची वाट बघत होता.

फिरणे ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 27/07/2012 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
1 सकाळ झाली आहे.जवळ जवळ आठ वाजून गेलेत.मस्त गारवा आहे. ह्या परदेशात येऊन मला दोन दिवस होऊन गेलेत. ६२ Avenue .१९९ स्ट्रीट admonton सूर्य अजून दिसत नाही.आभाळात ढग गोळा झाले आहेत. मी उठलोय.सर्व सकाळचे विधी आटपून खाली बेसमेंटला गेलोय. .ट्रेडमिलवर मस्त धावून घेतलेय. वर येऊन वाफाळलेला चहाचे घुटके घेत घेत बाहेर भटकून येण्याचा विचार मनात झुलू लागलाय . बाहेर हवा थंड आहे.मी निळ्या रंगाचा जीनचा शर्ट घालून बाहेर पडतो आहे. आईसफ्रुट सारखी थंड हवा गालाला झोंबते आहे . एक सुखद शिरशिरी सर्वांगातून फुलते आहे. पांढर्या शुभ पायवाटेवरून मी सरकतो आहे.

रवा इडली

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 27/07/2012 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
एकदम सोपी, अगदी आयत्या वेळी ठरवून करता येण्यासारखी ही रवा इडली: साहित्य- २ वाट्या रवा, १ वाटी दही, मीठ चवीनुसार, १ चमचा तेल, १/२ चहाचा चमचा खायचा सोडा कृती- तेलावर रवा हलका भाजून घ्या, रंग बदलू देऊ नका. दही घुसळून घ्या. रवा कोमट झाला की त्यात दही व मीठ घाला ,पाणी घाला. रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे पाणी घालताना थोडे जास्त राहू द्या.

धर्मांतर्.....पाकिस्तान आणि बरेच काही

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 27/07/2012 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
मटा ने एक बातमी दिली आहे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15192839.cms या बातमीनुसार पाकिस्तानाते एका रीअ‍ॅलिटी शो मध्ये टीव्हीवर एका हिंदु तरुणाचे धर्मांतर लाइव्ह दाखवण्यात आले. पाकिस्तानात अल्पसंख्य सुरक्षीत नाहीत हेच खरे. तेथे हिंदु तरुणीना पळवून जबरदस्तीने त्यांचे धर्मांतर केल्याच्या बातम्या येत असतातच. हेच जर उलट्या अर्थाने म्हणजे अल्पसंख्यांक इसमाचे हिंदु धर्मात धर्मांतर करताना नाटकात्/चित्रपटात जरी दाखवले असते तरी इथले मेणबत्ती मार्च वाले किती भडकले असते.

अरेरे...अगग

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 27/07/2012 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
अरेरे आणि अगग हे दोन उद्गार. दोन्हीचे अर्थ वेगळे होतात अरेरे हा शब्द एखाद्याबद्दल सहानभुती दाखवताना वापरला जातो. अरेरे या शब्दाला जोडून आपोआपच बिच्चारा हे शब्द अध्याहृत असतात. एखाद्याची परीस्थिती काळजी वाटण्याजोगी असेल / फारच कणव येण्याजोगी असेल तर अरेरे बिच्चारा च्च्च्च्च्च वाईट झाले हो. असे शब्द येतात. अरेरे.म्हंटल्यानंतर ऐकणार्‍याच्या मनात आपोआपच एक कणव तयार होते. सहानभुती ची मदतीची भावना येते. हताशपणा /आपण काही करू शकत नाही अशी काहिशी हतबलतेची /करुणतेची भावना येते अगग हा शब्द एखाद्या वस्तुचे वर्णन करायला त्या वस्तुची व्याप्ती अफाट असेल तर वापरतात.

प्रदेश

लेखक पेशवा यांनी शुक्रवार, 27/07/2012 03:38 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे हात नाग गळ्याभोवताली सुर-केवड्याचे रान बहरून आले देहवाटेवरी मिठीचा चकवा हरवणे सापडावे नव्याने जीवघेणे सुखाचा बसे काळजास दंश शरीरावरी शरीर ठिणगी सोसणारे विष-वादळानंतर उरे दगडदेह अन मन पिसापरी तरंगणारे चांदणे रमावे असा हा प्रदेश स्पर्शाच्या समेवर निःश्वास सांडणारे -पुर्वप्रकाशित
काव्यरस

मी,मी,मी,म्या,म्याउ!!!

लेखक कवितानागेश यांनी गुरुवार, 26/07/2012 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी माऊ. मी फार फार हुशार आहे. आणि मुख्य म्हणजे मी प्रचंड लाडावून ठेवलेली आहे. कुणी म्हणून काय विचारता? मी स्वत: मी इतकी स्वयंपूर्ण आहे की माझे लाड मी स्वत:च करत राहते. सतत मी फक्त माझेच लाड करते आणि माझेच गुणगान गाते.आता ज्यांना मुळात गाणंच समजत नाही त्यांना माझे गाणं बेसूरच वाटतं. जाऊ दे. तसे माझ्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी राहतात. पण माझी बातच काही वेगळी. मी काही कुठल्या इतर तुच्छ प्राण्यांकडे लक्ष देत नाही. मी आपली स्वत:च्याच आनंदात मग्न घुर्र घुर्र करत बसते. काही प्राण्यांना कळते काहींना नाही. त्यांना मी पुन्हा तीच घुर्र घुर्र ऐकवते. शेवटी त्यांना मी काय बोलतेय ते कळतेच.