Skip to main content

सैतानाचे वरदान

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 24/09/2012 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
मनमोहन सरकारने रिटेल बाजारात विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिलेली आहे. त्याविरुद्ध कम्युनिस्ट, मंदिरनिष्ठ; वंगव्यस्त, आणी द्रविड्स्त मंडळींनी अनुक्रमे क्रांती, धर्मयुद्ध, थयथयाट आणी तांडव सुरू केलेला आहे. राजकारणातल्या अवघड प्रश्नांना हातच घालायचा नाही. वास्तव समजूनच घ्यायचे नाही. महागाई, महागाई च्या भंपक बांगा ठोकत स्वस्त प्रसिद्धीची पायवाट वारंवार तुडवण्याचे कारण काय ? आज शेतीमालाचे मार्केट कसे आहे ? शेतकरी माल पिकवतो. ट्रक ट्रान्सपोर्ट वाले तो माल - कृषी उत्पन्न बाजार समितीत (कृ उ बा स) आणून टाकतात. कृ उ बा स शिवाय शेतकरी कोणालाही माल विकू शकत नाही. मोनोपली आहे.

पाणावलेल्या डोळ्यांना

लेखक सौरभ उप्स यांनी सोमवार, 24/09/2012 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
पाणावलेल्या डोळ्यांना वाराही जुमानत नाही ! कितीही गर्दीत सापडले तरी त्यांना काहीच फरक नाही !! रडायला खांदा, बोलायला तोंड मिळाली पण माझे अश्रू मीच पुसले ! मनातला तो कोपरा कायमचा बुजवला, आठवणी मात्र बाहेरच राहून गेल्या !! मनरुपी वृक्षाला मग नवी पालवी फुटली ! तुझ्या मैत्रीची मज ओढ वाटू लागली !!

दाल खिचडा / खिचडी.

लेखक गणपा यांनी रविवार, 23/09/2012 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
 मित्रांबरोबरच्या ओल्या कट्ट्याची सांगता करताना हटकुन मागवले जाणारे जे दोन पदार्थ आहेत त्यापैकी पहिला म्हणजे जीरा राईस + तडका मारलेली डाळ आणि दुसरा हा दाल खिचडा. पैकी उपहार गृहातला दाल खिचडा मी हल्ली हल्ली पर्यंत टाळत आलोय. अहो हाटिलात जाउन काय ती पचपचीत पिवळी खिचडी मागवायची?

मायामृग यांच्या हिंदी कवितेचा अनुवाद

लेखक Kavita Mahajan यांनी रविवार, 23/09/2012 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
आई...! तुला काही छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या होत्या तुला खूप हसू आलं असतं ऐकून तुझ्याशिवाय दुसर्या कुणाला यात रस नाही आणि असला तरी कुणी तुझ्यासारखे समजून घेणार नाही आई समजून घेतले तरी त्यात काही मजा नाही वाटणार त्यांना... तुला सांगायचं होतं की आज सकाळी चहा करताना साखरेऐवजी मीठ घातलं मी पण कुणीच म्हटलं नाही, तू असा ढ च राहशील तुला नाही जमणार चहा, बाजूला हो, मी करते...! आई, तुला सांगायचं होतं की आज बाबांना मी पाणीपुरी खाऊ घातली, जे ती कधीच खात नाहीत आणि किती मजा... सगळे पाणी तर बशीतच सांडले...