Skip to main content

आमंत्रण सहलीचं (बुधवार पर्यत ओपन )

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 27/08/2012 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, पुण्या मुंबईतील भटके आणि खादाड असे प्रसिद्ध झालेल्या मिपाक्ररांच्या डोक्यातुन निघालेली एक आय्डिया, २ सप्टेंबरच्या रविवारी साता-याजवळच्या एक दोन ठिकाणी फिरायला जावं, अर्थात एक ठिकाण फिक्स आहे पाटेश्वर आणि दुसरं सज्जनगड ( जेवणासाठी) किंवा ठोसेघर धबधबा (पाण्याच्या आणि भिजण्याच्या आनंदासाठी) किंवा सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेला उरमोडीचा कॅनल ( पुन्हा भिजण्याच्या आनंदासाठी ) तर अशी सहल आयोजित करायचे ठरले आहे, नेहमीचे यशस्वी भटके आणि झोपाळु सदस्य असणारच आहेत, प

नानकटाई

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 27/08/2012 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः २५० ग्रॅम मैदा २०० ग्रॅम तूप रूम टेंपरेचरला असलेले (अनसॉल्टेड बटर वापरले तरी चालेल, मी तेच वापरले आहे) ११० ग्रॅम पिठीसाखर ३५ ग्रॅम रवा २५ ग्रॅम बेसन १/४ टीस्पून बेकिंग पावडर १/२ टीस्पून वेलचीपूड १/४ टीस्पून केशर पिस्त्याचे काप .

हॉस्टेल पुलाव विथ रायता

लेखक अन्या दातार यांनी रविवार, 26/08/2012 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
काही कामासाठी खरगपुरात असल्याने मित्राच्या खोलीवर राहतोय. या मित्राला मेसचे जेवण अज्जिबात आवडत नाही. (मला खूप आवडते असे नाही, पण सहन तरी करु शकतो, पण ते असो!) आज रविवार असल्याने रुमवरच काहीतरी बनवू असे त्याने आज सकाळी सुचवले. म्हणलं ठिकेय. दुपारी १२च्या सुमारास मित्र भाजी घेऊन आला आणि आमचा स्वयंपाक चालू झाला. मित्र कन्नडिग असल्याने भात ठरलेलाच. (रुमवर इतर काही करण्यासारखेही नव्हते) जिन्नसः तांदूळ, घेवडा, १ गाजर, १ कांदा, गरम मसाला, तेल, जिरे, २ मिरच्या, कोथिंबीर कृती: सर्व भाज्या धुवुन चिरुन घेतल्या. एका कुकरमध्ये धुतलेले तांदूळ घेऊन सर्व भाज्या टाकल्या. कांदा जरा मोठाच चिरला.

कडाई गोश्त

लेखक प्रभाकर पेठकर यांनी रविवार, 26/08/2012 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
Kadai-Gosht
साहित्यः मटण १/२ किलो डालडा तुप २ डाव कांदे ४ नग टोमॅटो ४ नग मीठ चवीनुसार आलं ४ इंच काळीमिरी ७ ते ८ शाहिजीरं १ लहान चमच

वासंती भाटकर आणि स्त्री-मुक्ती

लेखक पैसा यांनी शनिवार, 25/08/2012 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच वर्षांपूर्वीची हकीकत आहे. तेव्हा मी प्राथमिक शाळेत जात होते आणि रत्नागिरीजवळच्या बसणी नावाच्या एका खेड्यात रहात होते. हे इतकं लहान खेडेगाव होतं, की रत्नागिरी फक्त ५ मैलांवर असून तिथे जायला थेट रस्ता नव्हता. मधे साखरतरची खूप मोठी खाडी होती. रत्नागिरीला जायचं तर आधी बैलगाडीने तरीपर्यंत जायचं, मग तरीने खाडी ओलांडायची आणि मग बस मिळायची. गावात दुपारी १२ वाजता वगैरे पेपर यायचा. म्हणजे महाराष्ट्र टाईम्स. सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे रेडिओवरची खरखरत्या आवाजातली सुशील दोशीची कॉमेंट्री नाहीतर सिलोन रेडिओवरची बिनाका. त्यासाठी आम्ही बुधवार रात्रीची वाट बघायचो.

(आपले) स्वातंत्र्य, (इतरांचे) चारित्र्य आणि (तथाकथित) संस्कृती

लेखक रमताराम यांनी शनिवार, 25/08/2012 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच फेसबुकवर एका ग्रुपवर नटनट्यांच्या शिर्डीप्रेमाचा विषय निघाला होता. गप्पा तशा खेळीमेळीत चालू असताना अचानक एक नवा सदस्य अवतीर्ण झाला नि त्याने काही स्टेटस् टाकले ते वाचून अख्खा ग्रुप हादरला. एकदोघांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, स्त्री सदस्यांनी त्याच्या विधानाला तीव्र आक्षेप घेतला. परंतु महाराज अजिबात बधले नाहीत. एकामागून एक अशी तिरस्करणीय विधाने करणे चालू होते. यात त्यावर आक्षेप घेणार्‍या सदस्यांवर वैयक्तिक शेरेबाजीही चालू होती. सारा रोख स्त्रियांच्या - चित्रपटात काम करणार्‍या नट्यांच्या - चारित्राबद्दल होता. त्यांची विधाने आठवली तरी अंगावर शहारे येतात.

लबाड सभ्य

लेखक सृष्टीलावण्या यांनी शनिवार, 25/08/2012 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सत्तालोभी र्‍हस्व दृष्टि राजकारणी मंडळींनी काही स्वयंघोषित इतिहासकारांना हाताशी धरून जातीचे राजकारण चालवले आहे. विशेषकरून ब्राह्मणद्वेष हा त्या गलिच्छ खेळीचा पाया झालेला आहे. अफझलखानाला पिता मानणारी मंडळी सध्या कृष्णाजी भास्कर ह्या अफझलखानाच्या वकिलावर चिखलफेक करताना आढळतात. ह्यात त्यांनी आनंद मानायला कोणाची हरकत असायला काहीच कारण नाही. कारण कोणीतरी (बहुदा विनोबाजींनी) म्हटले आहे की श्रोते कीर्तनाचा लाभ घेत असताना पालीचा आनंद मात्र किडे मटकवण्यात असतो. पण आश्चर्याची बाब म्हणजे ह्या सर्व स्वघोषित विद्वज्जनांना महाराजांचे वकील श्री. गोपीनाथपंत बोकील ह्यांचा अनायास विसर पडलेला दिसतो.