Skip to main content

साय

लेखक लीलाधर यांनी बुधवार, 12/09/2012 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
साय ताजी ताजी हाय दूधावरची साय, ताजी ताजी हाय दूधावरची साय ! दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? गोर्‍या गोर्‍या वाहिनीची साईसारखी काया, साईसारखी काया तीची वडरुपी छाया, वडरुपी छायेत करील मातृरुपी माया ! सांग कधी आणतोस अशी वहिनी भाऊराया !! गोर्‍या गोर्‍या वहिनीची वाजत गाजत काढेन वरात, कधी घेउन येशील सांग वहिनीला घरात! वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय, दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? ताजी ताजी हाय दूधावरची साय, ताजी ताजी हाय दूधावरची साय ! दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?

राजांचा गड, गडांचा राजा!

लेखक लई भारी यांनी बुधवार, 12/09/2012 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
कुठून डोक्यात आलं होत काय माहित पण राजगडला जावं अस शुक्रवारी वाटलं. कदाचित आंबोली भ्रमंती नंतर पावसाळी ट्रेकची इच्छा अपुरीच राहिली होती. जळगावच्या पाटलांनी उत्साह दाखवला म्हणून शिराळ्याच्या पाटलांकडून माहितीची विचारणा केली. दोघांनीही पाटीलकीला स्मरून ऐन वेळी ठेंगा दाखवला :D तरीपण जुजबी माहिती मिळाली होती आणि मग मिपा/नेट वर बघितलं तर चिक्कार माहिती होती, ती वाचून तर जायची इच्छा प्रबळ झाली! सकाळी उठून पण तळ्यात-मळ्यातच होत. शेवटी २ पराठे घेतले बांधून आणि म्हटलं एकटा तर एकटा निघू!

कांद्याचा भात

लेखक रेवती यांनी बुधवार, 12/09/2012 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: तांदूळ १ कप, उभा जाडसर चिरलेला कांदा अडीच कप , हरभरा डाळ १ टेबलस्पून , मोहरी अर्धा टीस्पून, मेथ्या एक अष्टमांश टीस्पून, हिंग एक अष्टमांश टीस्पून, हळद पाव टीस्पून, कढीलिंबाची एक काडी, धणेपूड एक टीस्पून, जिरेपूड अर्धा टीस्पून, काळीमिरीपूड पाऊण टीस्पून, लिंबूरस १ टेबलस्पून, तांदळाच्या दुप्पट आधणाचे पाणी, थोडे तूप, कोथिंबीर व खोबरे, मीठ. कृती: तांदूळ धुवून निथळत ठेवावेत. कांदा जाडसर चिरावा. फोडणीचे साहित्य तयार असावे. पाणी तापण्यास ठेवावे. पातेल्यात नेहमीपेक्षा थोड्या जास्त तेलाची मोहरी, हिंग, हळद, मेथ्या घालून फोडणी करावी. कढीलिंब व हरभरा डाळ घालून थोडे परतावे.

यूट्यूब व्हिडीयो कसा पोस्ट करावा?

लेखक योगेश पितळे यांनी मंगळवार, 11/09/2012 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
मला यूट्य़ूबवरचा व्हिडियो माझ्या येथील पोस्टमध्ये समाविष्ट(embed)करायचा आहे! यासाठी यूट्यूबने प्रत्येक व्हिडीयोच्या खाली शेअर ऑप्शनमध्ये एम्बॆड कोड दिलेला असतो. पण तो इथे डकवल्यास काही दिसत नाही!(iframe आणि Object Embed दोन्ही चालत नाही.) असे का बरे? मी मदत पानावर याबद्दल काही माहिती मिळते का पाहिली पण तिथे काहीही उपलब्ध नाही. सर्च मध्ये पण काही सापडले नाही.. तज्ञांनी कृपया मार्गदर्शन करावे!

मदत हवी आहे

लेखक शोधा म्हन्जे सापडेल यांनी मंगळवार, 11/09/2012 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
मला मदत हवी आहे. मला काही पुस्तके जालावर चढवायची आहेत. माझ्याकडे स्कॅनर नाही, पण मी प्रत्येक पानाचा फोटो काढून मग तो संगणकावर घेतला आणि मग ते जेपीइजी टू वर्ड कन्व्हर्टर मधून कन्व्हर्ट केले. इंग्लीश पुस्तकासाठी हे सोपं गेलं पण मराठी पुस्तकासाठी थोडी अडचण येत आहे. तुमच्यापैकी कोणाला जर जेपीइजी टू वर्ड कन्व्हर्टर मराठी माहित असेल तर कृपया सांगा. मी गुगल वरून १-२ लिंक्स बघितल्या पण त्याची काही मदत झाली नाही. कृपया मदत करावी. धन्यवाद

वेरूळची लेणी..

लेखक सुहास झेले यांनी मंगळवार, 11/09/2012 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या लांबच्या ठिकाणी भटकंतीला जायचं, म्हणजे खूप आधीपासूनच तयारीला सुरुवात करावी लागते. गाड्यांचे वेळापत्रक बघणे, तिथे राहण्याची सोय आहे की नाही, असेल तर ते परवडणार की नाही. त्या ठिकाणी अजून काय काय बघता येईल, याची इत्यंभूत माहिती काढणे.. इत्यादी इत्यादी सोपस्कार पार पाडणे ओघाने आलंच. बरं इतकी तयारी करूनसुद्धा सगळं नीट जुळून आलं नाही, तर सगळ्या तयारीचा बट्ट्याबोळ. :) सेनापतींच्या बड्डे पार्टीमध्ये अनघाने हंपी आणि बदामी बघायला जाऊया, असा किडा सोडला आणि लगोलग ५-६ जण तयार सुद्धा झाले.