ट्रेक - सुधागड
अरे तुम्हाला साडेसात सांगितलेले ना.. अजून तू कल्याण लाच आहेस.. कधी घरी जाणार आणि निघणार?
माझ डोकच फिरलं होत. मी कसाबसा हापिसातून लवकर कट्लेलो होतो , आणि वेळेत तयार होतो, पण आमच मित्रमंडळ अजून घरीच पोचत होतं , पुण्याची टीम निघाली पण होती
खोपोलीत भेटायचं ठरलेल होतं . संध्याकाळी पनवेल किती प्याक असत हे अनुभवाने माहित होत .. आणि आम्हाला पालीला पोचायचं होतं , ८ इकडेच वाजले होते. कस काय होणार होतं ..
शेवटी दोघ मित्र एका बाईक वर. आणि मी एकटा माझ्या यमी (माझ्या यामाला मी लाडाने यमी म्हणतो ;) ) सोबत निघालो . रात्री जास्त पळवता पण येत नाही , कसे बसे ९.३० च्या दरम्यान पनवेल च्या पुढे आलो .
मिसळपाव
आज नेताजी सुभाशचंद्र बोस यांची ६७वी पुण्यतिथी.
सशस्त्र क्रांतिच्या पर्वाचा कळस ठरलेल्या, आझाद हिंद सेनेच्या पराक्रमाने आपल्या ध्येयाच्या अगदी जवळ येउन ठेपलेल्या - मोइरांग येथे येथे १४ एप्रिल १९४४ रोजी तिरंगा फडकावणार्या नेताजींना स्वतंत्र हिंदुस्थान पाहायचे भाग्य लाभले नाही. मात्र साम्राज्यावर निर्णायक घाव हा नेताजींच्या आझाद हिंद सेनेचाच होता.
नेताजींच्या ६७ व्या स्मृतिदिनी नेताजींना सादर प्रणाम