Skip to main content

अधिक मास :अधिकस्य अधिकम फलम.:

लेखक dr sanjay honkalse यांनी शनिवार, 08/09/2012 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
अधिक मास :अधिकस्य अधिकम फलम.: डॉक्टर संजय होनकळसे "शिवंजय" drsanjayhonkalse@gmail .com भारत हा कदाचित जगाच्या पाठीवरील एकमेव देश आहे की जेथे सभ्यता,जीवन ,संस्कृती, आरोग्य ,आयुष्यमान ,हवामान, सण,व्रत वैकल्य, अन्न, आहारशास्त्र अगदी साज श्रुगार-वेषंभूषा व अध्यात्म शास्त्र सुद्धा इ अनेकानेक गोष्टींची शास्त्रीय बैठकीवर आधारीत उत्कृष्ट सांगड घातलेली आहे.

आयचा घो.....

लेखक अनुरोध यांनी शनिवार, 08/09/2012 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
" काय.......?? एच. आय. व्हि. टेस्ट...... डोकं बिकं फिरलय का.....??? चायला नको करुस लग्न काही अडलं नाहीये पण हे असलं काहिहि काय बोलायचं? अत्तार्यंत मुलाला सॅलरी स्लीप मागितल्याच ऐकलं होतं पण हे म्ह्णजे अतिच होतय. वाटलं मुलगी बघायला आलोय, बोलणं ब-यापैकी झालयं वाटतेय पण ओके पण अता हे काय नविनच. " " दोन मिनिट मि काहि बोललोच नाहि. विचार हेच डोक्यात... काहीही काय....? ती पण माझ्याकडेच बघत होती. काय बोलतो हा, चेह-यावरुन काही रिअ‍ॅक्शन कळते का.... मग या बाबतित मि पण हुशार आहे. मठ्ठासारखा चेहरा करुन बसलो, काहिहि भाव नाहित चेह-यावर, ती आपली बघतेय अरे काहि तर बोल... पण मग २ मि.

कविता वाचण्याआधी एक क्षणभर मौन : एमनुएल ओर्तीज

लेखक Kavita Mahajan यांनी शनिवार, 08/09/2012 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता वाचण्यास सुरुवात करण्याआधी माझी विनंती आहे की आपण सगळे एक क्षणभर मौन पाळूया अकरा सप्टेंबर रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉन इथं मृत्यू पावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ आणि त्यानंतर अजून एक क्षणभराचं मौन त्या सगळ्यांसाठी ज्यांना तपासाच्या कारणास्तव सतावलं गेलं कैद केलं गेलं जे हरवून गेले ज्यांना यातना देण्यात आल्या ज्यांच्यावर बलात्कार झाले.

लष्कर ए तोयबा - उच्चशिक्षित दहशतवादी

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 08/09/2012 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
देशामधे दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आजवर अडाणी, गरीब जनता यामधे सहभागी असेल असा समज होता. पण पुणे स्फोट आणि मुंबई दंगलीच्या पार्श्वभूमीवर बंगलोर, हैद्राबाद येथे पोलिसांनी कारवाई केली. त्यात अटक झालेल्यांमधे अनेक उच्चशिक्षितांचा समावेश आहे.

भारतीय सांस्कृतिक प्रदूषण थांबवा पाकिस्तानी नेते , कट्टर पंथीयांची व मागणी

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी शुक्रवार, 07/09/2012 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या पाकिस्तानी कलाकार व भारतीय कार्यक्रमात सहभाग ह्या विषयांवर बरेच काही लिहून येत आहे. त्या विषयी माझे मुक्त प्रकटन ह्यात मी अबुधाबी , युके , आणि जर्मनी मध्ये अनेक पाकिस्तानी नागरिकांना भेटलो व त्यांच्याशी संवाद साधला चर्चा ,वादविवाद खूप घातले. त्यांचा कडून भारताविषयी मत जहाल ,मवाळ मते कानावर पडली. ह्याच मुद्द्याला अनुरूप अशी चर्चासत्रे पाकिस्तानी प्रसारमाध्यमात घडतात. त्यांना भारतीय वाहिन्यांवर बंदी हवी आहे. कारण ह्यांच्या मार्फत हिंदू संस्कृती पाकिस्तानी घरांमध्ये झिरपत आहे.

युवकांच्या चश्म्यातून - आरक्षण.

लेखक राजघराणं यांनी शुक्रवार, 07/09/2012 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्या दिवसापूर्वी एका वाद विवाद स्पर्धेला परिक्षक म्हणून गेलो होतो. आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धा होती. २० ते २५ वर्षाची मुलं - मुली स्पर्धक होती. धर्माच्या आधारावर आरक्षण द्यावे का ? दिल्यास ते देशाच्या एकतेला बाधक होईल का ? - असा विषय होता. प्रत्येक कॉलेज मधून दोन्ही बाजूंनी बोलण्यासाठी एक - एक विद्यार्थी पाठवायचा नियम होता. - तरुणांची भाषणं ऐकून टाळकं भणाणून गेलं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी मी समारोपाला थोडसं बोललो.

व्हेज दम बिर्याणी..

लेखक डावखुरा यांनी शुक्रवार, 07/09/2012 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
दम बिर्याणी..[व्हेज] साहित्य : ४-५ कांदे, कोथिंबिर आणि ३-४ टमाटे, २५० ग्रॅम फ्लॉवर,३-४ गाजर,हिरवी मिरची ,४-५ लिंबु, तेल ,दही, गुलाब जल.. मसाले : आले-लसुण, तेजपान, दालचिनी, बाजा, काळी मीरी,जिरे, .लवंग,, हिरवी व काळी विलायची, ..धणे पुड, हळद, मीठ, बिर्याणी मसाला ,लाल तिखट...पुदीना... कृती : सर्वात आधी बिर्याणी मसाल्याची तयारी करुन घेऊ.. त्यासाठी कांदे अगदी बारीक चिरुन घ्या..