Skip to main content

पाककृती - झटपट भ्रमणगाथा लेखन

लेखक नाना चेंगट यांनी शनिवार, 01/09/2012 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी आजपर्यंत आपण अनेक पाककृती वाचल्या असतील, करुन पाहिल्या असतील, सांगितल्या असतील वगैरे इत्यादी... असो. आता आपण एक पाककृती पाहू या ! आजकाल असल्या पाककृतींना फार डिमांड आहे असे म्हणतात. तर ही पाककृती आहे भ्रमणगाथेच्या लेखनाची. लोकांना आजकाल भ्रमण करण्यापेक्षा भ्रमणगाथा वाचण्यात जास्त विंट्रेस्ट असतो. बरोबर आहे हो.. कोण त्या वाटा तुडवत जाईल, पोटाला खड्डे पाडेल. उगा आचरट लोक मधेच भेटतात त्यांच्याबरोबर रहावे लागेल. त्यापेक्षा कुणाची तरी भ्रम ण गाथा.. माफ करा... भ्रमण गाथा वाचावी, तोंडाने चुक चुक करावे..

चॉकलेट गनाश

लेखक Pearl यांनी शनिवार, 01/09/2012 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १/२ अर्धा कप चॉकलेट चिप्स (सेमीस्वीट किंवा स्वीट आवडेल तसे), १/३ कप हेवी क्रीम (किंवा हेवी व्हिपिंग क्रिम), १ टीस्पून रूम टेंपरेचरला आलेलं बटर, १/८ टीस्पून मीठ, १/८ टीस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट/इसेन्स (ऑप्शनल) कृती: १) एका पॅनमध्ये मध्यम आचेवर क्रीम गरम करत ठेवा. आणि क्रीम उकळायच्या थोडंस आधी (म्हणजेच पॅनच्या कडेने हवेचे बुडबुडे जमा झालेले दिसले की) गॅस बंद करा. २) आता एका बाउलमध्ये चॉकलेट चिप्स घेऊन त्यावर हे गरम क्रीम ओता. १ मिनिट तसचं राहू द्या. आता त्यात बटर, मीठ, व्हॅनिला एक्सट्रॅक्ट घालून चमच्याने किंवा व्हिस्कने फेटून चांगले एकत्र करून घ्या. ३) ४-५ मिनिटे तसेच राहू द्या.

अतर्क्य???

लेखक जिन्क्स यांनी शनिवार, 01/09/2012 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
'लोकांना आलेले अतर्क्य अनुभव' ह्या विषयावर ह्याच्या आधी हि बरेच लेख आणि चर्चा वाचलेले आहेत. अशा लेखांची ह्या आधी मी खिल्ली हि उडवली आहे, पण अशा प्रकाराची एखादी गोष्ट आपल्या सोबत घडते तेव्हा परिस्थिती पूर्णं पने वेगळी असते. असाच काहीसा मला आलेला अनुभव मी इथे देत आहे. आपण मोटरसायकल वर लडाखला जावं अस मला फार दिवसांपासून वाटत होत. सुट्टी पासून पैश्याची जमवाजमव पर्यंत बऱ्याचं अडचणी आल्या. प्रबळ इच्छे च्या जोरावर ह्या सगळ्या अडचणी वर मात करत पुण्यातून आम्ही १२ जण ह्या मोहिमेवर निघालो. पुण्यातून जम्मू पर्यंत रेल्वे नि जाऊन तिथून आमची 'बाइक एक्स्पेडिशन' सुरू होणार होती.

पानी पुरी

लेखक कौशी यांनी शनिवार, 01/09/2012 01:56 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी पुरी- पुरी साहित्य- रवा,मीठ,पाणी स्टफिंग- उकळलेला बटाटा, उकळलेले चणे,बारीक सेव बारीक कापलेला कांदा,मीठ,हिरवी मिरची, (बारीक कापलेली),मीठ उकडलेला बटाटा ,हिरवी मिरची आणि मीठ चवीनुसार एकत्र करून ठेवावी.. पाणीपुरीचे पाणी साहित्य-- अंदाजे पुदिना,कच्ची कैरी ,३-४ हिरव्या मिरच्या (झेपेल इतक्या) इ.

(काय राव सांगू)

लेखक सूड यांनी शुक्रवार, 31/08/2012 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
काय राव सांगू, कसं मी सांगू? 'पुण्यास भारी आहे माज' काडी अशी सारुन आलोय आज उगीच पिऊनी आलो फूल उगीच मनाला पडली भूल कळफलकाचा अन् शब्दांचा दावियला मी भलता बाज काडी अशी सारुन आलोय आज जरी झिंगलो मारुन 'नीट' लिहीत राहिलो होऊन धीट जमली सारी पोरं कशी ही प्रतिसादांची घुमते गाज काडी अशी सारुन आलोय आज सहज बोलूनि फसलो मी उगाच बरळत बसलो मी पंख लागूनि गेला धागा नाहि चालला काही ईलाज काडी उगा सारुन आलो आज

हायटेक चितळे बंधू

लेखक आनंद भातखंडे यांनी शुक्रवार, 31/08/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका शनिवारी भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब पुण्याला जायचा योग आला. पुण्याला गेलं की येताना काय खाऊ आणायचा असा प्रश्नच पडत नाही. चितळ्यांची बाकरवडी तर ठरलेली.मस्त कप भर चहा बरोबर १०-१२ बाकरवड्या कधी फस्त होतात तेच कळत नाही. माझी बहिण कोथरूडच्या Happy Colony मध्ये राहते.तिच्या घराजवळच चितळे बंधूंची शाखा आहे. संध्याकाळी ५ वाजता वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी ६:३० वाजायच्या सुमारास सगळ्या बालगोपाळ मित्र मंडळीना बोलावले होते.

मिपा jargon

लेखक राजो यांनी शुक्रवार, 31/08/2012 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर आल्यापासून इथल्या साहित्य चर्चा इ. चा आस्वाद घेत आलो आहे. पण प्रतिक्रियांमध्ये अनेक shortforms वापरले जातात. काहींचा अर्थ लागतो. काहींचा आजिबात नाही. उदा. प्रकाटाआ - प्रतिसाद काढून टाकला आहे बाडिस - ??? मचाक - ??? आणि इतर अनेक.. नवीन सदस्यांना माहिती होण्यासाठी वाविप्र (हे अजुन एक.. :) ) मधे अशा मिपा स्पेशल शब्दांची माहिती द्यावी का?

वळवथेंब

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 31/08/2012 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
एक थेंब वळवाचा अंकुर पुन्हा उजवेल खपलीखालच्या वळणापाशी नवा श्रावण हिरवळेल पाउलवाटांचं काय पाऊल पडेल तिथे वाट सापडेल अवखळ खळखळणारं पाणी ओंजळीत साकळेल आकाशही मावेल मग त्यात रुसलेलं गावेल निर्व्याज पावेल मावळतीच्या संध्येकाठी चंद्र चांदणं हसेल ..................अज्ञात
काव्यरस