Skip to main content

तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा समारोप

लेखक खुशि यांनी बुधवार, 26/09/2012 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
लवकर्च उठलो स्नानपुजा आटपुन ओम्कारेश्वर दर्शनाला गेलो. अजिबात गर्दी नव्हती, शान्तपणे भगवन्तासमोर उभे राहुन मानसपुजा स्तोत्र म्हणून मानसपुजा केली.भगवान शिवजी माझ्या मोरयाचे पिताजी,नर्मदामैय्याचेही पिताजी त्यान्च्याच कॄपेने परिक्रमा पुर्ण झाली.

कानसेन कोण? २०१२ क्र.४

लेखक रेवती यांनी बुधवार, 26/09/2012 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
रसिकांनो, गणपानंतर मी पुन्हा आले आहे आणखी गाणी घेऊन! तर स्पर्धा सुरु करूयात ब्रेक के बाद.
गाणे क्र विजेता
चिंतामणी
अन्या दातार
निखिल देशपांडे
अन्या दातार
अन्या दातार + निखिल देशपांडे

कानसेन कोण? २०१२ क्र. २

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 26/09/2012 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
दहा मिनिटांच्या विश्रामानंतर बहुगुणी आता या पुढील भागाचं आयोजन करतील.
   गाणे क्रमांक विजेता
चिंतामणी+मैत्र
मराठे
चिंतामणी

कानसेन कोण? २०१२ क्र. १

लेखक रेवती यांनी बुधवार, 26/09/2012 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आपण बरेचदा खूपश्या गाण्यांची ओळख केवळ मुखड्याच्या वाद्यमेळ्यातून, नाहीतर अंतर्‍यातल्या वाद्यरचनेवरून पटवतो. मेंदूतल्या आठवणीतल्या कुठल्या तरी तारा जुळून गीतांचे शब्द आपोआप सामोरे येतात! तर या स्पर्धेत आपण इथे असाच खेळ खेळणार आहोत, 'कानसेन कोण?' मिपाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या सोहोळ्यात 'कानसेन कोण?' स्पर्धेचा समावेश केल्याबद्दल "कानसेन टीम" तर्फे नीलकांत, प्रशांत आणि संपादक मंडळाचे आभार!

चिक्कू हलवा.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी बुधवार, 26/09/2012 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
Chikku-Halwa साहित्यः पिकलेले चिकू १/२ किलो. खवा १५० ग्रॅम साखर १०० ग्रॅम वेलची पूड १ लहान चमचा. साजूक तुप २ मोठे चमचे (टेबल स्पून) बदामाचे काप सजावटीसाठी तयारी: चिकूची साले सोलून, बिया काढून मिक्सरमधून वाटून त्याचा लगदा करून घ्या. कृती: कढईत तुप तापवून त्यात चिकूचा लगदा टाकून, मध्यम आंचेवर, परतत राहा. जास्त शिजवावे लागत नाही. पाणी जरा आटले आणि चिकूची कच्ची चव गेली की त्यात खवा टाकून परता. खवा नीट एकजीव झाला की वेलचीपूड आणि साखर घालून परता.

पवार पॉवर प्ले

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 26/09/2012 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रवादीचे धुरंधर, धडाडीचे नेते अजितदादा पवारांनी आपला राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली आहे. आता हे करुन काकाला धोका दिला का झोका दिला आणि ह्यातले बाबाकरता किती आणि साहेबांकरता किती आणि अशाच सुरस आणि चमचमीत चर्चांनी टीव्ही व अन्य माध्यमे भरून गेली आहेत. पांढरे नामक एका अधिकार्‍याने पर्दाफाश करुन अजितरावजीदादासाहेब पवारांचे काळे धंदे उघडकीस आणले म्हणून नाईलाजाने दादांना हे करावे लागले असे म्हणतात. आता पांढर्‍यांचे काही काळेबेरे होते का बघायचे. पाटबंधारे खाते खायला चांगले असावे असे दिसते आहे.

मलई सँडविच

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 26/09/2012 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
sanika साहित्य सँडविचसाठी: अर्धा लिटर दूध दीड टेस्पून लिंबाचा रस ३/४ वाटी साखर दीड वाट्या पाणी १/२ टीस्पून वेलची दाणे पत्री खडीसाखर बर्फाचे तुकडे sanika पाकृ: जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवावे. दूधाला उकळी आली की त्यात लिंबाचा रस थोडा-थोडा करून घालावा व सतत ढवळावे. दूध फ