Skip to main content

खजुराहो

लेखक अन्या दातार यांनी बुधवार, 29/08/2012 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रोजेक्ट मेघदूतच्या निमित्ताने मध्य भारत पालथा घालताना आमच्या ग्रुपने खजुराहोलाही भेट दिली. वल्लीचा लोणी-भापकरचा धागा वाचताना प्रतिसादात आलेल्या खजुराहोच्या उल्लेखामुळे खजुराहोची अधिक माहिती व्हावी यासाठी हा धागा काढत आहे. खजुराहो येथील मंदिरांची बांधणी इ.स. ९५० ते इ.स. ११५० या दरम्यान चंदेल राजांनी केली. खजुराहोचा त्या काळचा परिसर हा अत्यंत दुर्गम व जंगलाने वेढलेला असा होता. परचक्रांपासून या मंदिरांना अनायासेच संरक्षण मिळत असल्याने आजपर्यंत ती (त्यामानाने) सुस्थितीत आहेत. मंदिरांचे एकूण ३ गट आहेत (दक्षिण, पूर्व व पश्चिम); पैकी वेळेअभावी फक्त दक्षिण भागातील मंदिरांना भेट देता आली.

जयप्रभा स्टुडिओ, कोल्हापूर

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 29/08/2012 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15894252.cms वर दिलेल्या बातमीप्रमाणे कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ हा ऐतिहासिक दृष्टया महत्त्वाचा आहे आणि तो टिकावा असे बहुतेक कोल्हापूरकरांना वाटते. हा सध्या लता मंगेशकरांच्या मालकीचा आहे आणि तो त्यांनी सुरेश वाडकरांच्या मदतीने एका बिल्डरला विकला आहे असे म्हणतात. त्यामुळे कोल्हापूरात लताबाई आणि सुरेश वाडकरांविरुद्ध असंतोष उसळला आहे. इतक्या गुणी कलाकारांविरुद्ध असे जनमत उभे रहाणे क्लेषकारक वाटते. कुणी कोल्हापूरकर वा अन्य जाणकार ह्यावर प्रकाश टाकतील का?

विष्णुसहस्त्रनाम - पुणे येथे

लेखक विटेकर यांनी मंगळवार, 28/08/2012 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातील लोकांच्या श्रेयस आणि श्रीकृष्ण प्रीतीसाठी भागवत अभ्यास वर्ग पुणे तर्फे पुण्यात विष्णू सहस्र नाम पठण आयोजित केले आहे १००० नामप्रेमी एकत्र आले व त्यांनी प्रत्येकी १० वेळा पठण केले तर १० सहस्र आवर्तने सहज होतील दिवस ८ सप्टेबर २०१२ अधिक भाद्रपद कृ अष्टमी वेळ दुपारी २.३० ते ६.३० (प्रत्यक्ष पठण ३ ते ६ ) या वेळेत ठिकाण सुपर्ण कार्यालय ,अरण्येश्वर रस्ता,पुणे सातारा रोड सर्व पुणेकरांनी सहभागी व्हावे .परगावच्या लोकांनी आपल्या पुण्यातील आप्त परिचितांना निरोप द्यावा अधिक माहितीसाठी आणि प्रतिसादासाठी उत्तर द्या अथवा ९८६००३२०८२ वर फोने करा धन्यवाद श्रीकृष्ण शरणं मम! आपटे ( धर्मयज्

इशान्य भारत एक ओळख

लेखक विश्वास कल्याणकर यांनी मंगळवार, 28/08/2012 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
एखादा किचकट विषय जेंव्हा आपण हाताळतो तेंव्हा तो केंव्हा हाताबाहेर काढतो असे आपले होते. नेहरुंच्या काळापासुन इशान्य भारताची समस्या कांग्रेस च्या मानगुटीवर बसली आहे ती काही पिच्चा सोडत नाही. तसे बघितले तर कुठलीच समस्या आपोआप सुटत नसते. संघाने मात्र हा विषय खुप गंभीरतेने घेतला आहे. संघाचे अनेक कार्यकर्ते गेल्या ६० वर्षापासुन इथे काम करित आहेत. प्रचारक या शब्दाचा अर्थ मला आजही पुर्णपणे कळला नाही. प्रचार करणारा म्हणजे आपल्या सोप्या भाषेत मार्केटींग करणे असा होतो. पण संघाने याचा अर्थ खुप सोपा केला आहे.

'श्वान'दार जिंदगी

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 28/08/2012 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीची वेळ! सगळीकडे स्मशान शांतता! नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे रस्ते ओले आहेत. रस्त्यावर लावलेले पिवळे दिवे प्रखर प्रकाशाचा पसारा मांडून बसले आहेत. ओल्या रस्त्यांवर तो प्रकाश सांडून रस्ते पण पिवळे भासतायेत. हवेत गारवा आहे. मोठमोठाल्या इमारती उभ्या उभ्याच डुलक्या घेत आहेत. झाडे निवांत झालेला हा सगळा पसारा बघत उसासे टाकत उभी आहेत. मी हळू-हळू चालत माझ्या इमारतीकडे चालत जातोय. फक्त माझ्या बुटांचा आवाज! इतक्यात समोर काहीतरी शुभ्र पांढरे हलतांना दिसते. माझी पाचावर धारण बसते. वेग कमी होतो. डोळे बारीक करून मी त्या अंधारलेल्या प्रकाशात खोल बघतो.

पाप पुण्य विचार असावा की नसावा

लेखक अमोल सहस्रबुद्धे यांनी मंगळवार, 28/08/2012 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
पाप -पुण्य याची भीती गेल्याने समाजाचे हित झाले की अहित? पूर्वी जेव्हा भारतीय समाज मेकॉलेच्या तथाकथित शिक्षण पद्धतीनुसार अशिक्षित(!) होता तेव्हा तो पाप पुण्य इत्यादी जीवन मूल्ये मानीत असे पण जेव्हा कालांतरानी वर उद्धृत केलेला असा सुशिक्षित मनुष्य निर्माण झाला तेव्हा तो हिंदू धर्म पद्धती व जीवन पद्धती हि मागासलेली व बुरसटलेली व आंग्ल जीवन पद्धती हि आदर्श मानू लागला त्यामुळे हिंदू जीवन पद्धतीत येणारी प्रत्येक गोष्ट तो कुठलाही विचार न करता त्याज्य व तिरस्करणीय मानू लागला . अर्थात साहेब जिंकला.

अमेरिका , महाराष्ट्र आणि परप्रांतीय

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 27/08/2012 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र आणि अमेरिका दोन्ही मध्ये सध्या परप्रांतीय , त्यांचे आक्रमण आणि लोकल माणसाचा रोजगार याविषयी बरीच चर्चा चालू असते. सहज गंमत म्हणून त्यामध्ये काही साम्य आहे ते बघितले तर मला खालील मुद्दे सापडले. मुद्दे गंमत म्हणून आहेत आणि ते खालील छोट्या गृहीतका वरून काढले आहेत .

सिलचर आसाम

लेखक विश्वास कल्याणकर यांनी सोमवार, 27/08/2012 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
या वेळी मला आसाम च्या सिलचर येथे जाण्याचा योग आला. इंफाल चे काम आटोपल्यावर इंफाल ते सिल्चर येथे मी १०० आसनी विमानाने गेलो. हे अतर तसे २६० कि.मी चे पण रस्त्याच्या दुर्दशेमुळे खुप दगदगीचा हा मार्ग आहे. त्यामुळे विमानाने ४० मिनीटात पोचलो. विमानतळ हे सिलचर हुन ३२ कि.मी वर असल्याने मला घ्यायला मला घ्यायला उदय दास हे कार्यालयाचे व्यवस्थापक आले होते. जितका वेळ मला इंफालहुन सिलचर विमानतळावर यायला ला लागला त्यापेक्षा अधिक वेळ मला विमानतळावरुन सिलचर ला जाण्यास लागला. तेथे माझी भेट नागपुरचे राजेश देशकर यांचेशी झाली. राजेश हे सर्व प्रथम आले ते अरुणाचलातील चांगलांग या दुर्गम ठीकाणी. संघाचे काम करायला.

मुर्ग मुमताज महल

लेखक प्रभाकर पेठकर यांनी सोमवार, 27/08/2012 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
Murgh-Mumtaz-Mahal
साहित्यः चिकन अर्धा किलो. तुप ७५ ग्रॅम कांदे २ नग आलं २ इंच खवा अर्धी वाटी लाल तिखट १ लहान चमचा (टी स्पून) धणे पावडर १ मोठा चमचा (टे.